व्हिसाचे पेमेंट्ससाठी मार्गदर्शन: सुरक्षितपणे टॅप अँड पे करा
तुम्हाला त्वरित कॉफीचा आस्वाद घ्यायचा असो किंवा कार्डचा वापर करत अधिक महागडी खरेदी करायची असो सोयीसुविधा, गती व सुलभता हे टॅप-टू-पे किंवा डिजिटल पेमेंट्सचे आधारस्तंभ आहेत. व्हिसाने कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, ज्यामुळे तुम्ही कधीही, कुठेही जलद, सुरक्षित व्यवहारांचा आनंद घेऊ शकता:
- स्टोअर्समध्ये कॉन्टॅक्टलेस कार्डसह टॅप टू पे करा: कॉन्टॅक्टलेस पेमेंट्सचा सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार म्हणजे ईएमव्हीसीओ® चिप-आधारित कॉन्टॅक्टलेस कार्डस् (वाय-फाय सारखे चिन्ह
सह), जे मर्चंटच्या पेमेंट टर्मिनलवर कार्डच्या सोप्या टॅपसह जलद व सुरक्षित पेमेंट्स करण्याची सुविधा देतात. हे कार्डस् जागतिक स्तरावर मर्चंट्सनी स्वीकारले आहेत आणि काही सेकंदांमध्ये व्यवहार पूर्ण होतात.
- सुरक्षित कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी स्मार्टफोनचा वापर: आज स्मार्टफोनमधील बँकिंग व पेमेंट अॅप्स अॅपमध्ये डेबिट व क्रेडिट कार्डसची तरतूद (किंवा 'लोडिंग') करण्याची सुविधा देतात, ज्यामुळे तुम्ही मर्चंट टर्मिनलवर तुमचा स्मार्टफोन टॅप करत पेमेंट्स करू शकता. ही कॉन्टॅक्टलेस पेमेंट पद्धत प्रत्यक्ष कार्डस् किंवा रोख रक्कम सोबत नेण्याची गरज दूर करते आणि स्टोअर्समध्ये जलद चेकआऊट करत प्रतिक्षा काळ कमी करते. तसेच, बायोमेट्रिक सारख्या एन्क्रिप्टेड डेटा व ऑथेन्टिकेशन उपाय तुमची आर्थिक माहिती सुरक्षित ठेवतात आणि अधिक समाधान देतात.
- हँड्स-फ्री पेमेंट्ससाठी वीअरेबल्स: पेमेंट क्षमता असलेले स्मार्टवॉचेस् आणि फिटनेस ट्रॅकर्स चालता-फिरता कॉन्टॅक्टलेस पेमेंट्सची सुविधा देतात. वीअरेबल्समध्ये सुरक्षितपणे कार्ड माहिती स्टोअर करता येते, ज्यामुळे जलद, हँड्स-फ्री पेमेंट्स करता येतात.
- अॅप्सच्या माध्यमातून कॉन्टॅक्टलेस व इतर पेमेंट्सवर नियंत्रण ठेवा: कॉन्टॅक्टलेस ईकॉमर्स व आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी मोबाइल बँकिंग अॅपचा वापर करा. तुम्ही कॉन्टॅक्टलेस कार्ड/क्रेडेनिशयल ऑनलाइन व ऑफलाइन कसे व कुठे वापरावे याबाबत देखील मर्यादा ठेवू शकता.
कुठेही, कधीही विनासायास, सुरक्षित व्यवहारांसाठी प्राधान्यक्रम टॅप अँड पे चा फायदा घेण्यासाठी या पर्यायांची सुलभता व सुरक्षिततेचा लाभ घ्या.