Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फेडएक्सने लोकांना कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला

 फेडएक्सने लोकांना कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला


मुंबई, १६ फेब्रुवारी २०२५: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने लोकांना भारतात फेडएक्सच्या कर्मचाऱ्यांच्या नावे होणाऱ्या तसेच इतर फसवाफसवीच्या कारवायांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या फसवाफसवीला जे बळी पडतात त्यांना बऱ्याचदा आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सोसावा लागतो.

ही फसवाफसवी कशी असते:

हे घोटाळेबाज आपण कुरियर प्रतिनिधी, फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आणि असा खोटा आरोप करतात की तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आहेत. जे बळी पडतात त्यांची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्याशी गाठ घालून दिली जाते, जे कायदेशीर कार्यवाहीची किंवा डिजिटल अटकेची धमकी देतात आणि तो त्रास टाळण्यासाठी तत्काळ पैशांची मागणी करतात. एकदा पैसे हस्तांतरित केल्यानंतर हे घोटाळेबाज गायब होतात आणि तुमचे मात्र मोठे नुकसान होते.

तुम्ही काय केले पाहिजे:

फेडएक्स कोणत्याही अनाहूत ईमेल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे तुमच्या खात्याची किंवा ओळखीसंबंधी व्यक्तिगत माहिती मागत नाही. फेडएक्स कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित नाही आणि त्यांच्या वतीने कार्यवाही देखील करत नाही. कुरियर सेवांचे प्रतिनिधित्व करण्याचे नाटक करणाऱ्यांपासून किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध रहा. धमकी किंवा संदिग्ध विनंतीला प्रतिसाद देताना पैसे हस्तांतरित करू नका. अशा एखाद्या फसवणुकीला बळी पडल्यास १९३० वर कॉल करून किंवा सायबरक्राईम.जीओव्ही.इन (cybercrime.gov.in) ला भेट देऊन त्याबद्दल कळवा.

स्वतःच्या रक्षणासाठी सुरक्षा टिप्स:

●          सतर्क रहा: फेडएक्स किंवा इतर कुरियर प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करून केल्या जाणाऱ्या कम्युनिकेशनबाबत नेहमी सतर्क रहा.

●          कोणतीही कृती करण्याअगोदर पडताळून बघा: संदिग्ध मेसेज किंवा कॉल्स अधिकृत ग्राहक सेवा चॅनल्सकरवी पडताळून घ्या.

●          घाईघाईने पेमेंट करण्याचे टाळा: स्रोताची पडताळणी केल्याशिवाय कधीच पैसे हस्तांतरित करू नका किंवा व्यक्तिगत माहिती देऊ नका.

●          अशा घटना नोंदवा: स्थानिक कायदा अंमलबजावणीशी संपर्क साधा किंवा 1930 वर किंवा सायबरक्राईम.जीओव्ही.इन (cybercrime.gov.in) वर सायबर क्राइम हेल्पलाइनद्वारे घोटाळ्यांची नोंद/तक्रार करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.