लिव्हप्युअरच्या महसूलामध्ये ३४ टक्क्यांची वाढ
मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५: लिव्हप्युअर या भारतातील ऑफलाइन विभागामधील आघाडीच्या वॉटर प्युरिफिकेशन ब्रँडने गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीतील एकूण महसूलामध्ये ३४ टक्के वाढीची घोषणा केली आहे. लिव्हप्युअर ऑफलाइन एम्बेडेड सर्विस बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाचा वॉटर प्युरिफायर ब्रँड बनला, तसेच उद्योगामधील त्यांचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे. कंपनीचा नाविन्यता, ग्राहक-केंद्रित धोरणे आणि कार्यरत सर्वोत्तमतेवरील सातत्यपूर्ण फोकस या प्रभावी कामगिरीला चालना देण्यामध्ये साह्यभूत राहिला आहे. आमची प्रबळ अंमलबजावणी आणि मूल्यनिर्मितीवरील फोकस तिसऱ्या तिमाहीमध्ये ईबीआयटीडीएमधील वार्षिक १४९ टक्क्यांच्या वाढीसह स्पष्टपणे दिसून आला आहे. उद्योग-अग्रणी नेट प्रमोटर स्कोअर ८१ सह (लिटमसनुसार) लिव्हप्युअर वॉटर प्युरिफिकेशन आणि होम सोल्यूशन्समधील विश्वसनीय नाव म्हणून आपले नाव अधिक दृढ करत आहे.
कंपनीची विकासगती विविध विक्री चॅनेल्समध्ये दिसून आली. जनरल ट्रेडने अनपेक्षित १०८ टक्के वाढीची नोंद केली, तर मॉडर्न ट्रेडने ३२ टक्के वाढ केली. सीएसडी सीपीसी चॅनेल्सनी ३६ टक्के वाढ केली. या आकडेवारींमधून उत्तमरित्या डिझाइन केलेल्या मल्टी-चॅनेल दृष्टिकोनाच्या माध्यमातून विविध ग्राहक विभागांच्या गरजांची पूर्तता करण्याप्रती लिव्हप्युअरची क्षमता दिसून येते.
लिव्हप्युअरच्या श्रेणीनुसार वाढीमधून होम सोल्यूशन्स बाजारपेठेतील त्यांचे वाढते फूटप्रिंट दिसून येते. वॉटर प्युरिफायर विभागाने २६ टक्क्यांची वाढ केली, ज्यामधून श्रेणीमधील कंपनीच्या नेतृत्वाची पुष्टी मिळते. किचन अप्लायन्सेस विभागाने अपवादात्मक १४५ टक्के वाढ केली, तर एअर कूलर्स विभागाने उल्लेखनीय १५४ टक्के वाढ केली. कंपनीच्या डब्ल्यूएएएस विभागाने विकासगती कायम राखली, जेथे ४६ टक्के वाढ केली. यामधून सबस्क्रिप्शन-आधारित वॉटर सोल्यूशन्ससाठी वाढती ग्राहक पसंती दिसून येते.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्हणाले, ''आमच्या तिसऱ्या तिमाहीमधील निकालांमधून ग्राहकांचे जीवन संपन्न करणारे उच्च दर्जाचे सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती लिव्हप्युअरची समर्पितता निदर्शनास येते. तिसऱ्या तिमाहीमध्ये महसूलात ३४ टक्क्यांची अपवादात्मक वाढ आणि ईबीआयटीडीएमध्ये १४९ टक्के वाढ यामधून ग्राहकांचा आमच्या ब्रँडवर असलेला विश्वास दिसून येतो. आमचा सतत नाविन्यता, कार्यरत कार्यक्षमता व बाजारपेठ विस्तारीकरणावर फोकस आहे. रिलिव्ह सारख्या उपक्रमांसह आम्ही व्यवसाय यशस्वी होण्याला गती देत आहोत, तसेच समाजात अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणत आहोत. आम्ही पुढे जात आगामी संधींबाबत उत्सुक आहोत आणि प्रत्येक कुटुंबासाठी लिव्हप्युअर अनुभव अधिक उत्साहित करण्याप्रती कटिबद्ध आहोत.''