सॅमसंगकडून स्मार्ट कूलिंगला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या एआय वैशिष्ट्यांनी युक्त बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर सिरीज लाँच
कन्वर्टिबल ५-इन-१ मोड्स:
कन्वर्टिबल ५-इन-१ मोड्स अद्वितीय स्थिरता देतात, ज्यामुळे हे रेफ्रिजरेटर्स भारतातील कुटुंबाच्या वैविध्यपूर्ण गरजांसाठी अनुकूल आहेत. नॉर्मल, सीझनल, एक्स्ट्रा फ्रिज, व्हेकेशन आणि होम अलोन हे पाच मोड्स विशिष्ट स्थितींची पूर्तता करतात. या अनुकूलतेमधून सानुकूल ऊर्जा बचत आणि अधिकतम उपयुक्ततेची खात्री मिळते.
ट्विन कूलिंग प्लस™:
ट्विन कूलिंग प्लस™ तंत्रज्ञान फ्रेशनेस रिटेशन वाढवण्यासाठी आणि दुर्गंधी मिक्स होण्याला प्रतिबंध करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. दोन स्वतंत्र एव्हेपोरेटर्स आणि फॅन्सचा वापर करत ते फ्रिज व फ्रिझर कम्पार्टमेंट्ससाठी स्वतंत्र कूलिंग वातावरण ठेवते. यामुळे फळे व भाज्यांसाठी दुप्पट फ्रेशनेस आणि जवळपास ७० टक्के ओलावा टिकून राहतो. दुर्गंधीला दूर करत हे वैशिष्ट्य स्टोअर केलेल्या वस्तूंमधील नैसर्गिक फ्लेवर्स कायम ठेवते. हे वैशिष्ट्य दीर्घकाळापर्यंत फ्रेशनेस आणि हायजेनिक स्टोरेजचा शोध घेणाऱ्या कुटुंबांसाठी गेम-चेंजर आहे.
अॅक्टिव्ह फ्रेश फिल्टर+:
अॅक्टिव्ह फ्रेश फिल्टर+ सिस्टम प्रगत कार्यान्वित कार्बन फिल्ट्रेशनच्या माध्यमातून रेफ्रिजरेटरच्या आत शुद्ध आणि हायजेनिक हवा प्रसारित ठेवते. ही सिस्टम जवळपास ९९.९९ टक्के जीवाणूंना दूर करते आणि दुर्गंधीला प्रतिबंध करते, ज्यामधून फूड स्टोरेजसाठी आरोग्यदायी व निर्जंतुक वातावरणाची खात्री मिळते. तसेच, ही सिस्टम हवेला सतत निर्जंतुक करण्यासोबत दुर्गंधींना दूर करते, ज्यामधून आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांना मन:शांती मिळते.
पॉवर कूल आणि पॉवर फ्रिझ:
पॉवर कूल आणि पॉवर फ्रिझ फंक्शन्स त्वरित कूलिंग व फ्रिझिंग गरजांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. पॉवर कूल त्वरित फ्रिजचे तापमान कमी करते, जे पेये थंड करण्यासाठी आणि पदार्थ ताजी ठेवण्यासाठी अनुकूल आहे. पॉवर फ्रिझ त्वरित बर्फ तयार करते, तसेच फूड घटकांना फ्रिझ करते, ज्यामुळे हे वैशिष्ट्य पार्टी किंवा त्वरित गॅदरिंग्जसाठी अनुकूल आहे. एकत्रित, ही वैशिष्ट्ये कार्यक्षम रेफ्रिजरेशनची गरज असलेल्या व्यस्त जीवनशैलींसाठी त्वरित सोल्यूशन्स देतात.
डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर:
डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर कूलिंग मागण्यांनुसार आपोआपपणे गती समायोजित करत सतत व ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग देते. यामुळे रेफ्रिजरेटरमधील नुकसान कमी होते, तसेच आवाज व ऊर्जा वापर कमी होतो. २० वर्षांच्या वॉरंटीसह हा कॉम्प्रेसर अद्वितीय टिकाऊपणा व विश्वसनीयता देतो, ज्यामुळे दीर्घकालीन कार्यक्षमता व मन:शांतीसाठी अनुकूल आहे.