Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या ७०० हून अधिक लवकर डिलिव्‍हरीजसह विक्रम रचला

 बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या ७०० हून अधिक लवकर डिलिव्‍हरीजसह विक्रम रचला

 

  • बीकेसी स्‍टोअरमध्‍ये अद्वितीय क्‍यूरेटेड अनुभव आणि वास्‍तविक जीवनातील स्थितींमधून सॅमसंगची टॉप-ऑफ-द-लाइन प्रीमियम उत्‍पादने पाहायला मिळतात 
  • गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज डिवाईसेस आतापर्यंतची डिझाइन करण्‍यात आलेले सॅमसंगचे सर्वात प्रगत फ्लॅगशिप स्‍मार्टफोन्स आहेतजी 'खरे एआय सोबतीआहेत  

 

भारत - फेब्रुवारी २०२५: सॅमसंगच्‍या बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी) येथील फ्लॅगशिप स्‍टोअरने डिवाईसेसच्‍या लवकर डिलिव्‍हरीला सुरूवात करण्‍यासाठी स्‍पेशल इव्‍हेण्टसह नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजच्‍या यशाला साजरे केलेजेथे ७०० हून अधिक स्‍मार्टफोन्‍स देण्‍यात आले. बहुप्रतिक्षित स्‍मार्टफोन सिरीजच्‍या प्री-ऑर्डर्ससाठी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर या विक्रमी डिलिव्‍हरीची नोंद झाली आहे. 

 


सॅमसंग इंलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या एमएक्‍स डिव्हिजनचे कॉर्पोरेट कार्यकारी उपाध्‍यक्ष / विभागप्रमुख सून चोई व्‍यक्तिश: स्‍टोअरमध्‍ये उपस्थित होते. त्‍यांनी या सिरीजमधील स्‍मार्टफोन्‍स प्री-ऑर्डर केलेल्‍या काही ग्राहकांना गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेस दिले. 

 

या भव्य इव्‍हेण्‍टमध्‍ये स्‍टोअरच्‍या पहिल्‍या वर्धापन दिनाला देखील साजरे करण्‍यात आले. हे स्‍टोअर अद्वितीय क्‍यूरेटेड अनुभव आणि वास्‍तविक जीवनातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॅमसंगच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन प्रीमियम उत्‍पादनांना दाखवण्‍यासाठी प्रसिद्ध आहे.

 

ग्राहकांच्‍या गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आणि सुलभ अनुभवाच्‍या खात्रीसाठी स्‍टोअरमध्‍ये समर्पित डेटा ट्रान्सफर झोन्‍स व डिवाईस एक्‍स्‍चेंज काऊंटर्ससोबत स्‍वादिष्‍ट फूड व बेव्‍हरेज व्‍यवस्‍था देखील आहेत. या उपक्रमाचा प्रत्‍येक ग्राहकाला अपवादात्‍मक सेवा देण्‍याचा मनसुबा होताजेथे त्‍यांनी त्‍यांच्‍या नवीन गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेसची निवड केली.

 

सॅमसंग बीकेसी स्‍टोअरमध्‍ये गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेस पिक-अप करण्‍यासाठी येणा-या ग्राहकांना कॉम्‍प्‍लीमेण्टरी सेवांचा आनंद मिळेलजसे जेन-एआय स्‍मार्टफोन केस कस्‍टमायझेशनसमर्पित टेक एक्‍स्‍पर्टस् आणि अद्वितीय सेलिब्रेशन प्रोग्रामज्‍याचा ग्राहकांच्या शॉपिंग क्षणांना कॅप्‍चर करत स्‍पेशल बनवण्‍याचा मनसुबा आहे.

 

नवीन गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रागॅलॅक्‍सी एस२५+ आणि गॅलॅक्‍सी एस२५ स्‍मार्टफोन्‍स असलेली गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज सॅमसंगची आतापर्यंतची डिझाइन करण्‍यात आलेली सर्वात प्रगत फ्लॅगशिप स्‍मार्टफोन सिरीज आहेजी 'खरे एआय सोबतीआहे. ही सिरीज सॅमसंगचा नाविन्‍यतेचा वारसा आणि भारतातील व्‍यापक व विस्‍तारित होत असलेल्‍या ग्राहकवर्गाला एआय वितरित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या मिशनला अधिक दृढ करते.     

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.