Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सॅमसंग इंडियाकडून ऑसम इंटेलिजन्‍स असलेले गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी लाँच

 सॅमसंग इंडियाकडून ऑसम इंटेलिजन्‍स असलेले गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी लाँच

 

  • गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी यांची रुंदी फक्‍त ७.४ मिमी आहे
  • या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये विनासायास मल्‍टी-टास्किंगसाठी सुधारित कार्यक्षमता आहे
  • दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ४५ वॅट चार्जिंग पॉवर आणि सुपर फास्‍ट चार्ज २.० तंत्रज्ञान आहे

 


भारत - मार्च ४२०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ऑसम इंटेलिजन्‍स असलेले गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सर्जनशीलतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी अद्भुत सर्च व व्हिज्‍युअल अनुभव आहेत. ऑल-न्‍यू डिझाइनशैली असलेल्‍या नवीन गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सुधारित टिकाऊपणा व कार्यक्षमतातसेच प्रबळ सुरक्षितता आणि गोपनीयता संरक्षण देखील आहे.

 

ऑसम इंटेलिजन्‍स

गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मध्‍ये ऑसम इंटेलिजन्‍स उपलब्‍ध आहेजे भारतातील ग्राहकांसाठी एआयचे लोकशाहीकरण सक्षम करते. सर्वसमावेशक मोबाइल एआय सूट ऑसम इंटेलिजन्‍स प्रगत एआय वैशिष्‍ट्ये सादर करतेजसे गॅलॅक्‍सीची फॅन-फेव्‍हरेट एआय वैशिष्‍ट्ये. गुगलचे सुधारित सर्कल टू सर्च वैशिष्‍ट्ये फोनच्‍या स्क्रिनवरून सर्च व डिस्‍कव्‍हर अधिक सोपे करते. सर्कल टू सर्चमधील सुधारणांसह वापरकर्ते त्‍यांना ऐकायला येणारी गाणी त्‍वरित सर्च करू शकतातज्‍यासाठी अॅप्‍समध्‍ये स्विच करण्‍याची गरज भासणार नाही. त्‍यांच्‍या फोनमधून सोशल मीडियावर गाणे प्‍ले करायचे असो किंवा त्‍यांच्‍याजवळ असलेल्‍या स्‍पीकर्समधून ऐकू येणारे संगीत असोसर्कल टू सर्च कार्यान्वित करण्‍यासाठी फक्‍त नेव्हिगेशन बारवर लॉंग प्रेस करून ठेवात्‍यानंतर गाण्‍याचे नाव व आर्टिस्‍ट ओळखण्‍यासाठी म्‍युझिक बटनवर टॅप करा. 

 

ऑसम इंटेलिजन्‍समध्‍ये इंटेलिजण्‍ट व्हिज्‍युअल एडिटिंग वैशिष्‍ट्यांची श्रेणी देखील आहे, जसे ऑटो ट्रिमबेस्‍ट फेसइन्‍स्‍अण्‍ट स्‍लो-मो आणि इतर अनेक. ऑटो-ट्रिम व बेस्‍ट फेस फ्लॅगशिप-लेव्‍हल एआय वैशिष्‍ट्ये आहेतजी आता गॅलॅक्‍सी ए५६ ५जी सह लोकशाहीकरण होत आहेत. नवीन स्‍मार्टफोन्‍समध्‍ये ऑब्‍जेक्‍ट एरेजर देखील आहेजे वापरकर्त्‍यांना फोटोजमधून नको असलेले व्‍यत्‍यय काढून टाकण्‍याची सुविधा देते. तसेचफिल्‍टर्स फोटोंमधील रंग व स्‍टाइल्‍स बदलत सानुकूल फिल्‍टर निर्मिती करतेज्‍यामुळे वापरकर्ते मूड व आवडीनुसार अद्वितीय आणि वैयक्तिकृत इफेक्‍ट देऊ शकतात.

 

ऑसम डिझाइन

गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी ऑल-न्‍यू डिझाइन शैलीसह येतातजी आता गॅलॅक्‍सी ए सिरीजसाठी मापदंड स्‍थापित करते. नवीन डिझाइनशैलीमध्‍ये लिनियर फ्लोटिंग कॅमेरा मॉड्यूल आणि ‘रॅडियन्‍सप्रेरित कलर थीम आहे. गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी आतापर्यंतचे सर्वात स्लिम गॅलॅक्‍सी ए सिरीज डिवाईसेस आहेतज्‍यांची रुंदी फक्‍त ७.४ मिमी आहे.  

  


ऑसम डिस्‍प्‍ले

गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मध्‍ये उच्‍च दर्जाचासर्वोत्तम व्‍युइंग अनुभवासाठी डिझाइन करण्‍यात आलेला मोठा डिस्‍प्‍ले आहे. दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ६.७-इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह जवळपास १२०० नीट्सपर्यंत पोहोचणाऱ्या ब्राइटनेस लेव्‍हल्‍स आहेत. नवीन स्टिरिओ स्‍पीकर्स विशालसंतुलित साऊंडसह गाणी ऐकण्‍याच्‍या अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात.

 

ऑसम कॅमेरा

गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी स्‍मार्टफोन्‍स कॅमेरा अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातातजेथे गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मधील शक्तिशाली ट्रिपल-कॅमेरा सिस्‍टममध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेन लेन्‍स आणि १०-बीट एचडीआर फ्रण्‍ट लेन्‍स आहेज्‍यामधून आकर्षक व सुस्‍पष्‍ट सेल्‍फीज कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते. गॅलॅक्‍सी ए५६ ५जी मध्‍ये १२ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स आहे आणि नाइटोग्राफीमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेततसेच १२ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेऱ्यामध्‍ये लो नॉईज मोडची भर करण्‍यात आली आहे आणि अतिरिक्‍त वाइड कॅमेरा सपोर्ट आहेज्‍यामधून अंधुक प्रकाशात देखील आकर्षक फोटोज व व्हिडिओज कॅप्‍चर करता येतात.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.