*कोक झीरो आणि स्विगी इन्स्टामार्ट टायगर श्रॉफसोबत सहयोगाने देत आहेत इन्स्टण्ट रिफ्रेशमेंट*
नवी दिल्ली, २८ एप्रिल २०२५: कोका-कोला झीरो शुगर या नो कॅलरी बेव्हरेजने कुठेही सहजतेने रिफ्रेशमेंट देण्यासाठी स्विगी इन्स्टामार्टसोबत सहयोग केला आहे. कॅम्पेनचा चेहरा म्हणून लोकप्रिय बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफला पुन्हा एकदा आणत कोका-कोला झीरो शुगरने फक्त १० मिनिटांमध्ये अद्वितीय चवीचा आस्वाद देण्याप्रती आपली कटिबद्धता दृढ केली आहे.
टॅगलाइन 'लाइफ इंटरप्टेड, टेस्ट अनइंटरेप्टेड'सह सादर करण्यात आलेली ही कॅम्पेन अभिनेता असलेल्या दोन सर्वसमावेशक जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. पहिल्या जाहिरातीमध्ये हॉरर मूव्ही नाइटला रिकाम्या कोक ग्लासमुळे गोंधळ उडतो, पण टायगर स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून कोक झीरो ऑर्डर करतो आणि थंडगार पेयाचा आस्वाद घेत क्षणाला उत्साहवर्धक करतो. दुसऱ्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळते की, टायगरच्या रोमँटिक प्रस्तावाला त्याच्या भावाच्या मोठ्या आवाजामुळे व्यत्यय येतो. विचार करत तो कोक झीरो ऑर्डर करतो आणि काही मिनिटांमध्येच रिफ्रेशिंग पेय येते, ज्यानंतर क्षणामध्ये उत्साहाची भर होते. प्रत्येक जाहिरात जीवनातील दैनंदिन व्यत्ययांना कॅप्चर करते, तसेच दाखवते की स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून त्वरित कोका-कोला झीरो शुगर डिलिव्हर केले जाते. यामधून क्षण कोणताही असो चव कायम राहण्याची खात्री मिळते.
कोका-कोला टीएमचे वरिष्ठ संचालक कार्तिक सुब्रमण्यम म्हणाले, ''आजच्या काळातील ग्राहक मोठ्या प्रमाणात कमी कॅलरी असलेल्या किंवा जवळपास कॅलरी नसलेल्या पेयांचा शोध घेत आहेत. कोका-कोला झीरो शुगर साखरेशिवाय कोका-कोलाचा तोच रिफ्रेशिंग आणि उत्साहवर्धक अनुभव देते. स्विगी इन्स्टामार्टसोबतचा आमचा हा सहयोग या दिशेने पाऊल आहे, ज्यामधून खात्री मिळते की ग्राहक कोक झीरो ऑर्डर करण्यासोबत आस्वाद घेऊ शकतात, जेथे काही मिनिटांमध्येच त्यांना पेय डिलिव्हर केले जाते. ही कॅम्पेन उत्तम चव, सहज उपलब्धता आणि प्रत्येक क्षणामधील आनंदाबाबत आहे.''
कोका-कोला इंडियाचे चीफ कस्टमर ऑफिसर अभिषेक गुप्ता म्हणाले, ''क्विक कॉमर्स आधुनिक ग्राहकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय बनत आहे, जेथे ते सहज उपलब्धता आणि त्वरित समाधानाचा शोध घेतात. कोक झीरोसह आम्ही क्विक कॉमर्सवर डाएट्स व लाइट्स श्रेणी निर्माण करण्यासाठी स्विगीसोबत सहयोग केला आहे, तसेच व्यक्तींच्या त्यांच्या आवडत्या पेयांचा आस्वाद घेण्याच्या पद्धतीला नव्या उंचीवर घेऊन जात आहोत. यामुळे खात्री मिळते की, उत्तम चव आणि त्वरित डिलिव्हरी एकमेकांशी संलग्न असतील.''
स्विगी इन्स्टामार्टचे एसव्हीपी, चीफ बिझनेस ऑफिसर हरी कुमार गोपीनाथ म्हणाले, ''इन्स्टामार्टमध्ये आम्ही नेहमी ग्राहकांसाठी सर्वात नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याकरिता उत्सुक असतो, तसेच त्यांच्या सर्वसमावेशक पसंतींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. कोक झीरो साखरेशिवाय उत्तम चव देण्यामध्ये अग्रस्थानी आहे आणि आम्हाला इन्स्टामार्टच्या माध्यमातून ते पेय त्वरित उपलब्ध करून देण्याचा आनंद होत आहे. आमच्या विनासायास १०-मिनिट डिलिव्हरीच्या माध्यमातून ग्राहक अतिरिक्त कॅलरीशिवाय किंवा अधिक प्रतिक्षा न करता त्यांच्या आवडत्या पेयाचा आस्वाद घेऊ शकतात.''
या कॅम्पेनबाबत मत व्यक्त करत टॅलेंटेडमधील क्रिएटिव्ह्ज संकेत औधी आणि जावेद अहमद म्हणाले, ''क्विक कॉमर्स गतीशीलपणे तुमच्या कार्टमध्ये वस्तूंची भर करण्यासारखे आहे, जेथे कोक झीरो आणि ट्रायपॉडचा एकत्र वापर करणे कदाचित अर्थपूर्ण नसेल, पण त्या उत्स्फूर्ततेमध्ये आनंद सामावलेला असतो. क्विक कॉमर्स ब्रँड्सवर मोठ्या प्रमाणात काम केले असल्याने आम्हाला उत्साही ट्विस्टसाठी दैनंदिन क्षणांमध्ये कोक झीरोचा आस्वाद देण्याचे महत्त्व माहित आहे. रायन मेनडोन्का यांच्या विनोदी दिग्दर्शनासह जवळपास रिकाम्या ग्लासचा वावर यापेक्षा अधिक मनोरंजनपूर्ण कधीच नव्हता, कारण जीवन परिपूर्ण भागिदारीसाठी कधीच थांबत नाही.''
डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर ही कॅम्पेन राबवण्यात येईल, ज्यामधून अधिकतम पोहोच आणि सहभागाची खात्री मिळते. कोका-कोला झीरो शुगरच्या स्वादिष्ट चवीसह स्विगी इन्स्टामार्टच्या रॅपिड डिलिव्हरीला एकत्र करत हा सहयोग विनासायास रिफ्रेशमेंट पूर्वीपेक्षा अधिक सहजसाध्य करतो.