*इंडियन कॉर्पोरेट गव्हर्नन्स स्कोअरकार्ड २०२४ मध्ये एचडीएफसी लाइफ ठरली ‘नेक्स्ट लीडर’*
मुंबई, २९ एप्रिल २०२५: भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाईफला ३१ डिसेंबर २०२४ रोजी संस्थात्मक गुंतवणूकदार सल्लागार सेवा (आयआयएएस)द्वारे आयोजित केलेल्या भारतीय कॉर्पोरेट गव्हर्नन्स मूल्यांकनात 'नेक्स्ट लीडर' म्हणून मान्यता मिळाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हे कंपनीच्या पारदर्शकता, जबाबदारी आणि अनुकरणीय प्रशासन पद्धतींबद्दलच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
एचडीएफसी लाईफ आपल्या प्रवासाच्या २५व्या वर्षात प्रवेश करत असताना ही मान्यता कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या सर्वोच्च दर्जाची पावती ठरली आहे. भारतीय कॉर्पोरेट गव्हर्नन्स स्कोअरकार्ड आराखड्यावर आधारित बीएसई १०० कंपन्यांच्या वार्षिक मूल्यांकनाचा निकाल असलेल्या या प्रतिष्ठित यादीचा भाग म्हणून एचडीएफसी लाईफला सलग चौथ्या वर्षी स्थान देण्यात आले आहे.
आयएफसी, बीएसई आणि आयआयएएस यांनी संयुक्तपणे विकसित केलेले हे स्कोअरकार्ड फ्रेमवर्क कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या जी२०/ओईसीडी तत्त्वांवर आधारित असून २०१५ पासून वापरात आहे.
यानिमित्ताने बोलताना एचडीएफसी लाईफचे जनरल कौन्सिल, मुख्य अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव नरेंद्र गांगण म्हणाले, "या प्रतिष्ठित यादीचा भाग असल्याचा आम्हाला आनंद आहे. एचडीएफसी लाइफमध्ये आमच्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणे ही एक जीवनशैली आहे. आम्ही पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी)च्या सर्व पैलूंबाबत आमच्या वचनबद्धतेशी खरे राहण्याचा प्रयत्न करतो. भारतीय नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचा आमचा प्रवास कायम ठेवत असताना आणि '२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा' हे उद्योगाचे सामूहिक ध्येय साध्य करण्यासाठी काम करत असताना आम्ही हा गौरव नम्रपणे स्वीकारतो.