देखभालीच्या कमी खर्चासह इलेक्ट्रिक वाहने भारताचे भविष्य
मुंबई, २९ एप्रिल २०२५: भारतात इलेक्ट्रिक वाहने (इव्ही) विकत घेण्याचे प्रमाण वाढते आहे, याचे कारण आहे, पारंपरिक इंटर्नल कंबस्चन इंजिनाच्या (आयसीई) तुलनेत यातून होणारा मूल्य लाभ. वाहन विकत घेताना थोडी जास्त किंमत द्यावी लागत असली, तरी त्यातून होणारे दीर्घकालीन फायदे पाहता शाश्वत आणि किफायतशीर मोबिलिटी सोल्यूशन्सच्या शोधात असणाऱ्या खरेदीदारांसाठी इव्ही एक अधिक चांगला पर्याय ठरतो. इव्ही आणि आयसीई मॉडेल्सच्या तुलनेत मूल्य समानता आणण्याच्या बाबतीत टाटा.इव्ही आघाडीवर आहे. चालवण्याच्या आणि देखभालीच्या कमी खर्चासह इलेक्ट्रिक वाहनेच आता भविष्य आहेत आणि तीच कार मालकीच्या अर्थकारणाची नवीन व्याख्या करत आहेत.
इव्ही मधील आर्थिक फायदा
इव्हीच्या मालकीशी संबंधित खर्चांचा बारकाईने अभ्यास केल्यास, असे दिसून येते की, वेगवेगळ्या आघाड्यांवर लक्षणीय बचत होते. नेक्सॉन.इव्ही सारख्या मॉडेल्सचा एकूण संपादन खर्च अधिकाधिक स्पर्धात्मक होत आहे, कारण बॅटरीच्या किंमती कमी होत आहेत. समकक्ष पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि सीएनजी वाहनांशी तुलना केल्यास नेक्सॉन.इव्ही एक अधिक चांगला मूल्य प्रस्ताव सादर करते आणि उपभोक्त्यांच्या व्यापक श्रेणीसाठी इव्ही सहजप्राप्य बनवते.
प्रारंभिक खरेदीनंतर, इव्हीचे मूल्य लाभ आता आणखी स्पष्ट दिसू लागले आहेत. आयसीई वाहनात इंधन भरण्यापेक्षा इव्ही चार्जिंग करणे हे लक्षणीयरित्या स्वस्त आहे. शिवाय, या वाहनात हालचाल करणारे भाग कमी असल्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो, त्यामुळे एक किफायती पर्याय म्हणून इव्ही आणखी आकर्षक वाटतात. त्यात, रूफटॉप सोलर सिस्टम बसवली, तर बचत आणखीनच वाढते आणि इव्हीचे मालक शून्य खर्चात मोबिलिटी साध्य करू शकतात आणि चार्जिंगसाठी अक्षय ऊर्जेचा वापर करून ऊर्जेच्या खर्च देखील वाचवू शकतात. असे केल्यास, इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अंगिकार करणे आणखीन फायदेशीर ठरते.
वाहनच्या डेटा अनुसार, इलेक्ट्रिक प्रवासी वाहन सेगमेन्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये रिटेल विक्री ८९,००० गाड्यांच्या वर पोहोचली असून मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ २२% आहे. या वृद्धीमधून इव्ही बाजारातील व्यापक ट्रेंड दिसतो, ज्यात एकूण १९ लक्ष युनिट्स विकली गेली आहेत, जी एकंदर २७% वृद्धी दर्शवितात. आर्थिक फायद्यांच्या व्यतिरिक्त, इव्हीमध्ये उपभोक्त्यांची वाढती रुची उत्पादक आणि सरकारी उपक्रम या दोहोंच्या समर्थनाने प्रेरित आहे.
प्रीमियम हायब्रिड आणि सीएनजी पर्यायांच्या तुलनेत इव्ही संपादन खर्चात लक्षणीय बचत दर्शवितात जी किफायतशीरता आणि शाश्वतता याबाबतच्या उपभोक्त्यांच्या प्रथमिकतेशी सुसंगत आहे.
रेंज आणि इंधन खर्चाची तुलना
इव्हीचा आणखी एक उल्लेखनीय फायदा म्हणजे त्यांची क्षमता आणि इंधनाचा कमी खर्च. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाशी तुलना केल्यास, प्रति किलोमीटर कमी ऊर्जा खर्चासह इव्ही उठून दिसतात. आपला दैनिक प्रवास खर्च कमी करू इच्छिणाऱ्या उपभोक्त्यांसाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
मालकीचा खर्च म्हणजे काय याचे तपशीलवार स्पष्टीकरण
आपल्या मालकीची इव्ही असल्याचा एक मोठा फायदा म्हणजे दैनंदिन संचालन खर्चातील लक्षणीय घट. इंधनाचा खप आणि देखभालीचे तपशील तपासल्यास हे स्पष्ट होईल.
नेक्सॉन.इव्हीसाठी दैनिक इंधनाचा खर्च केवळ ४३.६२ रु. आहे, जो पेट्रोल वाहनासाठी ३०३.२९ रु. आणि समकक्ष डिझेल वाहनासाठी १९१.३४ रु. आहे. येथेच इव्हीचा मोठा आर्थिक फायदा नजरेत भरतो. यानुसार, इंधनाचा वार्षिक खर्च नेक्सॉन.इव्हीसाठी १५,७०३ रु. होतो तर पेट्रोल आणि डिझेल गाड्यांसाठी अनुक्रमे १,०९,१८४ रु. आणि ६८,८८३ रु. होतो. सीएनजीसाठी हा खर्च ५४,३३२ रु. होतो. त्याबरोबर देखभालीचा कमी खर्च देखील विचारात घेतला तर इव्ही एक किफायतशीर सोल्यूशन देतात. त्या केवळ पैसे वाचवत नाहीत, तर मालकीचा एकंदर अनुभव देखील अधिक चांगला करतात.