Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फेडएक्सचा ‘एसएमई कनेक्ट’ उपक्रम

 फेडएक्सचा ‘एसएमई कनेक्ट’ उपक्रम

~ लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम केले ~


मुंबई, १४ मे २०२५: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) ही जगातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी मुंबई येथील लघु आणि मध्यम (एसएमई) उद्योगांना नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम बनवत आहे. त्यासाठी फेडएक्स एसएमई कनेक्ट हा उपक्रम चालवत आहे, ज्यामध्ये उभरत्या व्यवसाय केंद्रांमध्ये अनुरूप लॉजिस्टिक्स, डिजिटल साधने आणि धोरणात्मक विचार आणले जात आहेत.


फेडएक्सचे मिडल ईस्‍ट इंडियन सबकॉन्टिनण्‍ट व आफ्रिकामधील मार्केटिंग, कस्टमर एक्सपिरियंस आणि एअर नेटवर्कचे उपाध्‍यक्ष नितीन नवनीत ताटीवाला म्हणाले, “एसएमईजच्या महत्त्वाकांक्षा वाढत आहेत तशी आमची गती देखील आम्ही स्मार्ट सोल्यूशन्स, दमदार इन्फ्रास्ट्रक्चर आणि वाढीव सहभागासह वाढवत आहोत. आमच्या एसएमई कनेक्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही केवळ पॅकेजिसची डिलिव्हरी करत नाही, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आम्ही एसएमईजना महत्त्वाकांक्षी बनवत आहोत.”




२०१९ मध्ये लॉन्च झालेला एसएमई कनेक्ट प्रारंभी एक ज्ञान सामाईक करणारा मंच होता, जो आता एक गतिशील प्रचार प्लॅटफॉर्म झाला आहे. आर्थिकवर्ष २०२५ मध्ये, अधिक व्यक्तीविशिष्ट पद्धतीने, त्यांच्या लाइफ सायकलशी आणि क्षेत्राच्या आव्हानांशी सुसंगत राहून व्यवसायांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच आजच्या डिजिटल युगात त्यांना भरभराटीच्या जागतिक संधीशी जोडण्यासाठी फेडएक्सने संपर्क, अनुभव आणि मंत्रा हे नवीन फॉरमॅट दाखल केले. हे प्रयत्न इन्व्हेस्ट इंडिया आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालयच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टआणि डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हबसारख्या राष्ट्रीय उपक्रमांना देखील समर्थन देतात आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रादेशिक निर्यात केंद्रे आणि क्षेत्र-विशिष्ट विकासाला चालना देतात. आजपर्यंत एसएमई कनेक्टने देशातील ५५ शहरांत आयोजित ५८ आवृत्त्यांच्या माध्यमातून ५००० पेक्षा जास्त एसएमई ग्राहक आणि संभाव्य ग्राहक जोडले आहेत.


फेडएक्सने आपल्या दमदार नेटवर्कद्वारे मुंबई च्या उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले आहे. या नेटवर्कमध्ये आता भारताततून ये-जा करणारी २३ साप्ताहिक उड्डाणे आहेत. फेडएक्स इंटरनॅशनल प्रायॉरिटीद्वारे महत्त्वाची शिपमेंट्स अवघ्या २-३ व्यावसायिक दिवसांत महत्त्वाच्या मार्केट्समध्ये पोहोचतात. फेडएक्स इंटरनॅशनल प्लसद्वारे एएमइए बाजारपेठांमध्ये कार्यरत असलेले किफायतशीर आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स शिपिंग ज्यात १-३ दिवसांत डिलिव्हरी पोहोचवली जाते. शिवाय, मुंबई येथील एसएमइज   साठी संचालन सुलभ करून एंड-टू-एंड व्हिजिबिलिटी वाढवण्यात मदत करण्यासाठी फेडएक्स डिजिटल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.