Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कोक स्‍टुडिओ भारतने 'पंजाब वेख के'सह सर्व तीन गाणी सादर*

 *कोक स्‍टुडिओ भारतने 'पंजाब वेख के'सह सर्व तीन गाणी सादर* 


राष्‍ट्रीय, २०२५: कोक स्‍टुडिओ भारत या विविध संगीत शैलींच्‍या संयोजनाला साजरे करणाऱ्या आयकॉनिक मंचाने त्‍यांच्‍या तिसऱ्या सीझनचे तिसरे गाणे - पंजाब वेख के सादर केले आहे. जस्‍सा धिल्‍लों, गुलाब सिंधू, रागिंदर आणि थियाराजक्षित या चौघांनी आवाज दिलेले हे गाणे अद्वितीय उत्‍साह असलेली भूमी पंजाबच्‍या वैविध्‍यपूर्ण पैलूला सादर करते. मिट्टी की खूशबूमध्‍ये प्रत्‍येक ताल सामावलेला असलेले हे गाणे पंजाबच्‍या अतूट ऊर्जेला साजरे करते, जेथे त्‍याच्‍या अभिमानामध्‍ये साहस, त्‍याच्‍या पैलूमध्‍ये निष्‍ठा आणि त्‍याच्‍या स्थिरतेमध्‍ये कालातीत महत्त्व समाविष्‍ट आहे.  

पंजाब वेख के लोकांप्रती हृदयस्‍पर्शी मानवंदना आहे, म्‍हणजेच प्रत्‍येक व्‍यक्‍ती, जी पंजाबचा उत्‍साह, अभिमान आणि कालातीत परंपरा यांसह जगते. हे गाणे गीतात्‍मक प्रवास आहे, जो धैर्य व वारसासह संस्‍कृती, समुदाय आणि महत्वाला साजरे करतो. पंजाब वेख के वारसा व अभिव्‍यक्‍तीला सादर करते, ज्‍यामध्‍ये काव्‍यात्‍मक अभिमान आणि आपलेपणाची प्रबळ भावना यांचे संयोजन आहे. सर्वत्र एकता व प्रेमाचे वातावरण असलेल्‍या पंजाबच्‍या कालातीत प्रदेशामध्‍ये स्थित हे गाणे लोकसंगीत आणि समकालीन रिदम्‍सचे मधुरमय फ्यूजन आहे, ज्‍यामधून भावना, धैर्य आणि मानवता व्‍यक्‍त होते. गाण्‍याच्‍या गीतरचनेमधून भूमीचे वैविध्‍यपूर्ण पैलू सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आले आहेत, जेथे मिट्टी म्हणजेच मातीमध्‍ये अभिमानाच्‍या गाथा आहेत आणि वातावरणामधून आशा व सुसंगतेचा उत्‍साह दिसून येतो. पण यापलीकडे, गाणे परतफेड करण्‍याच्‍या पंजाबी तत्त्वांना प्रशंसित करते, ती तत्त्वे म्‍हणजे मानवतेसाठी खंबीरपणे उभे राहणे, समानतेचा अवलंब करणे आणि जात, दर्जा व भितीपलीकडे जाणारी नाती निर्माण करणे.  

तुंबी-प्रेरित पोत, सखोल ताल आणि सर्वोत्तम गीतात्मक कथाकथन यांचे संयोजन असलेल्या साउंडस्केपसह कोक स्टुडिओ भारत लँडस्केप तयार करतो, जे मूळ असण्‍यासोबत तितकेच उत्साहवर्धक देखील आहे.

कोका-कोला इंडियाचे आयएमएक्‍स लीड शंतनू गांगणे म्‍हणाले, ''कोक स्‍टुडिओ भारत’चा हा सीझन समकालीनसह परंपरा घडवण्‍याच्‍या संकल्‍पनेमध्‍ये सामावलेला आहे, जो भारताचा सांस्‍कृतिक वारसा आणि आजच्‍या साऊंडस्‍केपला एकत्र आणतो. या गाण्‍यासह आम्‍ही पंजाबच्‍या पैलूला सादर केले आहे, जेथे ही भूमी नेहमी ताकद, उत्‍साह आणि कथाकथनाची प्रतीक राहिली आहे. गुलाब सिंधू, जस्‍सा धिल्‍लों, रागिंदर आणि थियाराजक्षित यांसारख्‍या आर्टिस्‍ट्सना प्‍लॅटफॉर्म देत आम्‍ही भावी पिढीपर्यंत हस्‍तांतरित होईल अशा पद्धतीने वारसाला सादर करण्‍यासाठी नवीन व अननुभवी गायकांना सक्षम करत आहोत.''



जस्‍सा धिल्‍लों म्‍हणाले, ''कोक स्‍टुडिओ भार’तचा भाग असणे मोठा सन्‍मान आहे आणि आम्‍हाला प्रादेशिक गायकांना प्राधान्‍य देणाऱ्या प्‍लॅटफॉर्मवर आमच्‍या गाथा सादर करण्‍याने अत्‍यंत सन्‍माननीय वाटते. हे गाणे उत्तम असण्‍यासोबत पंजाबी आहे, जे प्रत्‍यक्ष मनाला भिडते आणि प्रत्‍येक ताल व गीतामधून आमचे पैलू दिसून येतात.'' 

गुलाब सिंधू म्‍हणाले, ''मला आवडणाऱ्या भूमीबाबत गाणे सादर करणे नेहमी माझ्या मनाच्‍या जवळ राहिले आहे आणि 'पंजाब वेख के'सह मला काही अविश्‍वसनीय प्रतिभावान आर्टिस्‍ट्ससोबत ही इच्‍छा पूर्ण करण्‍याचा सन्‍मान मिळाला. कोक स्‍टुडिओ भारत आम्‍हाला आमच्‍या संस्‍कृतीला जागतिक स्‍तरावर घेऊन जाण्‍यास मदत करत आहे आणि ते आमच्‍यासाठी खूप महत्त्वाचे आहे.'' 

रागिंदर म्‍हणाले, ''कोक स्‍टुडिओ भारत’चा भाग असणे सर्जनशीलरित्‍या समाधानकारक आहे. प्रत्‍येक साऊंडमधून परंपरा दिसून येणारा प्‍लॅटफॉर्म मिळणे अत्‍यंत दुर्मिळ आहे.'' 

थियाराजक्षित म्‍हणाले, ''हे संगीत घडवण्‍यापेक्षा अधिक होते, तसेच यामधून समुदायाला सादर करण्‍यासोबत भावना व्‍यक्‍त करण्‍याची संधी मिळाली. कोक स्‍टुडिओ भारतने आम्‍हाला योग्‍य गोष्‍टी करण्‍यास प्‍लॅटफॉर्म दिला आणि हे आशीर्वाद मिळाल्‍यासारखे आहे.'' 

कोक स्‍टुडिओ भारत सीझन ३ सुरू होत असताना अनेक गाथांची अपेक्षा करा, जे संबंधांना चालना देतील, सर्वोत्तम गायक, प्रांत आणि पिढ्यांना एकाच सर्वोत्तम, विकसित होत असलेल्‍या साऊंडस्‍केपमध्‍ये एकत्र आणतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.