टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू अल्ट्रोज लाँच
~ ६.८९ लाख रूपये इतक्या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध ~
मुंबई, २२ मे २०२५: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू अल्ट्रोजच्या लाँचची घोषणा केली, जिची सुरूवातीची किंमत ६.८९ लाख रूपये आहे. आकर्षक डिझाइन, लक्झरीअस इंटीरिअर्स आणि प्रगत वैशिष्ट्यांसह प्रीमियमनेसच्या नवीन युगामध्ये प्रवेश करत ऑल-न्यू अल्ट्रोज लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, तसेच प्रीमियम डिझाइन, अद्वितीय सुरक्षितता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि थरारक कार्यक्षमता या मुलभूत आधारस्तंभांवर निर्माण करण्यात आली आहे. नवीन एक्स्टीरिअर व लक्झरीअस तंत्रज्ञान-संपन्न केबिनपासून सुधारित कनेक्टीव्हीटी आणि विस्तारित मल्टी-पॉवरट्रेन लाइन-अपपर्यंत - जे आता पहिल्यांदाच एएमटी पर्यायामध्ये देखील आहे - अल्ट्रोज दैनंदिन ड्राइव्ह्जना असाधारण प्रवासामध्ये बदलण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
अल्ट्रोजने प्रीमियम हॅचबॅक विभागामध्ये बेंचमार्क म्हणून स्वत:चा दर्जा स्थापित केला आहे. ५-स्टार जीएनसीएपी रेटिंग मिळणारी पहिली व तिच्या श्रेणीमधील एकमेव असलेल्या या कारने सुरूवातीपासून सुरक्षिततेमध्ये नवीन मानक स्थापित केले आहेत. या प्रबळ पायाला अधिक दृढ करत ऑल-न्यू अल्ट्रोजने आता प्रीमियमनेसच्या आकर्षक नवीन अभिव्यक्तीसह स्तर उंचावला आहे. या कारमध्ये सेगमेंट-फर्स्ट डिझाइन घटक आहेत, जसे आकर्षक डोअर हँडल्स व इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स, तसेच ल्युमिनेट एलईडी हेडलॅम्प्ससह एकीकृत डीआरएल आणि आकर्षक ३डी फ्रण्ट ग्रिल कारच्या रस्त्यावरील उपस्थितीमध्ये अधिक आकर्षकतेची भर करते. आतील बाजूस, एक्झिक्युटिव्ह लाऊंज-स्टाइल रिअल सीट्ससह सुधारित थाय सपोर्ट, सॉफ्ट-टच ग्रँड प्रीस्टिजिया डॅशबोर्ड, अॅम्बियण्ट लायटिंग आणि एैसपैस जागा एकत्रित केबिनमध्ये उत्साहवर्धक अनुभव देतात.
टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, “गेल्या ५ वर्षांमधील आमचा प्रवास झपाट्याने होत असलेला विकास व परिवर्तनामधून दिसून येतो. आम्ही पुढे जात असताना आर्थिक वर्ष २६ वाढीव फायद्याचे असण्याचे असण्यासोबत मोठी झेप घेणारे आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये १ दशलक्षहून अधिक प्रीमियम हॅचेसची विक्री होण्यासह आम्हाला विश्वास आहे की, हॅचबॅक्स भारतातील गतीशीलता क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भाग राहतील.
आज, आम्हाला अल्ट्रोजच्या नवीन व्हर्जनसह प्रीमियम हॅचबॅक्समध्ये आकर्षक नवीन चॅप्टर सादर करण्याचा अभिमान वाटतो. २०२५ एडिशन अल्ट्रोजला अधिक लक्षवेधक बनवते, जेथे या वेईकलमध्ये समकालीन डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता-केंद्रित दृष्टिकोनाचे विनासायास संयोजन आहे. यामधून आजचे प्रीमियम हॅच ग्राहक शोधत असलेल्या सुविधा दिसून येतात, त्या म्हणजे आधुनिक स्टायलिंग, प्रीमियम अनुभव, तंत्रज्ञान संपन्न वैशिष्ट्ये, उच्च स्तरीय सुरक्षितता आणि पॉवरट्रेन पर्यायांची व्यापक श्रेणी. ड्रायव्हिंग अनुभव उत्साहित करण्यासाठी प्रत्येक घटक काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे. ऑल-न्यू अल्ट्रोज तिच्या मालकांना ‘फिल स्पेशल' अनुभव देईल.''
पेट्रोल, सेगमेंटमधील एकमेव डिझेल आणि टाटा मोटर्सचे आघाडीचे आयसीएनजी ट्विन सिलिंडर तंत्रज्ञानामध्ये ऑफर करण्यात आलेली ऑल-न्यू अल्ट्रोज विविध ट्रान्समिशन पर्यायांमध्ये देखील उपलब्ध असेल: ५-स्पीड मॅन्युअल, सुधारित ६-स्पीड डीसीए आणि नवीन ५-स्पीड एएमटी, ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सोयीसुविधा मिळेल.
गतीमध्ये फिल स्पेशलचा अनुभव घ्या - प्रत्येक जीवनशैलीसाठी पॉवरट्रेन पर्याय:
ऑल-न्यू अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी या पॉवरट्रेन्सच्या सर्वसमावेशक श्रेणीमध्ये, तसेच डीसीए व एएमटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्समध्ये ऑफर करण्यात आलेली भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. यामधून शहरातील प्रभावी प्रवासासाठी उत्साहवर्धक ड्राइव्ह अनुभवाची खात्री मिळते.
• १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल (मॅन्युअल, डीसीए व नवीन एएमटी) - सुधारित ड्रायव्हिंगक्षमतेसह वैविध्यपूर्ण ट्रान्समिशन पर्याय
o १.२ लिटर आयसीएनजीसह ट्विन-सिलिंडर टेक - भारतातील सर्वात प्रगत सीएनजी सिस्टमसह एैसपैस बूट स्पेस आणि प्रीमियम वैशिष्ट्ये
• १.५ लिटर रेवोटॉर्क डिझेल - भारतातील एकमेव डिझेल हॅचबॅक, जी उच्च टॉर्क आणि महामार्गावर प्रभावी क्रूझिंग देते.
सोयीसुविधा, कार्यक्षमता किंवा रोमांचपूर्ण ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा असो अल्ट्रोज सर्वकाही देते, ज्यामुळे अस्सल सेगमेंट लीडर आहे.
प्रत्येक वळणावर सुरक्षिततेसह फिल स्पेशलचा अनुभव घ्या:
विश्वसनीय अल्फा आर्किटेक्चरवर निर्माण करण्यात आलेल्या अल्ट्रोजने भारतातील सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक असण्याचा वारसा कायम ठेवला आहे. सुरक्षितता वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
• ६ एअरबॅग्ज आणि प्रमाणित म्हणून ईएसपी
• डायमंड स्ट्रेन्थ सेफ्टी शील्ड - सुधारित रचनात्मक प्रबळतेसह सुधारित क्रम्पल झोन्स
• एसओएस कॉलिंग फंक्शन (ई-कॉल/बी-कॉल)
• ISOFIX माऊंट्स, हिल होल्ड असिस्ट, एलईडी फॉग लॅम्प्ससह कॉर्नरिंग आणि इतर अनेक
ऑल-न्यू अल्ट्रोज आकर्षक डिझाइन परिवर्तन, आकर्षक इंटीरिअर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वारसाला नव्या उंचीवर घेऊन जाते, तसेच अत्याधुनिकता, वैविध्यता, एैसपैस जागा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये देते. तरूण, आधुनिक व महत्त्वाकांक्षी ड्रायव्हर्ससाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेली ऑल न्यू अल्ट्रोज प्रत्येक वळणावर प्रभावित करते. याव्यतिरिक्त, मल्टी-फ्यूएल पॉवरट्रेन पर्याय कार्यक्षमता व रोमांचचे परिपूर्ण संतुलन देते, ज्यामुळे ही वेईकल खरीखुरी सेगमेंट लीडर आहे.