लेजेंडर स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल जुलैमध्ये होणार लाँच
मुंबई, २१ मे २०२५: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड्सपैकी एक असलेल्या झेलिओ ई मोबिलिटीने आपल्या लोकप्रिय लेजेंडर स्कूटरच्या फेसलिफ्ट मॉडेलच्या आगामी लाँचची घोषणा केली आहे. आकर्षक नवीन डिझाइन, रंगांचे ताजे पर्याय आणि सुधारित वैशिष्ट्यांसह, हे नवीन लेजेंडर कमी वेगाच्या इलेक्ट्रिक स्कूटर विभागात झेलिओची पकड अधिक मजबूत करण्यासाठी तयार आहे. जुलै २०२५ मध्ये सादर होणारे लेजेंडर फेसलिफ्ट हे उत्तम कार्यक्षमता, किफायतशीर किंमत आणि आकर्षक शैलीचे उत्तम मिश्रण आहे जे भारताच्या बदलत्या शहरी वाहतूक गरजांना पूर्णपणे जुळणारे आहे.
लेजेंडरमध्ये कार्यक्षम ६०/७२व्ही बीएलडीसी मोटर आहे आणि ती प्रति चार्जिंग केवळ १.५ युनिट वीज वापरते, ज्यामुळे रोजच्या प्रवासासाठी हा एक पर्यावरणपूरक पर्याय ठरतो. नवीन रूपात येणारे लेजेंडर २५ किमी/तास इतका कमाल वेग आणि एका चार्जमध्ये १५० किमी पर्यंतची रेंज देईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे त्याची विश्वासार्हता आणि कमी खर्चिक वाहन म्हणून असलेली ओळख कायम राहील.
नवीन मॉडेलमधील खास गोष्ट म्हणजे त्याचे आकर्षक आणि नवीन ग्राफिक्स. यासोबतच आधुनिक बॉडी स्टाइलिंग आणि स्पोर्टी बोल्ड लूक देण्यात आला आहे, जो खास करून तरुण आणि स्टायलिश रायडर्सना आकर्षित करण्यासाठी निवडण्यात आला आहे.
झेलिओ ई मोबिलिटी लि. चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, "लेजेंडर नेहमीच आमच्याकडील लोकप्रिय स्कूटरपैकी एक राहिली आहे. तिच्या कार्यक्षमतेमुळे, विश्वासार्हतेमुळे आणि रोजच्या वापरासाठी ती नेहमीच आवडली गेली आहे. आता, नवीन रूपात लेजेंडर अधिक प्रभावी, आकर्षक आणि आजच्या रायडर्सच्या अपेक्षांना अधिक जुळणारी बनून परत आली आहे. आमच्या ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाला आणि प्रेमाला आमचा हा छोटासा प्रतिसाद आहे. तसेच, इलेक्ट्रिक मोबिलिटीला स्टायलिश, सोपे आणि भविष्यासाठी तयार करण्याच्या आमच्या प्रवासातील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे."