Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स करिअर प्रगतीबाबत अधिक सजग

 भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स करिअर प्रगतीबाबत अधिक सजग


~ स्वतःच्या खर्चावर नव्या स्किल्स शिकण्याकडे कल: टीमलीज एडटेक ~


मुंबई, १७ जून २०२५: भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स आता त्यांच्या करिअर प्रगतीबाबत अधिक सजग झाले आहेत आणि नवे कौशल्य शिकण्याची (अपस्किलिंगची) जबाबदारी स्वतः स्वीकारत आहेत, असे टीमलीज एडटेकच्या नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. “अपस्किलिंगचा परफॉर्मन्स अप्रेजलवर परिणाम” या अहवालानुसार, केवळ २३.९% नियोक्त्यांनी अपस्किलिंगसाठी पूर्ण प्रायोजन केले, तर तब्बल ४६% कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चावर नव्या स्किल्स शिकण्याचा निर्णय घेतला. 

या अभ्यासात टेक्नोलॉजी, फायनान्स, सेल्स, ऑपरेशन्स आणि मानवसंसाधन क्षेत्रातील १४,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया समाविष्ट आहेत. त्यानुसार ८४% कर्मचाऱ्यांनी मागील वर्षात काही ना काही प्रकारचे अपस्किलिंग केले, जे दीर्घकालीन करिअर नियोजन आणि भविष्यातील तयारीसाठी केले गेले.




६४% पेक्षा अधिक जणांनी सांगितले की, अपस्किलिंगचा त्यांच्या अप्रेजलवर थेट सकारात्मक परिणाम झाला. विशेष म्हणजे ४२% जणांना अपस्किलिंग केल्यानंतर केवळ १८ महिन्यांत प्रमोशन, जबाबदारी वाढ किंवा पगारवाढ मिळाली. ४०% पेक्षा अधिक प्रतिसादकर्त्यांनी नमूद केले की त्यांनी अपस्किलिंग मुद्दाम अप्रेजल जवळच्या कालावधीत केले, जेणेकरून त्याचा जास्त प्रभाव पडेल.

ज्या व्यावसायिकांनी अपस्किलिंग केली, त्यांना अप्रेजलमध्ये, ज्यांनी कोणतेही नवे कौशल्य आत्मसात केले नाही अशा लोकांपेक्षा चांगले परिणाम मिळाले. टेक्नॉलॉजी व फायनान्स क्षेत्रातील कर्मचारी सर्वाधिक स्वखर्ची अपस्किलिंग करणारे (७८.३%) ठरले, जे अनेकदा संस्थेच्या मदतीशिवाय करत होते. दुसरीकडे, विक्री व मार्केटिंगमधील ८०% जणांनी अल्पकालीन सर्टिफिकेट्स आणि ऑनलाइन ट्यूटोरियल्सला प्राधान्य दिले, जे "जस्ट-इन-टाइम" आणि कमी खर्चिक शिक्षण प्रकारांचा वाढता वापर दर्शवते.

टीमलीज एडटेकचे संस्थापक व सीईओ शांतनू रूज म्हणाले, “या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट होते — जे कर्मचारी पुढाकार घेतात, विशेषतः जे स्वतःच्या शिक्षणात गुंतवणूक करतात, त्यांना केवळ नवीन कौशल्येच नाहीत तर ओळख, जबाबदारी आणि खरी करिअर प्रगतीही मिळते. संस्थांसाठी हा एक इशारा आहे की त्यांनी कर्मचाऱ्यांची संस्थेशी निष्ठा वाढवण्यासाठी संरचित अपस्किलिंगमध्ये अधिक गुंतवणूक करावी. तर कर्मचाऱ्यांनी आता पुढाकार घेणे, शहाणपणाने शिकणे आणि दूरगामी विचार करणे गरजेचे आहे.”

नियोक्त्यांनी कर्मचाऱ्यांची संस्थेशी निष्ठा आणि बांधिलकी वाढवण्यासाठी अपस्किलिंग बजेट प्रभावीपणे वापरणे, स्वतःच्या खर्चाने केलेल्या शिक्षण प्रयत्नांची दखल घेणे आणि विशेषतः तंत्रज्ञान व फायनान्ससारख्या उच्च प्रभावी विभागांसाठी संरचित अपस्किलिंग ट्रॅक्स तयार करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षणाची वेळ पारफॉर्मन्स इव्हॅल्युएशनच्या जवळ ठेवल्यास अधिक फायदा होईल, हे स्पष्ट झाले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.