Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

टाटा मोटर्सने २१.४९ लाखांत हॅरियर.इव्ही लॉन्च केली

 टाटा मोटर्सने २१.४९ लाखांत हॅरियर.इव्ही लॉन्च केली

~ १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज ~



मुंबई, ४ जून २०२५: भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीत अग्रणी आणि देशातील आघाडीचा एसयूव्ही उत्पादक टाटा मोटर्सने आज हॅरियर.इव्ही (Harrier.ev) लॉन्च केली, जी भारतातील सर्वात दमदार, सर्वात सक्षम आणि आत्तापर्यंतची सर्वात बुद्धिमान एसयूव्ही आहे. भविष्याच्या एसयूव्हीला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने तयार केलेली हॅरियर.इव्ही एक नवीन मानसिकता घेऊन आली आहे, जिच्यात क्षमता आणि आधुनिकता यांचा सुमेळ साधला आहे. ही अशी एसयूव्ही आहे, जी तुमच्यापुढे साहस आणि शौक यांच्यात निवड करण्याचा पेच टाकत नाही; कारण या एसयूव्हीमधून दोन्ही मिळू शकते.

अज्ञात प्रांतात मुशाफिरी करण्यापासून ते शहरी भागात फिरण्यापर्यंत हॅरियर.इव्ही तुम्हाला बेजोड लक्झरीच्या सुरक्षित कोशातून प्रवास घडवते. ५०४ एनएम टॉर्क आणि क्यूडब्ल्यूडी ड्युअल-मोटर सह, हॅरियर.इव्ही एक देशात विकसित करण्यात आलेली आजवरची श्रेष्ठ एसयूव्ही आहे. नैनीताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टीन व्हाइट आणि प्युअर ग्रे या चार आकर्षक रंगांच्या पर्यायांसह एसयूव्ही समीक्षकांनी वाखाणलेल्या स्टील्थ (STEALTH) आवृत्तीत देखील उपलब्ध असलेल्या हॅरियर.इव्ही ची किंमत २१.४९ लाख रु.* पासून सुरू होत आहे.




नेक्स्ट जनरेशनच्या ऍक्टि.इव्ही प्लस प्युअर इव्ही आर्किटेक्चर द्वारा संचालित असलेली ही एसयूव्ही एकमेवाद्वितीय अशी गाडी आहे. बूस्ट मोडमध्ये केवळ ६.३ सेकंदात ताशी ०-१०० किमी इतका वेग गाठण्याची क्षमता तिच्यात आहे. यामधील सहा प्रगत असे टेरेन मोड आणि असामान्य ग्राउंड क्लियरन्स यामुळे फारसे लोक न पोहोचलेल्या दुर्गम ठिकाणी ही गाडी घेऊन जाता येते. आणि अशा दुर्गम प्रांतात फिरताना देखील गाडीत बसलेले प्रवासी प्रवासी आलीशान झेनिथ स्वीटमध्ये असल्याच्या थाटात राहू शकतील. शिवाय यामध्ये काही फीचर इतकी प्रगत आहेत की, ती केवळ या सेगमेन्टमध्ये किंवा उद्योगात पहिली नाहीत, तर जगात पहिली आहेत.

टाटा मोटर्सद्वारा निर्मित ही सर्वात बुद्धिमान एसयूव्ही आहे. हॅंड्स फ्री अनलॉकिंगसाठी अल्ट्रा वाइड बॅंडचा उपयोग करून डिजी अॅक्सेस पासून ते ई-व्हॅले, आणि गाडीच्या खाली काय आहे, हे देखील दाखवणाऱ्या 540° सराऊंड व्ह्यू सिस्टमपर्यंतची सगळी फीचर्स सामावणारे हे टेक-फर्स्ट उत्पादन फक्त चालकाला मदत करण्यासाठी बनवलेले नाही तर त्याच्याकडून अधिक अपेक्षा करावी इतके ते सक्षम आहे. शिवाय, बॅटरी टेक्नॉलॉजीची परिपक्वता आणि मालकीचा सहज अनुभव याबाबतचा आपला विश्वास अधोरेखित करत टाटा मोटर्सने हॅरियर.इव्ही च्या बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे. त्यामुळे EV समुदायाला एक निश्चिंतता मिळेल.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे मॅनिजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा म्हणाले, “हॅरियर.इव्ही च्या लॉन्च सह आम्ही केवळ एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करत नाही आहोत, किंवा परंपरेला आव्हान देत नाही आहोत, तर आम्ही काय शक्य होऊ शकते याचे नियम नव्याने लिहीत आहोत. महान परंपरेत जन्मलेली आणि भविष्याचा विचार करून तयार केलेली हॅरियर.इव्ही ही भारताची सर्वात सक्षम एसयूव्ही आहे. अत्याधुनिक ऍक्टि.इव्ही प्लस आर्किटेक्चरने बनलेली आणि सर्वोत्तम टॉर्क निर्माण करणाऱ्या, आणि भारतीय एसयूव्ही क्षेत्रात आजवरचे सर्वश्रेष्ठ अॅक्सेलरेशन देणाऱ्या दमदार क्यूडब्ल्यूडीद्वारा संचालित हॅरियर.इव्ही परफॉर्मन्सची नव्याने व्याख्या करते. या जबरदस्त ताकदीला सॅमसंग निओ क्यूएलइडी द्वारा संचालित हरमनचा डिस्प्ले, श्रोत्याला तल्लीन करणारी डॉल्बी अॅटमॉस प्रणाली आणि सभोवतालचे आणि अगदी गाडीच्या तळाच्या खालचे देखील दाखवणारी ५४०° सराऊंड व्हयू सिस्टम यांसारख्या एसयूव्ही सेगमेन्टमधील श्रेष्ठ लक्झरीजची जोड आहे. बुद्धिमत्ता, ऐशोआराम आणि उद्देशाने प्रेरित होऊन बनवलेली हॅरियर.इव्ही रेंज अॅंग्झायटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादेची चिंता दूर करते आणि इव्हीची मालकी केवळ प्रेरणादायकच नाही, तर सहजसाध्य बनवते. गतीशीलतेच्या भविष्याकडे चालू झालेल्या भारताच्या प्रवासाचे नेतृत्व करण्याची आणि भारतीय ऑटोमोटिव्ह क्षमतेच्या शब्दसंपदेमधून ‘डिलीट इम्पॉसिबल’ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हॅरियर.इव्ही आहे.”




हॅरियर.इव्ही ची वैशिष्ट्ये:

ऍक्टि.इव्ही प्लस आर्किटेक्चर द्वारा समर्थित हॅरियर.इव्ही विविध प्रकारच्या प्रांतात बेजोड एक्सेलरेशन, नियंत्रण आणि आत्मविश्वास देते. शहरातल्या दैनंदिन प्रवासापासून ते ऑफ रोडिंग करताना हॅरियर.इव्ही त्यातील प्रगत क्षमता आणि सुपरकार सारख्या परफॉर्मन्ससह एक अधिकाराचा अनुभव देते.

●          पुढच्या बाजूस 158 PS (116 kW)ची ड्युअल मोटर शक्ती आणि 238 PS (175 kW )

●          ड्युअल मोटर सेटअपमधून 504 Nm टॉर्क

●          6.3 सेकंदात 0–100 km/h – सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ

●          मोठ्या रेंजचे 65 kWh आणि 75 kWh बॅटरी पॅक्स

 

●          C75 च्या अनुमानानुसार, प्रत्यक्षात 480-505 किमी रेंज

●          1.5 C वर फास्ट चार्जिंगमुळे केवळ 15 मिनिटांत 250 किमी जाण्याची क्षमता मिळते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.