Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कॉईनडीसीएक्सच्या स्पॉट ट्रेडिंगमध्ये ३२ टक्क्यांची वाढ

 कॉईनडीसीएक्सच्या स्पॉट ट्रेडिंगमध्ये ३२ टक्क्यांची वाढ


मुंबई, १२ जून २०२५: कॉईनडीसीएक्स या भारताच्या सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजने आपला मे २०२५ पारदर्शकता अहवाल प्रदर्शित केला आहे आणि त्या मार्फत एक सुरक्षित आणि पारदर्शक क्रिप्टो गुंतवणूक आणि ट्रेडिंग ईकोसिस्टमच्या उभारणीबाबतची आपली वचनबद्धता आणखी दृढ केली आहे. कॉईनडीसीएक्स ने स्पॉट ट्रेडिंगच्या प्रमाणात ३२% वृद्धी नोंदवली आहे. एप्रिलमध्ये ३७४ मिलियन डॉलर वरून मे महिन्यात ते ४९२ मिलियन डॉलरवर पोहोचले आहे. ही तीव्र रिकव्हरी यूझर्समधील वाढता आत्मविश्वास आणि कॉईनडीसीएक्सच्या निरंतर प्लॅटफॉर्म संवर्धनाबाबत बाजारपेठेची सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवते.

कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता म्हणाले, “या मे महिन्यात स्पॉट ट्रेडिंगमध्ये झालेली ३२ टक्क्यांची वाढ फक्त प्लॅटफॉर्मच्या विकासाची निदर्शक नाही, तर जागतिक स्वीकृतीमध्ये वाढत असलेला गुंतवणूकदारांचा विश्वास देखील त्यातून स्पष्ट होतो. आम्हाला वाटते की, मुख्य बाजारपेठांमध्ये वाढती धोरणात्मक गती आणि डिजिटल अॅसेट इकॉनॉमीमध्ये भारताच्या वाढत्या भागीदारीसह अधिक शाश्वत ऊर्ध्वगामी ट्रेंडची ही तर फक्त सुरुवात आहे. कॉईनडीसीएक्समध्ये आम्ही एक सुरक्षित, अनुपालनशील आणि एक असा यूझर-फर्स्ट प्लॅटफॉर्म बनवण्याबाबत वचनबद्ध आहोत, जो क्रिप्टो स्वीकाराच्या पुढील लाटेस सक्षम बनवेल.”

कॉईनडीसीएक्सकडे एकूण ६०६.६१ मिलियन युएसडीटीची मालमत्ता आहे, जी आमच्या सशक्त राखीव स्थितीची पुष्टी करते. यापैकी ४४८.९९ मिलियन युएसडीटी ब्लॉकचेनवर असून १५७.६१ मिलियन युएसडीटी भागीदारांकडे सुरक्षित आहेत.

मे २०२५ मध्ये बीटीसी आणि ईटीएच ही कॉईनडीसीएक्सवर सर्वाधिक सक्रिय स्वरूपात ट्रेडिंग केली जाणारी टोकन होती, ज्यांचे व्हॉल्यूम अनुक्रमे २९.५ मिलियन डॉलर आणि २१.७ मिलियन डॉलर होते. मूडेंग १४.४ मिलियन डॉलर व्हॉल्यूमसह ब्रेकआउट परफॉर्मरम्हणून पुढे आला, जे उभरत्या नॅरेटिव्हमध्ये वाढती रुचि दर्शवते. एक्सआरपी आणि एसओएल देखील सर्वोत्तम ५ मध्ये सामील होते. यावरून उच्च-तरलता मालमत्तेतील गुंतवणूकदारांची प्राथमिकता दिसून येते.

जून महिन्यात प्रवेश करताना या एक्स्चेंजचे लक्ष्य प्लॅटफॉर्मचा परफॉर्मन्स अनुकूल करणे, उत्पादन क्षमता विस्तारित करणे यासह पारदर्शकता आणि विश्वासाच्या मदतीने यूझर अनुभव अधिक चांगला करण्यावर राहील.




मे महिन्यात मुख्य उत्पादनांची प्रगती:

●          फ्यूचर्स प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा: उच्च-लोडच्या स्थितीत विलंब कमी करण्यासाठी आणि स्थिरता वाढवण्यासाठी प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा अंमलात आणल्या, ज्यामुळे व्यापाऱ्यांना जलद आणि अधिक निर्बाध अंमलबजावणी मिळू शकली.

●          सुलभ केलेला फ्यूचर्स अनुभव: नवशिक्या आणि पहिल्यांदाच आलेल्या यूझर्ससाठी तयार करण्यात आलेले नवीन डिझाईन फ्यूचर्स ट्रेडिंगमध्ये सुलभ प्रवेश आणि सुस्पष्ट निर्णय घेण्याची क्षमता देते.

●          तत्काल शुल्क सवलती: रियल-टाइममध्ये बचत सुरू करण्यात आली, ज्यामुळे विलंब टळला आणि ट्रेडिंग प्रवाहात यूझर्सचे समाधान वाढले.

●          तांत्रिक विश्लेषण मास्टरक्लास: अपसर्ज.क्लबसोबत सहयोग करून कॉईनडीसीएक्सने यूझर्सना चार्ट, निर्देशकांवर प्रभुत्व मिळवण्यात आणि डेटा-संचालित ट्रेडिंग धोरणे विकसित करण्यात मदत करण्यासाठी एक विनामूल्य शैक्षणिक मास्टरक्लास सुरू केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.