Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फेडएक्सचा मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसह सहयोग

 फेडएक्सचा मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसह सहयोग

~ सायबर सेफ इंडिया मोहिमेची सुरुवात ~

मुंबई, २४ जुलै २०२५: शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील आघाडीची ना-नफा संस्था मॅजिक बस इंडिया फाउंडेशनने जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्स एक्सप्रेस (फेडएक्स) सोबत सहयोगाने सायबर सेफ इंडिया कॅम्पेन सुरू केली आहे. या देशव्‍यापी उपक्रमाचा तरुणांना आणि समुदायांना डिजिटल जगात सुरक्षितपणे व जबाबदारीने नेव्हिगेट करण्यासाठी ज्ञानासह सुसज्ज करून सायबर गुन्ह्यांना रोखण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम डिजिटल जागरूकता वाढवण्यासाठी आणि विशेषतः आव्हानात्मक पार्श्वभूमी असलेल्या समुदायांना विश्वसनीय साधने व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्‍नई, हैदराबाद, पुणे व कोलकाता यांसह १३ राज्ये आणि २९ शहरांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे. मॅजिक बसची १३० हून अधिक उपजीविका केंद्रे व १००० हून अधिक महाविद्यालयांच्या विद्यमान नेटवर्कचा वापर करून हा उपक्रम दोन लाखांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत-जास्त प्रभाव पाडेल. याव्यतिरिक्‍त, सुरक्षित डिजिटल पद्धतींची व्यापक समज आणि अवलंब वाढवण्यासाठी पथनाट्ये, डिजिटल सुरक्षा सत्रे, जागरूकता शिबिरे आणि स्थानिक सायबर गुन्हे अधिकाऱ्यांशी सहयोग यांसारख्या आकर्षक साधनांद्वारे समुदाय-स्तरीय पोहोचवर भर दिला जाईल.




फेडएक्स, मध्यपूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका येथील मार्केटिंग, ग्राहक अनुभव व एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत टाटीवाला म्हणाले, ''आजच्या हायपरकनेक्टिव्ह जगात सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता हे आपले सर्वात मोठे संरक्षण आहे. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार १.३ दशलक्ष नागरिकांनी नोंदवलेल्या फसवणूकीच्या प्रकरणांद्वारे ४३.८६ अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम सुरक्षित करण्यात आली आहे, ज्‍यामधून सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जागरूकता आणि त्वरित अहवाल देण्याचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतात . फेडएक्समध्‍ये आम्‍हाला लोकांना सतर्क राहण्यास, सुरक्षित राहण्यास आणि डिजिटल जगात अधिक आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यास मदत करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचा अभिमान आहे."

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे ग्लोबल सीईओ जयंत रस्तोगी म्हणाले, ''भारत डिजिटल-केंद्रित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सुरक्षित आणि माहितीपूर्ण डिजिटल सहभाग आवश्यक बनला आहे. फेडएक्ससोबतच्या सहयोगाने आम्हाला सायबरसुरक्षा जागरूकता वाढवण्यास सक्षम केले आहे, जे आमची जीवन कौशल्‍ये आणि रोजगार उपक्रमाशी विनासायासपणे संलग्‍न आहे. सायबर सेफ इंडिया मोहीम सर्वसमावेशक डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेने पाऊल आहे, ज्यामुळे तरुण आणि समुदाय डिजिटल जगात सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी सुसज्ज आहेत याची खात्री मिळते. यामधून उज्‍ज्‍वल भविष्याप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते, जेथे डिजिटल प्रवेशामधून डिजिटल सुरक्षितता मिळेल, प्रत्येक कुटुंबाला वाढत्या कनेक्टेड जगात प्रगती करण्‍यास सक्षम करेल.''

भारताच्या राष्ट्रीय डिजिटल सुरक्षा प्राधान्यांशी सुसंगत हा उपक्रम संचार व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक)च्या सहयोगाने राबविला जात आहे आणि प्रादेशिक पोहोच व समन्वयाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सायबर सेल्सशी देखील संलग्‍न असेल.

मॅजिक बस आणि फेडएक्स यांच्यातील हा सहयोग भारताच्या भविष्यातील कर्मचारीवर्गाला डिजिटली कनेक्टेड करण्‍यासोबत डिजिटली जागरूक, सुरक्षित आणि स्थिर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही मोहीम सर्वात जास्त गरज असलेल्या ठिकाणी जागरूकता निर्माण करून आणि सायबर सुरक्षित भारत घडवण्यास मदत करून सर्वसमावेशक नाविन्‍यतेचा आधारस्तंभ म्हणून काम करते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.