Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झेलीओ ई-मोबिलिटीने 'ईव्हा'चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले

 झेलीओ ई-मोबिलिटीने 'ईव्हा'चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले



मुंबई, ११ जुलै २०२५: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड्सपैकी एक असलेल्या झेलीओ ई-मोबिलिटीने त्यांच्या लोकप्रिय लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ईव्हा (Eeva) च्या फेसलिफ्ट मॉडेलच्या अधिकृत लॉन्चची घोषणा केली आहे.आजच्या शहरी जीवनशैलीसाठी पुन्हा डिझाइन केलेली, नवीन ईव्हा २०२५ सुधारित कार्यक्षमता, अधिक राइडिंग कम्फर्ट आणि विद्यार्थी, व्यावसायिक तसेच गिग वर्कर्ससाठी तयार केलेली आवश्यक वैशिष्ट्ये प्रदान करते. ही स्कूटर परवडणारी, शहर-अनुकूल इलेक्ट्रिक मोबिलिटी निर्माण करण्याच्या झेलीओच्या व्हिजनला मूर्त रूप देते, जी स्मार्ट आणि टिकाऊ दोन्ही आहे.

नवीन ईव्हा विविध शहरी कम्युटिंग गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंट ६०व्ही/३०एएच ९० किमी रेंजसह ६४,००० रुपयांत, ७४व्ही/३२एएच १२० किमी रेंज सह ६९,००० रुपयांत आणि जेल बॅटरी व्हेरिएंट्स ६०व्ही/३२एएच ८० किमी रेंजसह ५०,००० रुपयांत, ७२व्ही/४२एएच १०० किमी रेंजसह ५४,००० रुपयांत उपलब्ध आहे.

२५ किमी/तास टॉप स्पीड आणि एकाच चार्जवर १२० किलोमीटर पर्यंत वाढविलेली रेंज प्रदान करणारा, फेसलिफ्टेड ईव्हा किफायतशीर आणि विश्वसनीय शहरी मोबिलिटीसाठी इंजिनिअर केलेला आहे. तो उच्च-कार्यक्षमता ६०/७३व्ही बीएलडीसी मोटरवर चालतो जो पूर्ण चार्जसाठी फक्त १.५ युनिट वीज वापरतो. स्कूटरमध्ये १५० मिमी वाढविलेली ग्राउंड क्लिअरन्स आहे, ८५ किलो एकूण वजन आणि १५० किलो पेलोड क्षमता आहे, जे दैनंदिन कम्युटिंगच्या गरजांसाठी योग्य आहे. चार्जिंग कालावधी बॅटरी प्रकारानुसार बदलतो, लिथियम-आयन मॉडेल्स ४ तास आणि जेल व्हेरिएंट्स ८-१० तासांत पूर्ण चार्ज होतात.




झेलीओ ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. कुणाल आर्य म्हणाले, "ईव्हा हा आमचा सर्वाधिक विकला जाणारा स्कूटर आहे आणि देशभरातील दैनंदिन प्रवाशांची ती पहिली पसंती राहिली आहे. ईव्हा २०२५ फेसलिफ्ट सह, आम्ही आमच्या रायडर्ससाठी सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये, ज्यात आराम, सुरक्षा आणि बुद्धिमान सुविधांचा समावेश आहे, ती अधिक वाढवली आहेत. त्याचबरोबर ती परवडणारी आणि शहरासाठी तयार राहील याची खात्री केली आहे. हे अपडेट व्यावहारिक आणि भविष्यावर आधारित इलेक्ट्रिक मोबिलिटी देण्याच्या आमच्या सततच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आम्हाला खात्री आहे की आमचे ग्राहक नवीन ईव्हावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करतील, कारण ती नेहमीप्रमाणेच विश्वासार्हता आणि कार्यक्षमता देत राहील," असेही ते पुढे म्हणाले.

सुरक्षित आणि विश्वसनीय कम्युटिंगसाठी बनविलेला, फेसलिफ्टेड ईव्हा पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक्स बसवलेला आहे आणि १२-इंच चाकांवर ९०/९०-१२ टायर्स आहेत. त्याचे हायड्रॉलिक शॉक अॅबजॉर्बर्स खड्डे आणि अडखळणींवर नितळ राइड्सची हमी देतात, राइडर कम्फर्ट वाढवतात. ईव्हा २०२५ मध्ये डिजिटल डिस्प्ले, डेटाइम रनिंग लाइट्स, कीलेस ड्राइव्ह, चोरी विरोधी अलार्म, पार्किंग गियर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि पॅसेंजर फूटरेस्ट यासह अनेक स्मार्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. स्कूटर मागील व्हेरिएंटचा रंग पॅलेट कायम ठेवतो, निळा, राखाडी, पांढरा आणि काळा रंगांमध्ये उपलब्ध आहे, यामुळे वापरकर्त्याला नवीन अनुभव मिळण्यासोबतच एक प्रकारची परिचितता देखील मिळते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.