स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये ‘बेंटले’चा समावेश
~ एसएव्हीडब्ल्यूआयपीएल देशभरात बेंटले कारची आयात, वितरण आणि सेवा देणार ~
मुंबई, ९ जुलै २०२५: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एसएव्हीडब्ल्यूआयपीएल)ने, त्यांच्या ग्रुपमध्ये बेंटले या प्रसिद्ध ब्रिटिश ब्रँडला सहावा ब्रँड म्हणून समाविष्ट केल्याची घोषणा आज केली. १ जुलै २०२५ पासून एसएव्हीडब्ल्यूआयपीएल हा ग्रुप देशभरात फक्त बेंटले कारची आयात, वितरण आणि सेवा देईल. यामुळे भारतात झपाट्याने वाढणाऱ्या लक्झरी कारच्या बाजारपेठेत या समूहाची वचनबद्धता आणखी वाढेल.
सर्व मार्केटिंग, विक्री आणि विक्रीनंतरचे कामकाज हे नुकत्याच स्थापन केलेल्या बेंटले इंडिया या एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या समूह कंपनीमार्फत केले जाईल. ही कंपनी ब्रँडचे भारतीय धोरण आणि किरकोळ विक्री नेटवर्कवर देखरेख ठेवले. तसेच बेंटले इंडियाच्या ब्रँड डायरेक्टर पदावर अबे थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत ते या ब्रँडचे नेतृत्व करतील.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये बेंटले इंडियाला तीन नवीन डीलर पार्टनर मिळतील. त्यांची सुरुवात बंगळुरू आणि मुंबई येथून होत आहे. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागेल. या नव्या शोरूम्सद्वारे भारतातील अति श्रीमंत ग्राहकांना बेंटलेचा परफॉर्मन्स, कारागिरी आणि लक्झरी सुविधा यांची एकत्रित सेवा देतील.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पीयूष अरोरा म्हणाले, “एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कुटुंबात बेंटलेचे स्वागत करणे हा एक अभिमानास्पद क्षण आहे. यामुळे जर्मन अभियांत्रिकीच्या अचूकतेपासून ते ब्रिटिश कारागिरीच्या चिरंतन सौंदर्य आणि अतुलनीय कामगिरीपर्यंत व्यापलेल्या आमच्या पोर्टफोलिओला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. भारतात तडजोड न करणाऱ्या लक्झरीची मागणी वेगाने वाढत आहे. यासोबतच अबे यांना भारतीय बाजारपेठेची सखोल माहिती आहे. त्यामुळे बेंटले इंडियाला नव्या उंचीवर नेण्यासाठी ते आदर्श लीडर ठरतात.”
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे विक्री, मार्केटिंग आणि डिजिटल विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जान ब्युरेस म्हणाले, “बेंटलेला एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कुटुंबात भारतात स्वागत करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. भारतात सातत्याने वाढणाऱ्या युएचएनआय सेगमेंटला या नव्या सहकार्याचा फायदा होईल. आम्ही आमच्या नव्या डीलर पार्टनरसह आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम लक्झरी आणि परफॉर्मन्सची हमी देऊ”
दोन दशकांहून अधिक काळापासून बेंटले ही भारताच्या लक्झरी कार बाजारपेठाचा भाग आहे. ऑटोमोटिव्ह एक्सलन्सच्या शओधात असलेल्या टॉप टीअर ग्राहकांच्या अपेक्षेत ती उतरत आहे. हा ब्रँड एसएव्हीडब्ल्यूआयपीएलमध्ये समाविष्ट केल्याने बाजारपेठेवर आता अधिक लक्ष राहिल. तसेच ग्राहकांना त्यांच्या मालकीच्या संपूर्ण प्रवासात जागतिक दर्जाचे मानके मिळण्याची खात्री मिळते.