Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कियाकडून पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल 'कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही' लाँच

 कियाकडून पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल 'कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही' लाँच 

~ किंमत १७.९९ लाख रूपयांपासून ~

·         दोन बॅटरी पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध: ५१.४ केडब्‍ल्‍यूएच (एआरएआय-प्रमाणित ४९० किमी रेंज - एमआयडीसी फुल) आणि ४२ केडब्‍ल्‍यूएच (एआरएआय-प्रमाणित ४०४ किमी रेंज - एमआयडीसी फुल). 

·         किया फास्‍ट चार्जरसह सानुकूल चार्जिंग: १०० केडब्‍ल्‍यू डीसी फास्‍ट चार्जरच्‍या माध्‍यमातून फक्‍त ३९ मिनिटांमध्‍ये १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज.

·         भारतातील सर्व हवामान स्थितींमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला आयपी-६७ प्रमाणित बॅटरी पॅक, तसेच लिक्विड-कूल्‍ड थर्मल मॅनेजमेंट सिस्‍टम.

·         पॅडल शिफ्टर्ससह ड्रायव्हिंग आरामदायीपणा व कार्यक्षमता, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंगचे चार लेव्‍हल (सेाबत इंटेलिजण्‍ट ऑटो मोड आणि आय-पेडल तंत्रज्ञान). 

·         अॅक्टिव्‍ह एअर फ्लॅप, जे बॅटरी तापमान वाढवते आणि ऐरोडायनॅमिक कार्यक्षमता सुधारते. 

·         अधिक प्रगत व प्रीमियम फिलसह ९० कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये.




मुंबई, १५ जुलै २०२५: किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज त्‍यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल 'कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही' लाँच केली. या इलेक्ट्रिक वेईकलची किंमत १७.९९ लाख रूपयांपासून सुरू होते.

संभाव्‍य ईव्‍ही ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीमध्‍ये एैसपैस जागा, सर्वोत्तमता आणि स्थिरतेचे अद्वितीय संयोजन आहे, जेथे किफायतशीरपणाबाबत कोणतीच तडजोड करण्‍यात आलेली नाही. मित्र किंवा कुटुंबासोबत लांबच्‍या प्रवासावर जायचे असो, वीकेण्‍ड गेटवेचा आनंद घ्‍यायचा असो किंवा शहरामध्‍ये दैनंदिन प्रवास करायचा असो कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही सर्व गोष्‍टींची सहजपणे हाताळणी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या कारची सर्वसमावेशक डिझाइन आणि अद्वितीय कार्यक्षमतेमधून कियाचा इलेक्ट्रिक गतीशीलतेचा दृष्टिकोन दिसून येतो, जो निवडक पैलूंच्या पुढे जातो. यामुळे ही वेईकल स्‍मार्टर, हरित आणि अधिक व्‍यावहारिक ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेत असलेल्‍या प्रत्‍येकासाठी आहे. 

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. ग्‍वांगू ली म्‍हणाले, ''आम्‍ही नाविन्‍यता, स्थिरता आणि ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांच्‍या सखोल माहितीच्‍या माध्‍यमातून इलेक्ट्रिक गतीशीलतेच्‍या भविष्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. वर्षानुवर्षे आम्‍ही प्रबळ जागतिक ईव्‍ही पोर्टफोलिओ निर्माण केला आहे आणि आम्‍हाला भारतात ते कौशल्‍य आणण्‍याचा अभिमान वाटतो. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही या प्रवासामधील पुढील पाऊल आहे. ही कार तीन मुलभूत आधारस्‍तंभांवर डिझाइन करण्‍यात आली आहे - आमचे प्रमाणित जागतिक ईव्‍ही तंत्रज्ञान, ड्रायव्हिंग अनुभव उत्‍साहित करणारी प्रगत वैशिष्‍ट्ये आणि आमचे अद्वितीय आरव्‍ही तत्त्व, जे हालचाल, स्थिरता व एकतेसाठी ओळखले जाते. भारतातील पहिली इलेक्ट्रिक आरव्‍ही किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस महत्त्वाकांक्षा व एकतेसह पुढे जात असलेल्‍या देशासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आली आहे. भारतामधून प्रेरित आमची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल भविष्‍याकडे वाटचाल करण्‍याची नवीन 'ई-वी' संकल्‍पना पुढे घेऊन जात आहे.'' 




भारतासाठी चाचणी करण्‍यात आलेल्‍या प्रमाणित क्षमता

कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीमध्‍ये विश्वसनीय व कार्यक्षम इलेक्ट्रिक पॉवरट्रेनची शक्‍ती आहे, जे सुलभ व प्रतिसादात्‍मक कार्यक्षमता वितरित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या वेईकलमधील बॅटरी जागतिक स्‍तरावर बेंचमार्क आणि स्‍थानिक पातळीवर सत्‍यापित आहे, ज्‍यामधून सुरक्षितता, टिकाऊपणाचे उच्‍च मानक आणि भारतातील स्थितींशी जुळवून जाण्‍याच्‍या क्षमतेची खात्री मिळते. वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:    

·         दोन बॅटरी पर्याय: ५१.४ केडब्‍ल्‍यूएच (एआरएआय-प्रमाणित ४९० किमी रेंज - एमआयडीसी फुल) आणि ४२ केडब्‍ल्‍यूएच (एआरएआय-प्रमाणित ४०४ किमी रेंज - एमआयडीसी फुल).

·         सर्व सातही प्रवासी असताना देखील जलद अॅक्‍सेलरेशनसाठी १२६ केडब्‍ल्‍यू व ९९ केडब्‍ल्‍यू आऊटपुट आणि २५५ एनएम टॉर्क देणारी मोटर.

·         ९५ टक्‍के मोटर कार्यक्षमतेसह ५१.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी, जी फक्‍त ८.४ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती देते.

·         फास्‍ट चार्जिंग: १०० केडब्‍ल्‍यू डीसी चार्जरसह फक्‍त ३९ मिनिटांमध्‍ये १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.