ऐतिहासिक ड्रायव्हर ड्राफ्टने मुंबईत भारतीय रेसिंग फेस्टिव्हल २०२५ची सुरुवात
मुंबई : ‘इंडियन रेसिंग लीग’ने (आयआरएल) २०२५ हंगामासाठीची संपूर्ण संघरचना ‘ड्रायव्हर ड्राफ्ट’द्वारे जाहीर केली असून, यात आंतरराष्ट्रीय विजेते, भारतीय टॅलेंट्स आणि महिला रेसर्स यांचा समावेश असलेले २४ ड्रायव्हर्स सहा फ्रँचायझींमध्ये निवडले गेले.
‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल’च्या (आयआरएफ) २०२५च्या हंगामाने आज आपल्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड जोडला, तो म्हणजे ‘इंडियन रेसिंग लीग’साठी (आयआरएल) प्रथमच अधिकृत ‘ड्रायव्हर ड्राफ्ट’. मुंबईतील प्रतिष्ठित ‘ताज लँड्स एंड’ येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात फ्रँचायझी मालक, लीग अधिकारी आणि प्रसारमाध्यमे एकत्र आली आणि या मोसमाची औपचारिक सुरुवात झाली. संघ तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. हा हंगाम जागतिक पातळीवरील स्पर्धा, जागतिक दर्जाचे टॅलेंट आणि प्रेक्षकांशी वाढती गुंतवणूक यासाठी ओळखला जाणार आहे.
या ड्राफ्टमध्ये प्रत्येक फ्रँचायझीने चार ड्रायव्हर निवडले. त्यामध्ये एक अनुभवी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हर, एक उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय वंशाचा चालक, एक देशांतर्गत भारतीय चालक आणि एक महिला चालक आदींचा समावेश होता. निवड केवळ प्रतीकात्मक नसून, रणनीतिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. टीम्सनी त्यांच्या चालकांची निवड ड्रायव्हिंग स्टाइल, ट्रॅकचा अनुभव आणि परफॉर्मन्स डेटाच्या आधारे केली.
अंतिम ग्रिडमध्ये काही आघाडीची आणि प्रतिष्ठित नावे झळकली आहेत. नील जानी (माजी फॉर्म्युला वन टेस्ट ड्रायव्हर आणि ले मांस विजेता), जॉन लँकास्टर (जीपी २ आणि एंड्युरन्स रेसिंगमध्ये भरपूर अनुभव असलेले ड्रायव्हर) आणि राऊल हायमॅन(भारतीय वंशाचा दोन वेळेचा आयआरएल चॅम्पियन) यांचा समावेश आहे. याशिवाय रुहान अल्वा, सोहिल शहा, साई संजय आणि अक्षय बोहरा आदी तरुण गुणवंत आपल्या वेगवान आणि धारदार रेसिंग कौशल्यामुळे नजरा खिळवून ठेवतात. महिला ड्रायव्हरमध्ये फॅबिएन वोल्वेंड, गॅब्रिएला जिल्कोवा आणि केटलीन वूड यांचा समावेश असून त्यांनी डब्ल्यू सीरिज, एफ थ्रीआणि जीटी रेसिंग फॉरमॅट्समध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव प्राप्त केलेला आहे. त्यामुळे या सीझनचा थरार आणखी वाढणार हे निश्चित.
ड्राफ्टनंतर सहा संघ मालकांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारतीय चित्रपटसृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे संघमालक म्हणून उपस्थित होती. त्यांनी त्यांच्या संघांची अधिकृत घोषणा केली आणि लीगबाबतचा आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. प्रत्येक फ्रँचायझीने त्यांच्या तांत्रिक टीमसह संपूर्ण नियोजन करून संघ बांधणी केली. केवळ स्पर्धात्मक दृष्टिकोन न ठेवता, एक ब्रँड तयार करण्यावर भर दिला गेला.
‘आयआरएफ’ची निर्मिती करणाऱ्या ‘रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे (आरपीपीएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अखिलेश रेड्डी म्हणाले, की ‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल २०२५च्या बाबतीत हे आमचा सामूहिक दृष्टिकोन जिवंत करते. या ड्रायव्हर ड्राफ्टसह, आम्ही भारतात मोटरस्पोर्टचा नवीन पाया रचत आहोत; जो सर्वसमावेशक, संरचित आणि सखोल स्पर्धात्मक आहे. आयआरएल २०२५साठी ड्रायव्हर ड्राफ्ट प्रतिभेचा गौरव करतो, क्षमतेस प्रोत्साहन देतो आणि रेसिंग हंगामासाठी अपेक्षा निर्माण करतो. आम्ही येथे जे करत आहोत ते भारतासाठी, भारताद्वारे, जगाकडे पाहत असलेल्या खेळाची उभारणी करीत आहोत.’
दिल्लीच्या स्पीड डेमन्सपासून ते नवीन संघ ‘किच्चा’ज किंग्ज बेंगळुरूपर्यंत सर्व फ्रँचायझी आता पूर्णपणे तयार आहेत. २०२५ चा हंगाम ऑगस्टपासून सुरू होणार असून, विविध शहरांमध्ये कायमस्वरूपी सर्किट्स आणि अर्बन स्ट्रीट ट्रॅकवर रेसिंग स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचा शेवट हाय-टी दरम्यान झालेल्या अनौपचारिक संवादाने झाला. तेथे व्यवस्थापन, संघमालक आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात दिलखुलास चर्चा रंगली. हा दिवस केवळ एका हंगामाची सुरुवात नव्हे, तर भारतीय मोटरस्पोर्टमधील नव्या पर्वाची नोंद ठरला.
IRL 2025 Driver Draft – Final Team Line-Ups
Speed Demons Delhi (Owner: Arjun Kapoor)
Alister Yoong (Malaysia) – Regular in Asian single-seaters, son of former F1 driver Alex Yoong
Sai Sanjay (India) – Consistent domestic performer across Indian circuit championships
Shahan Ali Mohsin (India) – Former F4 SEA champion and one of India’s top karting graduates
Caitlin Wood (Australia) – Experienced in W Series and GT World Challenge
Hyderabad Blackbirds (Owner: Naga Chaitanya)
Jon Lancaster (UK) – Former GP2 winner and Le Mans podium finisher
Akshay Bohra (India) – Promising Indian-origin driver with F4 experience in Europe and UAE
Mohamed Ryan (India) – Young talent with strong sim-racing and F4 credentials
Gabriela Jilkova (Czech Republic) – Sim and GT racing expert with international recognition
Goa Aces (Owner: John Abraham)
Raoul Hyman (UK/SA) – Two-time IRL champion and F3 veteran
Akash Gowda (India) – Versatile Indian racer with multiple podiums in national series
Chetan Surineni (India) – Emerging domestic competitor known for pace and consistency
Fabienne Wohlwend (Liechtenstein) – W Series and Ferrari Challenge star
Kolkata Royal Tigers (Owner: Sourav Ganguly)
Tom Canning (UK) – British GT Champion with endurance racing experience
Sohil Shah (India) – F4 India podium finisher and consistent IRL performer
Sandeep Kumar (India) – Returning driver with national championship wins
Alexandra Hervé (France) – F4 and Eurocup contender with strong racecraft
Kichcha’s Kings Bengaluru (Owner: Sudeep Kichcha)
Neel Jani (Switzerland) – Le Mans winner and former F1 test driver
Ruhaan Alva (India) – Bengaluru’s young prodigy and F4 India front-runner
Kyle Kumaran (India) – National karting and F4 talent
Jem Hepworth (UK) – British endurance and GT racing driver
Chennai Turbo Riders (Owner: Keerthivasan)
Aqil Alibhai (Kenya) – Formula 4 UAE race winner with strong international pedigree
Shibin Yousaf (India) – Consistent performer in Indian circuit racing
Tijil Rao (India) – Part of India’s new wave of single-seater talent
Laura Camps Torras (Spain) – Ferrari Driver Academy alumna and standout karting graduate