फेडएक्सद्वारे समावेशक उद्योजकतेला चालना
मुंबई, २ जुलै २०२५: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने युनाइटेड वे मुंबईच्या सक्षम या मुख्य उपक्रमाच्या माध्यमातून समावेशक उद्योजकतेला चालना देण्याचे काम चालू ठेवले आहे. या उपक्रमाची सुरुवात मूलतः आव्हानात्मक पार्श्वभूमीतून येणाऱ्या महिला उद्योजिकांना आधार देण्यासाठी झाली होती, पण त्याची व्याप्ती हळूहळू करता खूप वाढली आहे. आज हा उपक्रम लैंगिक भेद न ठेवता आणि सर्व स्तरांतील व्यक्तींना कौशल्य आणि आत्मनिर्भरतेमार्फत संधी खुल्या करण्यास सक्षम बनवतो.
फेडएक्स मिड्ल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिकामधील इंडिया ऑपरेशन्स, प्लॅनिंग आणि इंजिनियरिंगचे उपाध्यक्ष सुवेन्दू चौधरी म्हणाले, “फेडएक्समध्ये आम्ही अशा जागा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत, जेथे प्रत्येकाला मोठे होण्याची, योगदान देण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. उज्जल भविष्याची निर्मिती अशीच होते.”
आता आपल्या चौथ्या वर्षात सक्षम सर्वांना समान संधी प्रदान करणारी एक शक्ती बनला आहे. या उपक्रमाने हजारो छोटे छोटे व्यवसाय चलवणाऱ्या महिलांना आणि विविध समुदायांतील १६० पेक्षा जास्त व्यक्तींना, लैंगिक भेदभाव न करता साहाय्य केले आहे आणि योग्य प्रकारे हस्तक्षेप करून व त्यांना सहभागी करून त्यांच्या आकांक्षांचे कृतीत रूपांतर करण्यास मदत केली आहे.
फक्त २०२५ मध्येच ६० व्यक्तींची (पुरुष आणि महिला) व्यावसायिक प्रशिक्षणात नावनोंदणी करून घेण्यात आली आणि त्यातील ४० पेक्षा जास्त यशस्वी लोकांना प्रमाणपत्रे देण्यात आली, जे आता स्वतंत्रपणे उत्पन्नाच्या संधी शोधू शकतील. युनाइटेड वे मुंबईच्या २०२४ प्रभाव मूल्यांकनानुसार आजपर्यंत असे ९०% लाभार्थी चांगल्या ठिकाणी काम करत आहेत*- काही जण नोकरी तर काही स्वतःचा उद्योग करत आहेत. या प्रोग्रामच्या अगोदर हे प्रमाण ४५% होते. यातील ६८% लोक आता खाजगी क्षेत्रात काम करत आहेत तर २३% शिवणकाम, बँकिंग, सांस्कृतिक सादरीकरणे आणि मेकअप उद्योगात उद्योजक बनले आहेत.
“सक्षम प्रशिक्षणाने मला आत्मविश्वास आणि दिशा दिली. बेकिंग शिकण्यापासून ते माझे पहिले उत्पन्न मिळवण्यापर्यंत, माझी नजर आता अशा भविष्यावर आहे, जेथे माझी ओळख ही माझी ताकद आहे, तो अडथळा नाही असे सक्षम लाभार्थी आणि होतकरू बेकार रॉनी यांनी सांगितले.
सक्षमने मला दुसरी संधी दिली नव्हती, तोपर्यंत अत्यंत जोखमीच्या जीवनातून सुटका होणे मला अशक्य वाटत होते. आज मी मेकअप आर्टिस्ट्रीच्या माध्यमातून मानाने पैसे कमावतो आणि आता कुठे मला सुरक्षित, सक्षम वाटते आहे आणि माझी ओळख निर्माण झाली आहे असे सक्षम लाभार्थी आणि मेकअप आर्टिस्ट नदीम यांनी सांगितले.
सक्षमच्या माध्यमातून फेडएक्स आणि युनाइटेड वे मुंबई केवळ कौशल्य विकास प्रदान करत नाही आहे, तर स्वाभिमान, संधी आणि आर्थिक लवचिकतेचा मार्ग आखून देत आहेत. हा उपक्रम मूलभूत बदल घडवत आहे, शक्यतांचे रूपांतर प्रगतीत करत आहे आणि अधिक समतापूर्ण आणि आत्मनिर्भर भारताच्या जडणघडणीत योगदान देत आहे.