प्रवीण शर्मा यांची आरईए इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती
मुंबई, 2 जुलाई 2025: प्रवीण शर्मा यांची आरईए इंडियाच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते आता आरईए ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह लीडरशीप टीममध्ये सहभागी होतील. प्रवीण हे एक अनुभवी नेतृत्व असून त्यांच्याकडे भारत आणि आशिया पॅसिफिकमधील तंत्रज्ञान, डिजिटल, मीडिया आणि जाहिरात क्षेत्रातील २५ वर्षांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे.
प्रवीण हे याआधी पेटीएममध्ये काम करत होते. तिथे त्यांनी जाहिराती, ऑनलाइन पेमेंच्स, कॉमर्स सेवांसह अनेक गोष्टी विकसित केल्या आणि त्यांचे व्यवस्थापन पाहिले. पेटीएममध्ये रुजू होण्यापूर्वी प्रवीण यांनी गूगलमध्ये ९ वर्षे काम केले. तेथे त्यांनी परफॉर्मंस मीडिया-एपीएसीचे प्रादेशिक संचालक पद भूषवले. या भूमिकेत असताना त्यांच्यावर संपूर्ण प्रदेशातील परफॉर्मन्स जाहिरात उत्पादनांची जबाबदारी होती.
आरईए ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री ओवेन विल्सन म्हणाले, “प्रवीण यांचे आरईए ग्रुपमध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे. या क्षेत्रातील डिजिटल व्यवसायांचा त्यांचा सखोल अनुभव आरईए इंडिया ग्रुपसाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी मला खात्री आहे. प्रवीण यांच्याकडे दर्जेदार काम करण्याचा, उच्च कार्यक्षम टीम बांधणीचा तसेच उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षमता वाढवण्याचा अनुभव आहे. आरईए इंडियाला पुढील प्रगतीच्या टप्प्यात नेण्यासाठी मी त्यांच्या योगदानाच्या प्रतीक्षेत आहे.”
या नियुक्तीबद्दल बोलताना श्री प्रवीण शर्मा म्हणाले, “या महत्त्वाच्या प्रसंगी आरईए इंडियामध्ये रुजू होताना मला खूप उत्साह वाटत आहे. टीमचे नेतृत्व करणे हा माझा बहुमान आहे. भारतातल्या वेगवान प्रॉपटेक बाजारपेठेत भविष्यात अनेक संधी आहेत. या प्रवाहात योगदान देण्यासाठी आरईए इंडिया उत्तम स्थितीत आहे, अशी मला खात्री आहे. ग्रुपची क्षमता वाढवण्यासाठी, येथील सर्जनशीलतेला गती देण्यासाठी, ग्राहक व यूझर्सना आणखी मूल्य प्रदान करण्याच्या दिशेने प्रतिभावंत टीमसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
प्रवीण हे जुलै महिन्यात भारतातील गुरुग्राम येथील आरईए इंडियाच्या मुख्यालयात रुजू होतील. ते आरईए इंडियाचे सध्याचे सीईओ श्री ध्रुव अगरवाला यांच्यासोबत मिळून नेतृत्वातील बदल सुरळीतपणे पार पाडण्यासाठी काम करतील.