लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेदान कॅमरीचे 'स्प्रिंट एडिशन' लाँच
~ आकर्षक ड्युअल-टोन एक्स्टीरिअर, मॅट ब्लॅक सुधारणा आणि विशेष स्पोर्ट्स किट ~
मुंबई, २१ ऑगस्ट २०२५: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. (टीकेएम)ने आज त्यांच्या प्रतिष्ठित लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेदानची स्पोर्टीयर व अधिक गतीशील व्हर्जन 'कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल - स्प्रिंट एडिशन' लाँच केली. आकर्षक ड्युअल-टोन एक्स्टीरिअर, मॅट ब्लॅक सुधारणा आणि विशेष स्पोर्ट्स किट* असलेल्या या नवीन व्हेरिएण्टमध्ये गतीशील आकर्षकतेसह सुधारित कार्यक्षमता आहे. कॅमरी स्प्रिंट एडिशनमधून उत्साही परसोना दिसून येते, जी स्पोर्टी आकर्षकतेमध्ये धमाल ड्रायव्हिंगचा आनंद घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.
कॅमरी स्प्रिंट एडिशनबाबत आपले मत व्यक्त करत टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. च्या सेल्स-सर्विस-युज्ड कार बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, ''टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि.मध्ये आमचे ग्राहक-केंद्रित्व आजच्या ग्राहकांच्या बदलत्या महत्त्वाकांक्षांनुसार आमच्या उत्क्रांतीला दिशा दाखवत आहे. कॅमरी स्प्रिंट एडिशनमधून हा दृष्टिकोन दिसून येतो. या वेईकलमध्ये नवीन स्पोर्टी विशिष्टता आहे, जी लक्षवेधक ड्युअल-टोन स्टायलिंग, आकर्षक ब्लॅक मॅट अलॉई व्हील्स आणि विशेष स्पोर्ट्स किटमधून दिसून येते, जे वेईकलला गतीशील पवित्रा आणि रस्त्यावर लक्षवेधक उपस्थिती देते. या नवीन व्हेरिएण्टसह आम्हाला विश्वास आहे की, स्प्रिंट एडिशन आधुनिक काळातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल आणि शाश्वत गतीशीलतेप्रती टोयोटाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करेल.''
टोयोटा कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल - स्प्रिंट एडिशनमध्ये प्रगत फिफ्थ जनरेशन हायब्रिड इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामधून कार्यक्षमता व फ्यूएल इकॉनॉमीचे लक्षवेधक संयोजन मिळते. ही यंत्रणा १६९ केडब्ल्यू (२३० पीएस)चे एकूण आऊटपुट निर्माण करते, तसेच २५.४९ किमी/लिटर** दर्जात्मक इंधन कार्यक्षमता देते. इको, नॉर्मल व स्पोर्ट अशा ड्राइव्ह मोड्ससह ही वेईकल विविध ड्रायव्हिंग प्राधान्यांशी प्रभावीपणे जुळून जाते.
टोयोटा सेफ्टी सेन्स ३.० सह सुसज्ज कॅमरी स्प्रिंट एडिशनमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्यांची सर्वसमावेशक श्रेणी आहे, जसे प्री-कोलिजन सिस्टम, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोलसह फुल-स्पीड रेंज, लेन डिपार्टचर अलर्ट, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक हाय बीम. या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त ९ एसआरएस एअरबॅग्ज, वेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ब्रेक होल्ड, टायरा प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि अतिरिक्त दृश्यमानता व आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगसाठी ३६०० पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर. सोईस्कर वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे १०-वे पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटसह लम्बर सपोर्ट व मेमरी, पुढील बाजूस हवेशीर सीट्स, पॅडल शिफ्टर्स, वायरलेस चार्जर, हेड्स-अप डिस्प्ले, आऊटसाइड रिअल-व्ह्यू मिरर (ओआरव्हीएम)साठी मेमरी सेटिंग्ज आणि टिल्ट-टेलिस्कोपिक स्टीअरिंग कॉलम, जे एकत्रित उत्तम कामगिरी, लक्झरी आणि वापरकर्ता-अनुकूल कार्यक्षमता देतात.
इमोशनल रेड अँड मॅट ब्लॅक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल अँड मॅट ब्लॅक, सिमेंट ग्रे अँड मॅट ब्लॅक, प्रीसिअस मेटल अँड मॅट ब्लॅक, डार्क ब्ल्यू मेटलिक अँड मॅट ब्लॅक या ५ ड्युअल टोन स्पोर्टी रंगांमध्ये उपलब्ध असलेली कॅमरी स्प्रिंट एडिशन आकर्षक नवीन रंगांसह प्रीमियम हायब्रिड सेदानला नव्या उंचीवर घेऊन जाते. टोयोटा हायब्रिड बॅटरीवर ८-वर्ष किंवा १६०,००० किमी वॉरंटी (जे अगोदर असेल ते) देते, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत मन:शांती मिळते. कॅमेरी स्प्रिंट एडिशनसाठी बुकिंग्ज सुरू आहेत. ग्राहक टोयोटाभारत डॉटकॉम येथे ऑनलाइन किंवा त्यांच्या जवळच्या टोयोटा डिलरशिपला भेट देत बुकिंग्ज करू शकतात.