वाशी येथील नवीन स्टोअरसह ज्वेलबॉक्सचा मुंबईत विस्तार
मुंबई, ९ सप्टेंबर २०२५: ज्वेलबॉक्स या भारतातील नव्या युगाच्या लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रॅंडने ऑगस्टमध्ये बोरिवलीत यशस्वीरित्या स्टोअर सुरू केल्यानंतर इनऑर्बिट मॉल, वाशी येथे आपल्या मुंबईतील दुसऱ्या स्टोअरचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले आहे. ५०० चौ. फूट क्षेत्राचे हे नवीन दुकान आधुनिक, मिनिमलिस्ट आणि अनुभव-प्रेरित डिझाईन प्रदान करते, ज्यामुळे लॅब-ग्रोन डायमंड्सचा शोध घेणे अकर्षिक आणि सुलभ होते.
वाशीतील पाम बीच रोडवरील इनऑर्बिट मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेले हे स्टोअर भारतातील एका अत्यंत गजबजलेल्या ज्वेलरी मार्केटमध्ये ज्वेलबॉक्सचे ऑफलाइन विस्तार धोरण सशक्त करते. नवी मुंबई हे महत्त्वाकांक्षी आणि स्टाइल-जागरूक ग्राहकांचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. येथे उघडलेले ज्वेलबॉक्सचे स्टोअर शाश्वत आणि विविध प्रकारच्या हीऱ्यांच्या आभूषणांची मागणी नक्की पूर्ण करेल. शुभारंभाचा आनंद साजरा करण्यासाठी ज्वेलबॉक्स मर्यादित कालावधीसाठी हीऱ्यांवर ३०% आणि घडणावळीवर २०% सूट देऊ करत आहे.
ज्वेलबॉक्सच्या सह-संस्थापक विदिता कोचर म्हणाल्या, “आमच्या बोरिवलीतील स्टोअरला मिळालेला प्रतिसाद पाहून आमच्या अपेक्षा वाढल्या आणि शाश्वत लक्झरीची मुंबईची भूक पुन्हा एकदा स्पष्ट झाली. वाशीची निवड स्वाभाविकपणेच झाली. वाशी नवी मुंबईच्या रिटेल क्षेत्राचे केंद्र आहे. येथे आम्ही स्टाइलचे मूल्य जाणणाऱ्या आणि जागरुकतेने निवड करणाऱ्या तरुण, प्रगतीशील ग्राहकांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतो. या विस्तारासह, आम्ही लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी जेथे ग्राहक राहतात आणि खरेदी करतात, तेथे घेऊन आलो आहोत.”
वाशी येथील स्टोअरमध्ये दैनंदिन आवश्यक ज्वेलरीपासून ते सॉलीटेअर अंगठ्या, कानातले, पेंडन्ट्स आणि ब्रेसलेट सारख्या विशेष आभूषणांपर्यंत ज्वेलबॉक्सची लॅब-ग्रोन डायमंड जेवलरीची संपूर्ण श्रेणी बघायला मिळेल. दुकानाची रचना विचारपूर्वक करण्यात आली आहे, ज्यात समकालीन सौंदर्यदृष्टी आणि आपलेपणा यांचे संतुलन साधले आहे, जेणेकरून ग्राहकांना सहजतेने आभूषणे बघण्याचा आकर्षक अनुभव मिळू शकेल.
हे स्टोअर अशावेळी उघडले आहे, जेव्हा लॅब-ग्रोन हीऱ्यांची मागणी भारतात वाढत चालली आहे. या उद्योगातील अहवालानुसार २०२४ मध्ये भारतातील लॅब-ग्रोन हीऱ्यांचा बाजार अंदाजे ६२१ मिलियन युएसडी (५१५० कोटी रु.) होता आणि आगामी वर्षांमध्ये तो १४.४% सीएजीआरने वाढेल असा अंदाज आहे. या वाढीमागचे कारण ग्राहकांची वाढती जागरूकता, शाश्वततेचा आग्रह आणि किफायतशीरता हे आहे. ज्वेलबॉक्स या परिवर्तनात आघाडीवर आहे आणि दर्जेदार हीरे डिझाईन किंवा अनुभवाच्या बाबतीत तडजोड न करता सहजप्राप्य बनवत आहे.
मुंबई हा तर प्रामुख्याने विकसित होत असलेला बाजार आहेच, पण या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात आणखी ३० स्टोअर उघडण्याची ज्वेलबॉक्सची योजना आहे. तसेच आसपासच्या प्रमुख क्षेत्रात ऑफलाइन उपस्थिती देखील ते वाढवत आहेत, जेणेकरून ब्रॅंडचा अनुभव घेण्यासाठी ग्राहकांकडे विविध टचपॉइंट असतील.

