टीईआरएन ग्रुपची २४ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
~ भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्यासाठी प्रयत्नशील ~
मुंबई, १२ सप्टेंबर २०२५: हजारो भारतीय परिचारिका आणि काळजी घेणाऱ्या कामगारांसाठी जागतिक करिअरचे स्वप्न कराराने नव्हे तर एका कॉलिंगने सुरू होते. टीईआरएन ग्रुप हा एआय-संचालित जागतिक टॅलेंट मोबिलिटी प्लॅटफॉर्म तो प्रवास शक्य करत आहे, आणि पूर्वीपेक्षा गतीशील, न्याय्य व अधिक पारदर्शक बनवत आहे.
कंपनीने आज सिरीज ए फंडिंगमध्ये २४ दशलक्ष डॉलर्स निधी उभारल्याची घोषणा केली. यूकेमधील नोशन कॅपिटलने आरटीपी ग्लोबल, लोकलग्लोब, ईक्यू२ व्हेंचर्स व निओ कॅपिटल यांच्यासह, तसेच विद्यमान गुंतवणूकदार प्रीसाइट व टॉम स्टॅफर्ड (डीएसटी ग्लोबलचे सह-संस्थापक), माजी एनएचएस अध्यक्ष व एएक्सए हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनेक वरिष्ठ धोरणकर्त्यांसह या निधी फेरीचे नेतृत्व केले. या फेरीसह टीईआरएन ग्रुपचा एकूण निधी ३३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी व दुसऱ्या वेळचे उद्योजक, अर्बन कंपनी व कार्स२४ येथील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थापना केलेला टीईआरएन ग्रुप झपाट्याने भारत, यूके, जर्मनी, यूएई, सौदी अरेबिया, उत्तम आफ्रिकेमध्ये विस्तारित झाला आहे. गेल्या वर्षामध्ये कंपनीने १० पट वाढ केली आहे, जेथे वार्षिक महसूल २०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी १३ देशांमध्ये कार्यरत आहे.
‘आपल्या मिशनमध्ये भारतातील टॅलेंटला प्राधान्य देण्यासह टीईआरएन ग्रुप कर्मचारीवर्ग पायाभूत सुविधा घडवत आहे, जी जागतिक आरोग्यसेवेमध्ये करिअर घडवणे विनासायास, पारदर्शक व विश्वसनीय करते,' असे टीईआरएन ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अविनव निगम म्हणाले. “हा निधी आम्हाला तीन प्राधान्यक्रमांमध्ये दुप्पट वाढ करण्यास मदत करतो, ते म्हणजे नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये विस्तार करणे, आमच्या एआय प्लॅटफॉर्ममध्ये अधिक गुंतवणूक करणे आणि दरवर्षी हजारोहून अधिक व्यावसायिकांना साह्य करण्यासाठी आमचे प्रशिक्षण व कार्यसंचालन वाढवणे.''
नवीन उभारण्यात आलेला निधी टीईआरएनच्या जागतिक विस्तारीकरणाला गती देईल, त्यांचा एआय-समर्थित क्लिनिकल वर्कफोर्स प्लॅटफॉर्म अधिक मजबूत करेल आणि भारतातील अधिकाधिक परिचारिका व काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय करिअरकरिता सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षण पायाभूत सुविधेमध्ये वाढ करेल.
