Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजला मिळाले ५-स्‍टार भारत एनसीएपी रेटिंग

 ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजला मिळाले ५-स्‍टार भारत एनसीएपी रेटिंग

~ भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक बनली ~

मुंबई, २० सप्टेंबर २०२५: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज घोषणा केली की, ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजला भारत एनसीएपी (बी-एनसीएपी) कडून प्रतिष्ठित ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. प्रौढ प्रवासी संरक्षणामध्‍ये २९.६५/३२ आणि लहान मुलांच्‍या सरंक्षणामध्‍ये ४४.९/४९ च्‍या प्रभावी स्‍कोअरसह अल्‍ट्रोज आता अधिकृतरित्‍या भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे. तिच्‍या श्रेणीमध्‍ये सुरक्षिततेसाठी मापदंड स्‍थापित करणारी अल्‍ट्रोज २०२० मध्‍ये ग्‍लोबल एनसीएपीकडून ५-स्‍टार रेटिंग मिळवणारी पहिली हॅचबॅक होती.



उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ही भारतातील पेट्रोल, डिझेल व सीएनजी पॉवरट्रेन्‍स प्रदान करणारी एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. या कारने तिच्‍या सर्व पॉवरट्रेन्‍सच्‍या श्रेणी व बॉडी स्‍टाइलमध्‍ये भारत एनसीएपी प्रोटोकॉलअंतर्गत सर्वोच्‍च ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग संपादित करणारी पहिली कार बनत इतिहास देखील रचला. तसेच, ही सर्वोच्‍च सेफ्टी रेटिंग संपादित करणारी एकमेव सीएनजी-समर्थित कार आहे. या टप्‍प्‍यामधून अल्‍ट्रोजच्‍या सर्व इंधन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सुरक्षितता व वैविध्‍यतेमधील तिचे अद्वितीय नेतृत्‍व दिसून येते. 

अल्‍ट्रोजच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे उपाध्‍यक्ष व मुख्‍य उत्‍पादन अधिकारी श्री. मोहन सावरकर म्‍हणाले, ''अल्‍ट्रोज प्रीमियम हॅचबॅक श्रेणीमध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी राहिली आहे. समकालीन डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि मल्‍टी-पॉवरट्रेन नेतृत्वित दृष्टिकोनाच्‍या संयोजनासह ही कार ग्राहकाला 'फिल स्‍पेशल'चा अनुभव देते. उद्योगासाठी ट्रेण्‍डसेटर अल्‍ट्रोजने तिच्‍या श्रेणीमधील पेट्रोल, डिझेल व सीएनजी पॉवरट्रेन्‍ससाठी भारत-एनसीएपीकडून प्रतिष्ठित ५-स्‍टार रेटिंग संपादित करणारी एकमेव कार बनत पुन्‍हा एकदा मापदंडांना नव्‍या उंचीवर नेले आहे, ज्‍यामुळे ही भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक ठरली आहे. या यशामधून कार वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यावर आमचे ग्राहक आत्‍मविश्वासाने अवलंबून राहू शकतात.''

मे २०२५ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजने सुरक्षितता व विश्वासाचा आपला वारसा कायम ठेवला आहे. टाटा मोटर्सच्या प्रमाणित अल्‍फा (एजाइल लाइट फ्लेक्झिबल अॅडवान्‍स्‍ड) आर्किटेक्‍चरवर डिझाइन करण्‍यात आलेली अल्‍ट्रोज तिच्‍या डायमंड स्‍ट्रेण्‍थ सेफ्टी शील्‍डसह अधिक संरचनात्‍मक प्रबळता व सुधारित क्रम्‍पल झोन्‍सची खात्री देते, तसेच प्रवाशांच्‍या संरक्षणामध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करत आहे. भारतातील या सर्वात सुरक्षित हॅचबॅकमध्‍ये शक्तिशाली सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामध्‍ये सहा एअरबॅग्‍स, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) आणि सर्व परसोनामध्‍ये प्रमाणित म्‍हणून आयएसओएफआयएक्‍स चाइल्‍ड सीट रेस्‍ट्रेण्‍ट्स आहेत, तसेच ३६०० एचडी साराऊंड व्‍ह्यू कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर, डायरेक्‍ट टीपीएमएस, एसओएस व ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍स, ऑटो हेडलॅप्‍स, रेन-सेन्सिंग वायपर्स आणि एलईडी फॉग लॅम्‍प्‍ससह कॉर्नरिंग फंक्‍शन आहे, जे प्रत्‍येक ड्राइव्‍हदरम्‍यान सर्वांगीण संरक्षण आणि परिपूर्ण समाधान देतात. 



सुरक्षिततेव्‍यतिरिक्‍त, अल्‍ट्रोज श्रेणीमधील सर्वोत्तम डिजिटल व केबिन अनुभवासह प्रीमियम दर्जा वाढवते. हार्मनची १०.२५ इंच अल्‍ट्रा व्‍ह्यू इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम विनासायासपणे फुल-डिजिटल एचडी क्‍लस्‍टरमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आली आहे, ज्‍यासोबत‍ वॉईस-एनेबल सनरूफ, वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, वायरलेस चार्जिंग, ड्युअल ६५ वॅट फास्‍ट चार्जर्स, एअर प्‍युरिफायरसह त्‍वरित कूलिंग आणि आयआरए कनेक्‍टेड कार तंत्रज्ञान आहे. सॉफ्ट-टच मटेरिअल्‍स, अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि लाऊंज-सारखे रिअर सीटिंग आरामदायीपणा व लक्‍झरी वाढवतात. कार्यक्षमतेसंदर्भात अल्‍ट्रोज भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक म्‍हणून अग्रस्थानी आहे, जी पेट्रोल, डिझेल व आयसीएनसी अशा व्‍यापक पॉवरट्रेन रेंजसह ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञान, तसेच विविध ट्रान्‍समिशन पर्यायांसोबत मॅन्‍युअल गिअरबॉक्‍स, डीसीए आणि एएमटी देते, ज्‍यामुळे ही कार श्रेणीमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण व प्रीमियम निवड आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.