Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

द बर्गर कंपनीच्या पिको फॉरमॅटला जबरदस्त प्रतिसाद

 द बर्गर कंपनीच्या पिको फॉरमॅटला जबरदस्त प्रतिसाद

मुंबई, २२ सप्टेंबर २०२५: द बर्गर कंपनी (टीबीसी) ने टीबीसी पिको या आपल्या नवीन फॉरमॅटचा अधिकृत शुभारंभ केल्याची घोषणा केली आहे. टीबीसी पिको हे एक सुटसुटीत पण संपूर्ण-स्वादिष्ट आउटलेट मॉडेल आहे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत या ब्रॅंडची खास चव पोहोचवण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. या संकल्पनेला आधीच जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आत्तापर्यंत 10,000 पेक्षा जास्त थेट एक्सप्रेशन ऑफ इंट्रेस्ट (इओआय) प्राप्त झाले आहेत.




पिको ला सर्वाधिक प्रतिसाद दिल्ली एनसीआर (१,००० इओआय पेक्षा जास्त) मधून मिळाला आहे. त्याच्या पाठोपाठ बंगळूर, अहमदाबाद, जयपूर आणि पूर्व यूपी येथून प्रत्येक ५००+ इओआय मिळाले आहेत. या शहर-निहाय मागणीमधून नवीन, उच्च शक्यता असलेल्या बाजारपेठेत टीबीसी च्या विस्ताराबाबतचा जबरदस्त उत्साह दिसून येतो.

५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पहिले टीबीसी पिको आउटलेट सुरू होईल. याच महिन्यात आणखी ५ ते ७ आउटलेट्स देखील उघडतील. आणखी २५+ आधीच तयार आहेत जी पुढच्या काही आठवड्यांत सुरू होतील.

आपल्या मूळ तत्वाला अनुसरून प्रत्येक पिको आउटलेटमध्ये टीबीसीच्या नेहमीच्या मेन्यूमधील मुख्य आकर्षणे असतील, जशी की, व्हेजिटेरियन बर्गर्स, चिकनचे पर्याय, फ्राइज, मंचीज, सॅंडविचेस, मोमोज, पाय आणि बेव्हरेजिस. हा खास तयार केलेला मेन्यू या गोष्टीची खातरजमा करेल की, ग्राहकांना एका आटोपशीर, परिसराशी अनुकूल अशा फॉरमॅटमध्ये टीबीसी चे तेच आवडते स्वाद आणि विविध प्रकार अनुभवता येतील.



द बर्गर कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ नीलम सिंह म्हणाल्या, “पिको च्या मदतीने आम्ही टीबीसीची ग्राहकांपर्यंतची पोहोच वाढवत आहोत आणि त्याच वेळी ग्राहकांना आमच्या ज्या ज्या गोष्टी आवडतात, म्हणजे उत्तम चव, विविधता आणि गुणवत्ता या गोष्टी कायम ठेवत आहोत. आम्हाला मिळालेल्या उदंड प्रतिसादातून या संकल्पनेची ताकद स्पष्ट होते आणि आमच्या विकास यात्रेतील हा एक रोमांचक नवीन अध्याय आहे.”

पिको फॉरमॅट इनोव्हेशन, स्केलेबिलिटी आणि ग्राहक सुविधेप्रती असलेली टीबीसी ची वचनबद्धता दर्शवितो आणि देशभरात उत्कृष्ट खाद्यानुभव प्रदान करण्यावर आधारित एक ब्रॅंड म्हणून टीबीसी चे स्थान मजबूत करतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.