Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जनरेशन जी ने अहान पांडे आणि अनीत पड्डाचा सन्मान केला, आकाशातील एका तार्‍याला नाव दिलं ‘सैयारा’!

 जनरेशन जी ने अहान पांडे आणि अनीत पड्डाचा सन्मान केला, आकाशातील एका तार्‍याला नाव दिलं ‘सैयारा’!


सैयारा, ज्यात डेब्यू स्टार्स अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी काम केले आहे, या चित्रपटाने सर्व अपेक्षांना धक्का देत जागतिक स्तरावर जवळपास 600 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यात परदेशी बाजारातून जवळपास 20 मिलियन डॉलर्सचा समावेश आहे। हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा लव्ह स्टोरी चित्रपट ठरला आहे। यामुळे भारतीय मनोरंजन उद्योग थक्क झाला आणि देशाला दोन जनरेशन जी स्टार्स मिळाले, ज्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत।



सैयाराला आता या पिढीचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ) आणि कहो ना प्यार है म्हटलं जात आहे, कारण या चित्रपटाने आणि अहान-अनीत च्या सांस्कृतिक प्रभावाने भारतासह जगभरातील दक्षिण आशियाई लोकांवर ठसा उमटवला आहे।  अहान आणि अनीतचा लाँच हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे, ज्याची तुलना 25 वर्षांपूर्वी ऋतिक रोशन आणि अमीषा पटेल यांच्या डेब्यूसोबत केली जात आहे। त्यांनी साकारलेली पात्रे – कृष कपूर आणि वाणी बत्रा – आता DDLJ मधील राज आणि सिमरन यांच्यासारख्या आयकॉनिक स्तरावर पोहोचली आहेत।


आज,  अहान आणि अनीतच्या जनरेशन जी चाहत्यांनी आपले आवडते ऑन-स्क्रीन आयकॉन साजरे करण्याचा गोड मार्ग निवडला – त्यांनी आकाशातील एका तार्‍याला नाव दिलं सैयारा! येथे त्यांच्या पोस्टचा लिंक आहे : : https://www.instagram.com/p/DOpr18VkqnC/?igsh=dWU1MXMzN2Y2Nmto


अहान आणि अनीत या प्रेमळ कृतीने भारावून गेले। अहान म्हणाला,"खरे तारे तुम्ही आहात, तुमच्या प्रकाशा मुळेच आम्ही उजळतो। मला तो दिवस आठवतो जेव्हा सैयारा चित्रपटगृहातून खाली उतरला। सगळं काही घडलं होतं पण मी त्या भावनेत स्वतःला बुडू दिलं नव्हतं। आता हे पाहताना वाटतंय जणू चित्रपटाने विश्वात स्वतःची जागा शोधून काढली आहे, त्या आकाशगंगेत जिथे सगळ्या सुंदर गोष्टी जातात जेव्हा त्या इथून निघून जातात। माझे शब्द माझ्या भावना सांगू शकत नाहीत, कारण या भावना शब्दांच्या पलीकडे आहेत। पण हा जादू आहे, अपरंपार जादू। मनःपूर्वक आभार,"


तर अनीत म्हणाली, "कधी कधी मला वाटतं चित्रपट संपला। मग तुम्ही असं काही करता आणि मला जाणवतं की कथा कधी संपत नाहीत, त्या फक्त नवे आकाश शोधतात 💗। एका तार्‍याचं नाव भलेही सैयारा असू दे, पण खरी आकाशगंगा नेहमी तुम्हीच आहात। आमची कहाणी अनंत वाटण्यासाठी दिलखुलास धन्यवाद।"


अलीकडेच, बॉलिवूडचे दिग्गज आमिर खान यांनी मीडियामध्ये सैयारा आणि  अहान -अनीतच्या पॉप-कल्चर इम्पॅक्टवर भाष्य केले। त्यांनी चित्रपटाच्या लोकप्रियतेचे श्रेय त्याच्या भावनिक प्रामाणिकपणाला आणि तरुणाईच्या उर्जेला दिले आणि म्हटले की जनरेशन जी ला ओरिजिनॅलिटी आणि रिलेटेबिलिटी आवडते।


इतिहासात पहिल्यांदाच, जनरेशन जी ला लक्ष्य करून बनवलेली लव्ह स्टोरी चित्रपटगृहांमध्ये इतकी मोठी यशस्वी ठरली। यामुळे हा समज मोडून पडला की तरुण आता चित्रपटगृहात जात नाहीत किंवा त्यांच्याकडे खरे आयकॉन नाहीत। सैयाराच्या यशाने दाखवून दिलं की जनरेशन जी फक्त अशा चेहऱ्यांची वाट पाहत होती जे त्यांना पडद्यावर रिप्रेझेंट करतील, त्यांच्या वयोगटातील असतील, त्यांची भाषा बोलतील आणि त्यांच्या आतल्या गहि-य भावना जगासमोर मांडतील।


अहान आणि अनीत यांनी त्यांना हे सगळं दिलं आणि भरभरून दिलं, म्हणूनच ते एका रात्रीत स्टार झाले। खरेतर, ही जनरेशन जी च होती जिने आपले स्टार्स निवडले आणि घडवले।  अहान-अनीत हे तरुणाईचे चेहरे बनले, जे एकमेकांसमोर आपली कमजोरी आणि भावनिक खोली दाखवण्यास घाबरत नाहीत। त्यांनी हेही दाखवलं की ही पिढी मेंटल हेल्थवर उघडपणे बोलण्यात घाबरत नाही। त्यांनी जनरेशन जी सोबत एक गहिरे भावनिक नाते जोडले, जे अजूनपर्यंत कोणीच करू शकले नव्हते।



त्यांच्या झपाट्याने मिळालेल्या यशामुळे, प्रचंड मीडिया लक्षामुळे आणि प्रेक्षकांसोबतच्या नात्यामुळे, आता ते भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वात रोमांचक नवे चेहरे ठरले आहेत। जनरेशन जी ने वारंवार दाखवून दिलं आहे की ते खरी टॅलेंटची कदर करतात आणि  अहान-अनीत यांनी आपल्या अभिनयाने त्यांना जिंकून घेतले आहे। परिणाम – हे दोन्ही तरुण कलाकार आता सोशल मीडियावर सर्वाधिक एंगेज्ड सेलेब्रिटी झाले आहेत।


IMDBच्या माहितीनुसार, आहान आणि अनीत यांना आजच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स म्हणून निवडले गेले आहे। त्यांनी जनरेशन जी सोबत नाते आपल्या कामाच्या जोरावर बांधले आहे, सतत उपलब्ध राहून नाही। त्यांनी आतापर्यंत एकही व्हिडिओ इंटरव्ह्यू दिलेला नाही, ना एकही प्रेस अपीयरन्स केलेली आहे, तरीदेखील त्यांची लोकप्रियता आकाशाला भिडली आहे। यामुळे सर्वांना हे दाखवून दिलं की जनरेशन जी आपल्या आयकॉनकडून फक्त त्यांच्या कामातून संवाद साधायला इच्छिते आणि त्यांना त्याबदल्यात निःशर्त प्रेम मिळेल।

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.