एमएसएमईच्या विकासासाठी ‘बझिंग फॉर भारत’ उपक्रमाची सुरुवात
~ डिजिटायझेशन आणि जागतिक संधींच्या माध्यमातून एमएसएमईच्या वाढीस चालना देणारे व्यासपीठ ~
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२५: भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) डिजिटल क्षमतांना बळकटी देत शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी ईझबझने ‘बझिंग फॉर भारत’ या अभिनव व्यासपीठाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश एमएसएमई क्षेत्राला डिजिटायझेशन आणि जागतिक संधींच्या माध्यमातून अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवणे हा आहे. डिजिटल एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्याने मुंबईत ‘बझिंग फॉर भारत’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सातत्यपूर्ण इकोसिस्टम म्हणून तयार करण्यात आलेला ‘बझिंग फॉर भारत’ उपक्रम मान्यता, प्रवेश आणि सक्षमीकरण या तीन प्रमुख स्तंभांद्वारे एमएसएमई क्षेत्राला दीर्घकालीन विकास आणि व्यवसायवृद्धीच्या दिशेने अधिक सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ईझबझचे ग्रुप हेड, परिमल श्रीवेंदू, म्हणाले, “‘बझिंग फॉर भारत’ हे एक सहयोगी व्यासपीठ म्हणून तयार करण्यात आले आहे, जे इकोसिस्टममधील विविध भागधारकांना एकत्र आणून एमएसएमई उद्योगांना डिजिटायझेशन, वाढीसाठी भांडवल मिळवणे आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्यास सक्षम करते. ‘डिजिटल एक्सीलन्स अवॉर्ड्स’ हा उपक्रम भारतातील लघु उद्योगांमध्ये डिजिटल समावेश आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नाची सुरुवात दर्शवतो.”
भारताच्या एकूण जीडीपीमध्ये एमएसएमईंचा सुमारे ३०% वाटा असून ते ११० दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देतात, त्यामुळे त्यांच्या डिजिटल आणि आर्थिक क्षमतांना बळकटी देणे हा देशाच्या आर्थिक गती टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ‘बझिंग फॉर भारत’ उपक्रमाचा उद्देश एमएसएमई क्षेत्रातील वित्तीय प्रवेश, डिजिटल स्वीकार आणि बाजारपेठेतील संबंध यासंबंधी मुख्य आव्हाने हाताळण्याचा असून, याचबरोबर या क्षेत्रात समावेश आणि नवोन्मेष वाढवणे हा आहे.
पुढील काही महिन्यांत, या व्यासपीठाचा विस्तार मार्गदर्शन कार्यक्रम, कौशल्यवृद्धी सत्रे, तसेच एमएसएमई उद्योगांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणाऱ्या उपक्रमांचा समावेश करण्यासाठी करण्यात येईल.