Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पेटीएमने भारतातील पहिले एआय संचालित रॅप फीचर ‘प्लेबॅक’ सादर केले

 पेटीएमने भारतातील पहिले एआय संचालित रॅप फीचर ‘प्लेबॅक’ सादर केले

~ मासिक खर्चांचे म्युझिकल रीकॅप करेल तयार ~

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२५: पेटीएमने एआयद्वारे समर्थित अनुभव 'प्लेबॅक' सादर केला आहे जो मागील महिन्याच्या खर्चांना वैयक्तिक रॅप रीकॅपमध्ये रूपांतरित करतो. या अनोख्या नवकल्पनेद्वारे पेटीएम आर्थिक आकडेवारीला मनोरंजक आणि संबंधित पद्धतीने सादर करत आहे.

पेटीएम अॅपमधील ‘बॅलन्स अँड हिस्ट्री’ विभागात ‘प्लेबॅक' हे फीचर उपलब्ध असून, येथे एआय तुमच्या खर्चाच्या डेटाला कस्टम रॅप वर्सेसमध्ये बदलते. हा रॅप तुमच्या शॉपिंग, फूड, ट्रॅव्हल आणि युटिलिटी बिल्सवरील खर्चांना क्रिएटिव्ह लिरिक्सद्वारे दाखवतो, ज्यामुळे प्रत्येक महिन्याचा खर्च एक मजेदार आणि इंटरॅक्टिव्ह अनुभव बनतो. सध्या हे फीचर पेटीएमच्या निवडक हाय-ट्रान्झॅक्टिंग वापरकर्त्यांसाठी बीटा फेजमध्ये उपलब्ध आहे. कंपनी वापरकर्त्यांच्या अभिप्रायावर आधारित हा अनुभव आणखी समृद्ध करत आहे.




पेटीएम प्रवक्त्याने सांगितले, “भारतातील पहिले एआय संचालित रॅप असलेले आमचे ‘प्लेबॅक’ फीचर हे खर्च ट्रॅकिंग अधिक मजेदार बनवते आणि वापरकर्त्यांना त्यांच्या मासिक खर्चांवर नव्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करते. आजचे तरुण प्रत्येक गोष्टीकडे कंटेंट म्हणून पाहतात आणि आम्हाला त्यांच्या मासिक खर्चाच्या स्टेटमेंटला अधिक एंगेजिंग आणि रिलेटेबल बनवायची संधी दिसली. वापरकर्ते त्यांच्या रॅप सॉंगसोबत ‘वाइब’ करताना आपल्या खर्चाच्या सवयींबद्दल विचार करतील, ज्यामुळे वित्तीय जागरूकता वाढेल अशी आम्हाला आशा आहे. एक विश्वासार्ह पेमेंट्स प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही सतत नवनवीन सोल्यूशन्स आणि स्मार्ट टूल्स आणण्यासाठी कटिबद्ध आहोत ज्यामुळे वित्त व्यवस्थापन अधिक सोपे होईल.”

पेटीएमवर मासिक खर्च रॅप तयार करण्यासाठी पेटीएम अॅप उघडा आणि खात्री करा की ते नवीनतम आवृत्तीत अपडेट केलेले आहे. यानंतर होम स्क्रीनवर जा आणि ‘बॅलन्स अँड हिस्ट्री’ विभागावर टॅप करा. ‘पेटीएम प्लेबॅक’ बॅनरवर क्लिक करा, जेणेकरून मागील महिन्याच्या पेमेंट्सचा वैयक्तिक रॅप तयार होईल. एआय त्याची जादू दाखवेल आणि तुमच्या खर्चाचा डेटा आता मजेशीर रॅप सॉंगमध्ये बदलेल. हा रॅप ऐका आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.