Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

टोयोटाने सप्‍टेंबरमध्‍ये ३१,०९१ युनिट्सची विक्री केली

 टोयोटाने सप्‍टेंबरमध्‍ये ३१,०९१ युनिट्सची विक्री केली

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने सप्‍टेंबर २०२५ मध्‍ये ३१,०९१ युनिट्सची विक्री केली. या आकडेवारीमध्‍ये २७,०८९ देशांतर्गत विक्रीचा समावेश आहे, तर ४,००२ युनिट्स निर्यात बाजारपेठांमध्‍ये पाठवण्‍यात आल्या.

टीकेएमने सप्‍टेंबर २०२४ मध्ये २६,८४७ युनिट्सची विक्री केली होती. यात १६ टक्क्यांची वाढ नोंदवत कंपनीने सप्टेंबर २०२५ मध्ये ३१,०९१ युनिट्सची विक्री केली आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या ६ महिन्यांची आकडेवारी पाहिल्यास टीकेएमने एप्रिल-सप्‍टेंबर २०२४ कालावधीत १,६२,६२३ युनिट्सची विक्री केली होती. यात १४ टक्क्याची वाढ नोंदवत कंपनीने एप्रिल-सप्‍टेंबर २०२५ या कालावधीत १,८४,९५९ युनिट्सची विक्री केली आहे.  




टीकेएमचे सेल्‍स-सर्विस-युज्‍ड कार बिझनेस उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले की, ''भारत सरकारने जीएसटी दरामध्‍ये केलेली सुधारणा आणि सणासुदीचा काळ सुरू होण्‍यासह बाजारपेठेतील उत्‍साह शिगेला पोहोचला आहे. टीकेएममध्‍ये आम्‍ही ग्राहकांना जीएसटीचे संपूर्ण फायदे जारी केले आहेत, ज्‍यामुळे आमच्‍या पोर्टफोलिओसाठी मागणी वाढली आहे. सणासुदीच्‍या काळाला गती मिळत असताना आम्‍हाला पुढे प्रबळ कामगिरीचा आत्‍मविश्वास आहे. सध्‍या, आम्‍ही वेळेवर डिलिव्‍हरीला अधिक प्राधान्‍य देत आहोत, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या आवडत्‍या टोयोटासोबत सण साजरीकरणाचा आनंद घेऊ शकतात आणि या सीझनला अधिक विशेष बनवू शकतात.''

सप्टेंबर महिन्यात टीकेएमने सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह नवीन रूमियॉन लाँच केली ज्यात सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍जची भर करण्‍यात आली आहे. ग्राहकांना संपूर्ण जीएसटी फायदे देण्‍यात आले आहेत, ज्‍यासह टीकेएमने वेईकल्‍सच्‍या किमती कमी केल्‍या. तसेच टीकेएमने ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जपानमधील आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रतिष्ठित परफॉर्मन्‍स ग्रुप ड्रम टाओसोबत सहयोग केला.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.