किया इंडियाची 'इन्स्पायरिंग डिसेंबर' मोहिम
~ कियाच्या मॉडेल्सवर जवळपास ३.६५ लाख रूपयांच्या फायदा ~
मुंबई, १७ डिसेंबर २०२५: किया इंडियाने आज ग्राहकांना आनंदित करणारा त्यांच्या वर्षाखेर उपक्रम 'इन्स्पायरिंग डिसेंबर' मोहिमेच्या लॉंचची घोषणा केली, जेथे कियाच्या मॉडेल्सवर जवळपास ३.६५ लाख रूपयांच्या फायद्यांचा आनंद घेता येईल. संपूर्ण डिसेंबर २०२५ महिना राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा ग्राहकांना वर्ष संपण्यापूर्वी त्यांची आवडती किया खरेदी करण्यासाठी अद्वितीय मूल्य आणि उत्साहवर्धक संधी देण्याचा मनसुबा आहे.
ही मोहिम किया इंडियाच्या विविध उत्पादन श्रेणीवर लागू आहे, जसे सेल्टोस, सोनेट, सिरॉस, कॅरेन्स क्लॅव्हिस (आयसीई/ईव्ही) आणि कार्निवल, ज्यामुळे अपग्रेड करू पाहणाऱ्या ग्राहकांना आकर्षक फायदे मिळतील. या ऑफर्स मॉडेल्सवर सुधारित मूल्य देतात, ज्यासह कियाची सिग्नेचर डिझाइन, तंत्रज्ञान व सुरक्षिततेचा अनुभव घेण्यासाठी ही परिपूर्ण वेळ आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत किया इंडियाच्या सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अतुल सूद म्हणाले, ''किया इंडियासाठी महत्त्वपूर्ण वर्षाची सांगता होत असताना ग्राहक अनुभव उत्साहित करण्याप्रती आमची कटिबद्धता कायम आहे. 'इन्स्पायरिंग डिसेंबर' मोहिम ग्राहकांचे त्यांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासासाठी आभार व्यक्त करण्याची आणि त्यांना कियाची डिझाइन, तंत्रज्ञान व मालकीहक्क उत्कृष्टतेचा अनुभव देण्याची आमची पद्धत आहे. आम्ही किया कुटुंबामध्ये अनेक नवीन सदस्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत, तसेच आमच्या विद्यमान ग्राहकांसोबत नाते अधिक दृढ करत आहोत.''
या ऑफर्स कियाची प्रीमियम गतीशीलता अधिक लक्षवेधक करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये रोख फायदे, एक्स्चेंज ऑफर्स, लॉयल्टी बोनस, कॉर्पोरेट योजना यांचा समावेश आहे, ज्या प्रमुख मॉडेल्सवर उपलब्ध आहेत.
या ऑफर्स किया इंडियाच्या देशभरातील व्यापक डिलर नेटवर्कच्या माध्यमातून उपलब्ध असतील आणि डिसेंबर २०२५ मध्ये मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत, तसेच स्टॉकची उपलब्धता आणि व्हेरिएण्टनुसार लागू असतील.प्रबळ, भविष्यासाठी सुसज्ज उत्पादन व सेवा धोरणासह किया इंडिया प्रगतीशील गतीशीलता सोल्यूशन्स, अपवादात्मक सेवा दर्जा आणि दीर्घकालीन ग्राहक विश्वास देण्याचा आपला दृष्टिकोन अधिक दृढ करत आहे.
