Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

क्विक हीलची बीआयआरडीसह हातमिळवणी

 क्विक हीलची बीआयआरडीसह हातमिळवणी


मुंबई, १६ फेब्रुवारी २०२५: संपूर्ण भारतातील रूरल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्‍स (आरएफआय) मधील सायबरसुरक्षा प्रबळ करण्‍याच्‍या परिवर्तनात्‍मक दिशेने पाऊल उचलत क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍समधील जागतिक अग्रणी कंपनीने बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्‍हलमेंट (बीआयआरडी), लखनौसोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली आहे. क्विक हीलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल साळवी आणि बीआयआरडी लखनौचे संचालक श्री. निरूपम मेहरोत्रा यांनी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी करत या सहयोगाला अधिकृत केले. हा सहयोग सर्वात असुरक्षित आर्थिक क्षेत्र ग्रामीण वित्तपुरवठ्यामधील वाढत्‍या सायबरसुरक्षा जोखीमांचे निराकरण करण्‍याचा आणि सुरक्षित आर्थिक समावेशनाला चालना देणारी प्रबळ डिजिटल इकोसिस्‍टम तयार करण्‍याचा प्रयत्‍न करतो.



क्विक हीलचे तीन दशकांपासूनचे सायबरसुरक्षा कौशल्‍य आणि भारतातील सर्वात मोठी फॅसिलिटी सेक्‍यूराइट लॅब्‍सच्‍या माध्‍यमातून मालवेअर विश्‍लेषणामधील त्‍यांच्‍या नेतृत्‍वाचा फायदा घेत हा सहयोग आरएफआयला सुरक्षित करण्‍यासाठी प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. या सहयोगांतर्गत प्रत्‍यक्ष प्रशिक्षण व कौशल्‍य विकासासाठी विशेष डिझाइन करण्‍यात आलेल्‍या बीआयआरडी लखनौ येथे प्रगत सायबरसिक्‍युरिटी लॅब स्‍थापित करण्‍यात येईल. दोन्‍ही कंपन्‍या एकत्रित संशोधन करत सायबरसुरक्षा उपाययोजनांच्या अवलंबतेचे मूल्‍यांकन करतील, आरएफआयच्‍या तंत्रज्ञान पायाभूत सुविधेचे विश्‍लेषण करतील आणि या कंपन्‍यांमधील कौशल्‍यसंदर्भातील तफावतींना ओळखतील. सहयोगाने, ते विशेषीकृत प्रशिक्षण मॉड्यूल्‍स विकसित करतील आणि कार्यशाळा आयोजित करतील, ज्‍यांचा सायबर सुरक्षा व फसवणूक प्रतिबंधामधील सर्वोत्तम पद्धतींना चालना देण्‍याचा मनसुबा आहे. तसेच, या सहयोगांतर्गत धोरणासंदर्भात सल्‍ला देण्‍यात येईल, उदयास येत असलेल्‍या जोखीमांविरोधात आरएफआयच्‍या सुसज्‍जतेचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी सायबर ड्रिल्‍स आयोजित करण्‍यात येईल आणि सायबरसुरक्षा व ग्रामीण वित्तपुरवठा क्षेत्रांमधील तज्ञ व भागधारकांना कनेक्‍ट करण्‍यासाठी नॉलेज एक्‍स्‍चेंज प्‍लॅटफॉर्म डिझाइन करण्‍यात येईल.




क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल साळवी म्‍हणाले, “ग्रामीण भारतात डिजिटल परिवर्तन होत असताना आर्थिक संस्‍थांच्‍या संरक्षणासाठी सायबरसुरक्षेचा प्रबळ पाया निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यामध्‍ये समाविष्‍ट गुंतवणूक कमी असली तरी उल्‍लंघनाचा परिणाम मोठा असतो. म्‍हणून, बीआयआरडीसोबतचा आमचा सहयोग ग्रामीण वित्तपुरवठा सुरक्षित करण्‍यामध्‍ये महत्त्वाचा आहे. कंपन्‍यांचे सायबर जोखीमांपासून संरक्षण करण्‍यामध्‍ये क्विक हीलचे दशकापासूनचे कौशल्‍य आणि बीआयआरडीचे ग्रामीण वित्तपुरवठाबाबतची सखोल समज एकत्र करत आम्‍ही अधिक स्थिर आर्थिक सिस्‍टमसाठी मंच स्‍थापित करत आहोत. संशोधन अभ्‍यास, सायबरसिक्‍युरिटी लॅब्‍स व प्रशिक्षण उपक्रम यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आमचा आरएफआयना आवश्‍यक टूल्‍स, धोरणे व माहितीसह सुसज्‍ज करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे ते डिजिटल युगामध्‍ये प्रगती करतील आणि सायबरसुरक्षा आर्थिक समावेशनाचा मुलभूत आधार बनण्‍याची खात्री मिळेल.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.