Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

या ५ वैशिष्ट्यांमुळे 'ऑडी ए६' ठरली एक परिपूर्ण एक्झिक्‍युटिव्‍ह सेदान

 या ५ वैशिष्ट्यांमुळे 'ऑडी ए६' ठरली एक परिपूर्ण एक्झिक्‍युटिव्‍ह सेदान


एक्झिक्‍युटिव्‍ह सेदान्‍सच्‍या क्षेत्रात ऑडी ए६ अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाइनच्‍या एकसंध संयोजनामुळे इतरांपेक्षा वरचढ ठरते. ही वेईकल दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सादर करण्‍यात आली आहे - प्रीमियम प्‍लस व टेक्‍नॉलॉजी आणि या वेईकलची किंमत ६५,७२,००० रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते.

ऑडी ए६ ला सर्वोत्तम निवड ठरवणारी ५ मुख्य वैशिष्‍ट्ये:

१. आकर्षक डिझाइन:

ऑडी ए६ ची डिझाइन शैली आकर्षक व सर्वोत्तम आहे. सिग्‍नेचर सिंगलफ्रेम ग्रिल आणि आकर्षक एलईडी हेडलाइट्स रस्‍त्‍यावर वेईकलच्‍या लक्षवेधकतेमध्‍ये अधिक वाढ करतात, ज्‍यामुळे वेईकल सहजपणे ओळखता येते.

२. लक्‍झरीअस आणि तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत इंटीरिअर:

ऑडी ए६ चे केबिन आधुनिक लक्‍झरीचे प्रतीक आहे. उच्‍च दर्जाचे मटेरिअल्‍स, बारकाईने केलेली कारागिरी आणि किमान व लक्षवेधक डिझाइन आकर्षक वातावरणाची निर्मिती करतात. ड्युअल टचस्क्रिन एमएमआय इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम विविध फंक्‍शन्‍सवर सर्वोत्तम नियंत्रण देते, तर ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट आवश्‍यक ड्रायव्हिंग माहितीसाठी कस्‍टमायझेबल डिजिटल डिस्‍प्‍ले देते. 




३. कार्यक्षम व प्रतिसादात्‍मक परफॉर्मन्‍स:

हूडअंतर्गत ऑडी ए६ मध्‍ये २.०-लीटर टीएफएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेचे सुसंगत संतुलन देते. इंजिनच्‍या प्रतिसादात्‍मकतेमधून त्‍वरित अॅक्‍सेलरेशनची खात्री मिळते, तर सुधारित सस्‍पेंशन सिस्‍टम शहरातील रस्‍त्‍यांमधून नेव्हिगेट करायचे असो किंवा महामार्गावर साहसी ड्रायव्हिंगचा आनंद घ्‍यायचा असो सुलभ व सुसज्‍ज राइड देते.

४. अत्‍याधुनिक ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स:

ऑडी ए६ मध्‍ये प्रगत ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स वैशिष्‍ट्यांची श्रेणी आहे, जी सुरक्षितता व सोयीसुविधा वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. यामध्‍ये अॅडप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि पार्किंग असिस्‍ट सिस्‍टम्‍सचा समावेश आहे, जे विनासायासपणे काम करत विविध स्थितींमध्‍ये ड्रायव्‍हरला साह्य करतात. एकीकृत करण्‍यात आलेल्‍या या तंत्रज्ञानांमधून आत्‍मविश्‍वासपूर्ण व आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवाचा आनंद मिळतो.

५. सर्व प्रवाशांसाठी अपवादात्‍मक आरामदायीपणा

ऑडीने ए६ मध्‍ये आरामदायीपणाला प्राधान्‍य दिले आहे, जेथे ड्रायव्‍हर व प्रवाशी नयनरम्‍य प्रवासाचा आनंद घेतात. एैसपैस इंटीरिअर व्‍यापक लेगरूम देते, तर प्रगत क्‍लायमेट कंट्रोल सिस्‍टम सानुकूल वातावरण कायम ठेवते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.