फाइंडॅबिलिटी सायन्सेसचा छत्रपती संभाजीनगरमध्ये विस्तार
~ कमी उत्पन्न गटातील १०० हून अधिक तरुणांना जागतिक दर्जाचे एआय तंत्रज्ञ शिक्षण आणि रोजगार ~
मुंबई, २० मे २०२५: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित एंटरप्राइझ सोल्यूशन्समध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या फाइंडॅबिलिटी सायन्सेस या कंपनीने आज छत्रपती संभाजीनगर (पूर्वाश्रमीचे औरंगाबाद) येथे आपल्या कामकाजाचा विस्तार करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाद्वारे कंपनीने भारतातील उदयोन्मुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्याची व स्थानिक गुणवत्तावान प्रतिभेला संधी देण्याची आपली कटिबद्धता अधोरेखित केली आहे.
चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील प्रोझोन मॉलजवळील एबीसी ईस्ट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उभारण्यात आलेली ही नवीन सुविधा, फाइंडॅबिलिटीसायन्सेसच्या विद्यमान सेन्टर ऑफ एक्सलेन्स चे विस्तार म्हणून काम करणार आहे. येथून एआय इंजिनिअरिंग टीमचा विस्तार केला जाणार असून, एजन्टिक वर्कफ्लो इंजिन, एंटरप्राइज फोरकास्टिंग आणि जनरेटिव्ह ए आय संचलित बिजनेस प्रोसेस को-पायलट्स यां सारखी प्रमुख उत्पादने विकसित व वितरित केली जातील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विस्तार करण्याचा फाइंडॅबिलिटी सायन्सेसचा निर्णय स्थानिक प्रतिभेचे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक एआय तंत्रज्ञांमध्ये रूपांतर करण्याच्या त्यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांचाच भाग आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीने स्थानिक शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करत कमी उत्पन्न गटाच्या कुटुंबातील युवकांसाठी सुसंगठित प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. यामुळे १०० हून अधिक युवक आज जागतिक स्तरावरील एआय प्रकल्पांवर, अमेरिकेत, जपानमध्ये आणि भारतात, यशस्वीपणे काम करत आहेत.
फाइंडॅबिलिटीसायन्सेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महुरकर यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या विस्ताराचा निर्णय म्हणजे जागतिक नवप्रवर्तन कोणत्याही भागातून शक्य आहे, या आमच्या विश्वासाचे प्रतिक आहे. या भागात गुंतवणूक करून आम्ही केवळ आमचा व्यवसाय वाढवत नाही, तर स्थानिक तरुणाईला जागतिक एआय आव्हानांना समर्थपणे पेलण्या साठी सक्षमही करत आहोत.”
विस्तारित सुविधा ५० हून अधिक तंत्रज्ञांना सामावून घेण्यासाठी बनवली आहे, ज्यामुळे एआय नवप्रवर्तनाचे उगवते केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगरची प्रतिष्ठा वाढेल. हा विकास शहराच्या स्मार्ट इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणून झालेल्या निवडीशी देखील सुसंगत आहे आणि डीप-टेक गुंतवणुकीद्वारे प्रादेशिक आर्थिक प्रगतीत योगदान देण्याच्या फाइंडेबिलिटी सायन्सेसच्या व्यापक ध्येयाला समर्थन देतो.
विस्ताराच्या या नव्या अध्यायाच्या नेतृत्वासाठी काही महत्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मंदार कुलकर्णी, उपाध्यक्ष व सेंटर ऑफ एक्सलन्सचे महाप्रबंधक, हे नवीन कार्यालयाचे संचालन करतील. आदर्श जयसवाल, तांत्रिक संचालक, हे अभियांत्रिकी उत्कृष्टता व प्रकल्प अंमलबजावणीचे नेतृत्व करतील. सागर महुरकर, व्यवसाय संचालक, हे ग्राहक संवाद व सेवा वितरणाची जबाबदारी सांभाळतील.