द बॉडी शॉपची 'मोअर लव्ह फॉर लेस' मोहिम
मुंबई, १४ मे २०२५: ग्राहकांची आवड आणि उपलब्धता लक्षात घेऊन द बॉडी शॉप इंडियाने आपल्या 'मोअर लव्ह फॉर लेस' मोहिमेचे विस्तारीकरण करताना नवीन ब्रँड जाहिराती सादर केल्या आहेत ज्यामधून हृदयस्पर्शी, इन्फ्लूएन्सर-केंद्रित सादरीकरणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक किमतींना सादर करण्यात आले आहे.
द बॉडी शॉप इंडियाने भारतातील त्यांच्या १२ सर्वात लोकप्रिय उत्पादन फॉर्मेट्समध्ये डिसरप्टिव्ह प्राइसिंग धोरणाचा अवलंब केला आहे. नवीन, अधिक लक्षवेधक एण्ट्री पॉइण्ट्सवर सुरू होणाऱ्या किमतींसह हा उपक्रम द बॉडी शॉपच्या विश्वामध्ये अधिकाधिक ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. नवीन धोरणामधून भारतातील ग्राहकांना आनंदित करण्यासोबत त्यांच्या प्राधान्यक्रमांना प्रतिसाद देण्याप्रती आणि ब्युटी क्षेत्रात अग्रस्थानी राहण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.
'मोअर लव्ह फॉर लेस' मोहिम नवीन किमतीसंदर्भात सर्व वयोगटांमधील ग्राहकांचे प्रेम, आनंद आणि उत्साहाला प्रकाशझोतात आणते. डिजिटल फर्स्ट दृष्टिकोनासह मुख्य थीम 'मोअर लव्ह फॉर लेस'चे सर्जनशील दिग्दर्शनासह शूटिंग करण्यात आले आहे, ज्यामधून भारतातील ग्राहकांची विविधता दिसून येते. ही मोहिम ग्राहकांच्या अविरत आनंदाला साजरे करते. या मोहिमेमधून ग्राहकांच्या परिवर्तनाचा अवलंब करण्याच्या, ट्रेण्ड्सचे अनुकरण करण्याच्या, साठा करण्याच्या, मोठ्या प्रमाणात गिफ्ट करण्याच्या आणि त्यांना आवडणाऱ्या प्रथांचा पुन्हा शोध घेण्याच्या पद्धतींना निदर्शनास आणते. कथानक भावनिकदृष्ट्या संलग्न आहे, जेथे सर्व वयोगटांमधील नायक कथानकामध्ये सामील होतात.
दक्षिण आशियामधील द बॉडी शॉपच्या चीफ ब्रँड ऑफिसर हरमीत सिंग म्हणाल्या, ''हे दीर्घकाळापासून दृष्टिकोनात असलेले धोरण आहे, जे आमच्या मूल्यांमध्ये खोलवर रूजलेले आहे आणि ग्राहकांच्या वास्तविक अभिप्रायांचा पाठिंबा आहे. दोन दशकांपासून भारतातील ग्राहकांनी आमच्या प्रतिष्ठेवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. सर्वसमावशेक राहण्यासाठी आम्ही अधिक अर्थपूर्ण व शाश्वत पद्धतीने उपलब्धतेचे निराकरण केले पाहिजे. आमची भावी पिढीसाठी नैतिक ब्युटीचे लोकशाहीकरण करण्याची महत्त्वाकांक्षा आहे, जेथे आम्ही त्यांच्या चॅनेल-केंद्रित, लिंग-केंद्रित, मूल्य-संचालित गरजांची पूर्तता करण्यासह त्यांच्या वापराच्या पद्धतीबाबत जाणून घेतो.''
त्या पुढे म्हणाल्या, ''या डिजिटल जाहिराती अस्सल ग्राहक उत्साहाच्या साजरीकरण आहेत. या जाहिराती आमचा ईपीपी उपक्रम देत असलेल्या आनंदाचा सर्वोत्तम अनुभव देतात. व्यक्तींना त्यांच्या आवडत्या उत्पादनांच्या माध्यमातून खराखुरा आनंद घेताना आणि 'मोअर लव्ह फोर लेस'च्या संकल्पनेचा अवलंब करताना पाहण्याचा आनंद होत आहे. यामधून आमचा विश्वास दिसून येतो की, नैतिक सौंदर्य प्रत्येकाला मिळाले पाहिजे आणि या जाहिरातींमधून ती कटिबद्धता प्रबळपणे दिसून येते.''
'मोअर लव्ह फॉर लेस' मोहिम आणि संलग्न डिजिटल जाहिराती द बॉडी शॉप इंडियाच्या आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि भारतातील ब्युटी बाजारपेठेतील आपले स्थान अधिक दृढ करण्यासाठी व्यापक धोरणाचा प्रमुख भाग आहेत. या धोरणात्मक परिवर्तनासह द बॉडी शॉप उत्पादनांना अर्थपूर्णपणे उपलब्ध करून देत आहेत, ज्यावर ग्राहकांचा प्रेम व विश्वास आहे. हे हंगामी किंवा प्रतिक्रियात्मक परिवर्तन नाही, तर त्यामधून ओम्नी-चॅनेल स्तरावर द बॉडी शॉपचा दीर्घकालीन दृष्टिकोन दिसून येतो. उपलब्धता आणि ग्राहक आनंदावर लक्ष केंद्रित करत ब्रँड विद्यमान ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करत आहे आणि नवीन पिढीचे लक्ष वेधून घेत आहे, जे नैतिक सौंदर्य आणि किफायतशीरपणाला महत्त्व देतात.