किया इंडियाकडून कॅरेन्स क्लॅव्हिस लाँच
~ सर्वोत्तम वैशिष्ट्ये, आकर्षक डिझाइन आणि अद्वितीय आरामदायीपणा ~
मुंबई, ८ मे २०२५: किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम कारमेकरने कॅरेन्स पोर्टफोलिओमधील नवीन कार 'कॅरेन्स क्लॅव्हिस'च्या लाँचची घोषणा केली आहे. ही बिग, बोल्ड आणि स्पेसिअस ३-रो (तिसऱ्या रांगेतील सीटमध्ये एैसपैस जागा) वेईकल आहे. कॅरेन्स क्लॅव्हिस आजच्या मोठ्या, आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी एमपीव्ही आणि एसयूव्हींमधील तफावत दूर करते. या वेईकलमध्ये आरामदायीपणा, एैसपैस जागा व आकर्षक डिझाइनसह प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि भविष्यवादी आकर्षकता आहे.
किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. ग्वांग्गू ली म्हणाले, ''आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यतेला प्राधान्य देतो, ज्याला प्रगत तंत्रज्ञान आणि विशिष्ट डिझाइनचे पाठबळ आहे. लाँच करण्यात आलेली कॅरेन्स क्लॅव्हिस आमच्या प्रवासामधील प्रमुख टप्पा आहे, ज्यामधून गतीशील, प्रीमियम व उद्देश-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्हाला ग्राहकांच्या बदलत्या गरजांबाबत माहित आहे आणि कॅरेन्स क्लॅव्हिससह आम्ही वेईकलपेक्षा अधिक ऑफर करत आहोत. ही वेईकल विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेली असून एक खास अनुभव आहे, जी दैनंदिन गतीशीलता सुधारते. आम्ही मर्यादांना दूर करत असताना स्मार्ट, डिझाइन-केंद्रित सोल्यूशन्स वितरित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जे कुटुंबांना सक्षम करतात आणि प्रत्येक ड्राइव्हमध्ये आत्मविश्वास देतात.''
'क्लॅव्हिस' नाव लॅटिन वाक्य क्लॅव्हिस ऑरियामधून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ 'गोल्डन की' असा होतो. ही वेईकल संस्मरणीय कौटुंबिक साहसी ड्रायव्हिंगचा आनंद देते, तसेच उत्साहपूर्ण आठवणींसाठी गेटवे आहे. कॅरेन्स क्लॅव्हिस ऑफर करत असलेल्या या वेईकलमधून आधुनिक काळातील कुटुंबांच्या महत्त्वाकांक्षा दिसून येतात. या वेईकलमध्ये माहितीपूर्ण वैशिष्ट्ये, आकर्षक डिझाइन आणि सर्वोत्तम जागतिक तंत्रज्ञान आहे.
लाँच झाल्यापासून किया कॅरेन्सने भारतातील फॅमिली कार सेगमेंटला नव्या उंचीवर नेले आहे, तसेच फक्त तीन वर्षांमध्ये २ लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास मिळवला आहे. कियाला भारतातील कुटुंबांच्या गरजांबाबत सखोल माहिती आहे, जेथे पिढ्यानपिढ्या गतीशीलतेचा आनंद घेण्यासोबत आठवणींचा संग्रह केला जात आहे. कॅरेन्सने एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि लक्षवेधक अपीलसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कॅरेन्स क्लॅव्हिस विकसित होत असलेल्या जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षांना अनुसरून डिझाइन करण्यात आलेल्या कियाच्या फॅमिली-फर्स्ट गाथेमधील पुढील नैसर्गिक अध्याय आहे. कॅरेन्स क्लॅव्हिस अपवादात्मक ६-आसनी व ७-आसनी आरामदायीपणा, आकर्षक डिझाइन, प्रीमियम स्पेस आणि प्रगत तंत्रज्ञान देते, ज्यामधून आजच्या डायनॅमिक कुटुंबांना सुधारित, उद्देश-केंद्रित अनुभव मिळतो.
डिझाइन: बिग बोल्ड स्मार्ट फॅमिली कार
कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये आकर्षक डिझाइन तत्त्व सामावलेले असून अपराइड एसयूव्ही-सारख्या स्टान्समध्ये आकर्षकता आणि स्पोर्टीनेसचे संयोजन आहे. या वेईकलची हाय-टेक वैशिष्ट्ये आणि प्रगत रचना आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगसाठी प्रेरित करतात, ज्यामुळे आकर्षकता व कार्यक्षमतेचा शोध घेत असलेल्या कुटुंबांसाठी ही वेईकल योग्य निवड आहे. प्रत्येक लाइन व पृष्ठभाग आकर्षक, स्टायलिश, प्रबळ व अद्वितीय आधुनिक दिसण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामधून साहसी, पण सुरक्षित उत्साह दिसून येतो. ही वेईकल कुठेही साहसी व आनंदमय ड्रायव्हिंगचा आनंद घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या वेईकलमध्ये वैविध्यता आणि स्मार्ट इनोव्हेशन आहे, जे बिग, बोल्ड व प्रेरणादायी फॅमिली कारला नव्या उंचीवर घेऊन जातात.