Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या नेतृत्वात स्थानिक प्रतिभेला संधी

 स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या नेतृत्वात स्थानिक प्रतिभेला संधी


~ जागतिक ब्रॅंड्सचे नेतृत्व करण्यासाठी देशातील प्रतिभेवर भर ~


मुंबई, ९ मे २०२५: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने देशातील उच्च व्यवस्थापनात बदल करताना स्थानिक प्रतिभेवर भर देत श्री. आशीष गुप्ता यांची स्कोडा इंडियाचे ब्रॅंड डायरेक्टर म्हणून नेमणूक केली आहे. श्री. आशीष गुप्ता यापूर्वी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्सचे ब्रॅंड डायरेक्टर होते. त्यांनी श्री. पेट्र जनेबा यांच्याकडून कार्यभार स्वीकारला आहे. तर श्री. नितीन कोहली यांची फोक्सवॅगन पॅसेंजर कार्सचे ब्रॅंड डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी ऑडी इंडियाच्या सेल्स आणि ऑपरेशन विभागात कार्यरत होते. हे नेतृत्व बदल देशातील प्रतिभा पारखून ती जोपासण्याबाबतची तसेच भारतीय बाजारातील बदल अचूक ओळखणाऱ्या नेत्यांना सक्षम बनवण्याची कंपनीची वचनबद्धता स्पष्ट करतात. 





श्री. आशीष गुप्ता यांच्या पाठीशी दोन पेक्षा जास्त दशकांचा ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अनुभव आहे. त्यापैकी १२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी फोक्सवॅगनमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ५ वर्षे भारतातील फोक्सवॅगन ब्रॅंडच्या प्रमुख पदी देखील काम केले आहे. आपल्या या नवीन भूमिकेत श्री. आशीष स्कोडाच्या विकास धोरणाला चालना देण्यावर, ग्राहकांचा विश्वास वाढवण्यावर, नेटवर्कची ताकद विस्तारित करण्यावर आणि भारतातील या ब्रॅंडची उपस्थिती अधिक प्रखर आणि प्रभावी करण्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतील.


श्री. नितीन कोहली यांना ऑटोमोटिव्ह सेल्समध्ये २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यापैकी १२ पेक्षा जास्त वर्षे त्यांनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया सोबत काम केले आहे. व्यवसाय विकास, धोरणात्मक आखणी आणि क्रॉस फंक्शनल कोलॅबरेशन्समध्ये विशेष नैपुण्यासह, नितीन कोहली फोक्सवॅगन ब्रॅंडला भारतात नवीन उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे.




एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे सीईओ आणि मॅनिजिंग डायरेक्टर श्री. पियुष अरोरा म्हणाले, “नेतृत्वातील हे परिवर्तन आमच्या भारतीय संघटनेच्या अंतर्गत लोकलाईझेशन आणि क्षमतांच्या विकासाच्या बाबतीत आमची निरंतर वचनबद्धता दर्शविते. समर्थ भारतीय नेत्यांना सक्षम करणे हे आमच्या विकास धोरणातील एक मूलभूत तत्व आहे. तसे करताना आम्ही चपळ, सुसंबद्ध आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी आणि व्यवसाय वातावरणाशी जास्तत जास्त सुसंगत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपली सखोल बाजार अंतर्दृष्टि आणि धोरणात्मक कौशल्यासह आशीष आणि नितीन स्कोडा आणि फोक्सवॅगन ब्रॅंडचे भारतातील विकासाच्या पुढील टप्प्यात नेतृत्व करण्यासाठी आदर्श स्थितीत आहेत. त्याच वेळी, एसएव्हीडब्ल्यूआयपीएलमधील आपल्या कार्यकाळात दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल मी श्री. पेट्र जनेबा यांचे देखील आभार मानतो आणि त्यांच्या भावी भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा देतो.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.