Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झुपी लुडोने श्रेणीतील आघाडीचे स्थान अधिक मजबूत केले

 झुपी लुडोने श्रेणीतील आघाडीचे स्थान अधिक मजबूत केले


~ १५० दशलक्ष वापरकर्त्यांचा आणि १२.५ अब्ज एवढ्या प्रचंड गेमप्लेजचा महत्त्वाचा टप्पा पार केला. ~


मुंबई, १ जुलै २०२५: भारतातील ऑनलाइन गेमिंगच्या क्षेत्रातील स्थित्यंतराचा लक्षणीय प्रत्यय देत झुपी (Zupee) या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन कौशल्याधारित गेमिंग प्लॅटफॉर्मने आज १५० दशलक्ष वापरकर्त्यांचा आणि १२.५ अब्ज एवढ्या प्रचंड गेमप्लेजचा महत्त्वाचा टप्पा पार केला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १०० दशलक्ष वापरकर्ते आणि ६.६ अब्ज गेमप्लेजचा टप्पा गाठल्यानंतर झुपी लुडोच्या गेमप्लेमध्ये ८ महिन्यांत सुमारे २ पटींनी वाढ झाली आहे. कोट्यवधी लोक केवळ झुपी लुडो डाउनलोड करत नाही आहेत, तर तो पुन्हा-पुन्हा खेळण्यासाठी परत येत आहेत, हे यावरून सिद्ध होते.

या शाश्वत, निश्चित दिशेने झालेल्या वाढीच्या जोरावर झुपीने भारतातील ऑनलाइन गेमिंग परिसंस्थेत अग्रस्थानी राहून प्रवर्गातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. लुडोसारख्या लोकप्रिय बोर्ड गेमला कौशल्याधारित दृष्टीने नवीन स्वरूप देऊन न्याय्य खेळ व पारदर्शकता यांची खातरजमा करणाऱ्या नवोन्मेष्कारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो सर्वांपुढे आणल्यामुळे झुपी लुडो हा भारतातील लोकप्रिय कौशल्याधारित गेम झाला आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा, तरीही आजच्या डिजिटल पिढ्यांना आपला वाटणारा एक मनोरंजन अनुभव यातून निर्माण होत आहे.




झुपीचे प्रमुख प्रवक्ते गोविंद मित्तल म्हणाले, “हा महत्वाचा टप्पा म्हणजे आम्हाला देशभरातील वापरकर्त्यांकडून मिळत असलेले प्रेम आणि त्यांचा आमच्यावरील विश्वास यांचा प्रतिध्वनी होय. आम्ही केवळ विस्तार करत नाही आहोत; तर कालातीत भारतीय खेळ डिजिटल युगात कसे खेळले जातील, कसे जतन केले जातील आणि साजरे केले जातील याची नवीन पद्धत प्रचलित करत आहोत. आम्ही झुपीवर केवळ लुडोचे एकाहून अधिक आकृतीबंध विकसित करत नाही आहोत; तर न्याय्य पद्धती व नवोन्मेष यांतून मनोरंजन करणारी एक पारदर्शक, कौशल्याधारित खेळसंस्कृती उभी करत आहोत. विस्तार करताना, आमच्या वापरकर्त्यांना अखंडित गेमिंग अनुभव देत राहण्याप्रती आम्ही बांधील आहोत. यामध्ये तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष व जबाबदारीने गेम खेळणे यांवर आम्ही भर देत आहोत.”

झुपीने केवळ कौशल्याधारित गेमिंग प्रवर्गात प्रवेश केला नाही, तर त्या प्रवर्गाची बांधणी केली, विस्तार केला आणि आता प्लॅटफॉर्म या प्रवर्गाचे नेतृत्व करत आहे.कौशल्याधारित ल्युडोचे फॉरमॅट्स  भारतात याच ब्रॅण्डने सर्वप्रथम आणले. यांमध्ये लुडो सुप्रीम, लुडो टर्बो आणि लुडो सुप्रीम लीग यांचा समावेश होतो. यामुळे व्यापकता व वैशिष्ट्यपूर्णता दोहोंना चालना मिळते. हे फॉरमॅट्स लघुकालीन, वेगवान गेमप्ले (१० मिनिटांहून कमी काळाचे) गेमप्ले देऊ करतात, मोबाइलला प्रथम प्राधान्य देणाऱ्या भारतीय गेमर्ससाठी ते अनुकूल ठरतात. ल्युडोचे पारंपरिक स्वरूप नशिबावर अवलंबून होते, ते बदलून कौशल्य या घटकावर अधिक भर दिला गेला, यासाठी झुपीने डाइस (फासा) विरहित पद्धत व चालींवर आधारित गुणांकन या पद्धती आणल्या.

अर्थपूर्ण मनोरंजन हा झुपी लुडोच्या डिझाइन तत्त्वाचा गाभा आहे; हा गेम मनोरंजन करतो, गुंतवून ठेवतो आणि खेळाचे व्यूहरचनात्मक नियंत्रण हाती घेण्यासाठी वापरकर्त्यांना सक्षम करतो. लुडोकडे बघण्याच्या मल्टि-फॉरमॅट दृष्टिकोनामुळे उत्पादन नवोन्मेषाचा मेळ गेमप्लेशी घातला जातो, त्यामुळे तो खेळण्यास सुलभ होतो, तरीही व्यूहरचनात्मक विचार यात आवश्यक ठरतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.