Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारताच्या डिजिटल आणि लॉजिस्टिक्स वृद्धीकरिता फेडएक्सचा उपक्रम

 भारताच्या डिजिटल आणि लॉजिस्टिक्स वृद्धीकरिता फेडएक्सचा उपक्रम


~ नोकरीसाठी सज्ज प्रतिभा घडविण्यावर फेडएक्सचा भर ~

मुंबई, १८ जुलै २०२५: फेडएक्स एक्सप्रेस ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी जागतिक युवा कौशल्य दिन २०२५ साजरा करताना, भारताच्या संरचित कौशल्य विकासाच्या उपक्रमाला बळकटी देत आहे. 'एआय आणि डिजिटल कौशल्यांद्वारे तरुणांचे सक्षमीकरण' या जागतिक संकल्पनेनुसार, झपाट्याने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजांसाठी सुसज्ज वर्कफोर्स तयार करण्यासाठी फेडएक्स मदत करत आहे.


नॉन प्रॉफिट संस्थांच्या मदतीने फेडएक्सने क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि वेअरहाऊस ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रांमध्ये १५०० पेक्षा जास्त अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यास मदत केली आहे. अभ्यासक्रमात तांत्रिक शिक्षणासोबतच नोकरीसाठी तयारी, संवाद आणि कामाच्या ठिकाणाची कौशल्ये यांचा समावेश आहे. यामुळे शिकण्यातून कमाईकडे असे संक्रमण सुलभ होते.


फेडएक्सचे मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि अफ्रिका येथील मार्केटिंग, ग्राहक अनुभव आणि हवाई नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत तातिवाला म्हणाले, "भारताची युवाशक्ती एका महत्त्वाच्या धोरणात्मक लाभाचे प्रतिनिधित्व करते.  या तरुणांना उद्योगपूरक कौशल्यांनी सक्षम करणे हे देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी आवश्यक आहे. फेडएक्समध्ये आम्ही तरुणांना व्यावहारीक, वास्तविक जगाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. याद्वारे संधीचा लाभ घेण्यासाठी आणि भविष्यासाठी ही तरुणाई सज्ज होते.'




अशा उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९३०0 तरुणांना रोजगार मिळाला आहे. यात तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स, रिटेल आणि ई कॉमर्समधील कौशल्यांचा समावेश आहे. सुरुवातीचे मासिक वेतन १३,००० ते १८,००० रुपये या दरम्यान आहे. तर काही जणांना ३०,००० रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळत आहे. 

राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क अंतर्गत वितरीत करण्यात आलेले हे उपक्रम, क्लासरुममधील मार्गदर्शन, प्रॅक्टिकल अनुभव, जीवन कौशल्ये आणि मार्गदर्शन यांचे उत्तम मिश्रण आहे. यात ६०% टक्क्यांपेक्षा जास्त महिला सहभागी आहेत. ज्यापैकी अनेक प्रथमच औपचारिक वर्कफोर्समध्ये प्रवेश करत आहेत. हा उपक्रम रोजगार क्षमता, डिजिटल कौशल्य आणि सर्वसमावेशक आर्थिक वृद्धीशी संबंधित राष्ट्रीय महत्त्वाकांशी सुसंगत आहे.


उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण, संमिश्र शिक्षणाचे मॉडेल आणि मार्गदर्शन यासाठीचे प्रवेश वाढवून दीर्घकालीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फेडएक्स कटिबद्ध आहे. डिजिटल सुसज्जता आणि धोरणात्मक सहकार्य यावर भर असल्याने फेडएक्स हे भारताच्या व्यापक वर्कफोर्स परिवर्तनाला आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला समर्थन देते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.