टाटा पंचने केवळ ४ वर्षांत ६ लाख युनिट्स उत्पादनाच्या टप्पा पार केला
~ महाराष्ट्राचे एकूण उत्पादनामध्ये १२ टक्क्यांचे योगदान ~
मुंबई, १७ जुलै २०२५: टाटा पंचने चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत ६ लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार करत भारतातील लोकप्रिय एसयूव्ही म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. या यशामधून देशभरातील ग्राहकांमध्ये या कारची लोकप्रियता दिसून येते. टाटा पंचच्या एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राने १२ टक्क्यांचे योगदान दिले आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रत्येक भारतीयासाठी एसयूव्ही अनुभव सहजसाध्य करण्याच्या दृष्टिकोनासह लाँच करण्यात आलेली टाटा पंच पूर्णत: नवीन विभाग ‘सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही'मध्ये आघाडीवर आहे. तेव्हापासून या कारने देशभरातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गजबजलेल्या महानगरांपासून महत्त्वाकांक्षी दुर्गम भागांपर्यंत पंच निवड, विश्वसनीयता आणि स्टाइलची प्रतीक ठरली आहे, तसेच भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राची रूपरेषा बदलली आहे. या कारने कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनत इतिहास रचला. शहरातील किंवा ग्रामीण भागातील रस्त्यांवरून प्रवास करायचा असो, पहिल्यांदाच कार खरेदी करणारे ग्राहक, तरूण व्यावसायिक किंवा कुटुंबांचे लक्ष वेधून घ्यायचे असो पंच कारपेक्षाही जास्त विकसित झाली आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “पंचमधून आधुनिक भारतीयांचा उत्साह, तसेच साहसीपणा, स्वावलंबीपणा आणि कोणत्याही मार्गाकडे वाटचाल करण्याची सुसज्जता दिसून येते. ६ लाख युनिट्सचा टप्पा पार करणे उत्पादन यशापेक्षा अधिक आहे, यामधून ६ लाखांहून अधिक भारतीयांनी या कारवर दाखवलेला दृढ विश्वास दिसून येतो. ही कार आत्मविश्वास, उपस्थिती आणि त्यांच्या प्रवासाच्या नवीन शुभारंभाचे प्रतीक आहे. अनेक पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी पंच पहिली निवड बनली असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. पंच फक्त कार नाही तर उल्लेखनीय ब्रँड आहे, ज्याने सांस्कृतिक परिवर्तनाला चालना दिली आहे आणि भारतीयांना त्यांच्या कुटुंबामधील पहिल्या कारकडून अपेक्षित सुविधेला नव्या उंचीवर नेले आहे. ‘इंडिया की एसयूव्ही' मोहिमेला सुरूवात करत आम्ही असाधारण प्रवासाला साजरे करत आहोत, तसेच ग्राहकांना प्रशंसित करत आहोत, ज्यांच्यामुळे हे यश शक्य झाले. हे आकडेवारीच्या साजरीकरणापेक्षा अधिक उत्पादनाला मानवंदना आहे, जेथे या कारने मुलभूत बाबींबाबत तडजोड न करता सर्वांना एसयूव्हीचा अनुभव दिला आहे.''
व्यापक आकर्षकतेमुळे पंचला मोठे यश मिळाले आहे:
· लोकांच्या पसंतीची कार
· पंच पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अव्वल निवड आहे. या कारमध्ये सोयीसुविधा, सुरक्षितता आणि एसयूव्ही दर्जाचे परिपूर्ण संयोजन आहे. जवळपास ७० टक्के पंच आयसीई मालक पहिल्यांदाच कार खरेदी करणारे ग्राहक आहेत.
· पंच महिला ड्रायव्हर्समध्ये अधिक लोकप्रिय ठरली आहे, ज्या कारच्या स्मार्ट डिझाइनचे कौतुक करते, या डिझाइनमध्ये उच्च ग्राऊंड क्लीअरन्स आणि रस्त्यावर लक्षवेधक उपस्थितीचे संयोजन आहे. यामुळे ही कार व्यावहारिक व सक्षम आहे. या ट्रेण्डमधून तथ्य दिसून येते की, २५ टक्के Punch.ev मालक महिला आहेत, जेथे वैयक्तिक गतीशीलता क्षेत्रामध्ये या कारचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
· भारतातील शहरी व ग्रामीण क्षेत्रांमध्ये पंच अत्यंत लोकप्रिय आहे, ज्यामधून विविध प्रदेश व जीवनशैलींमधील कारची वैविध्यता दिसून येते. प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये २४ टक्के, द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये ४२ टक्के आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये ३४ टक्के यासह या कारचे मालकीहक्क असण्याचे प्रमाण संतुलित आहे. यामधून देशभरातील ग्राहकांचे या कारशी असलेले दृढ नाते दिसून येते.
· विभागाला नव्या उंचीवर घेऊन जाणारी आयकॉन
ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच झाल्यापासून पंचने आपली विशिष्ट डिझाइन, प्रबळ कार्यक्षमता आणि ५-स्टार सुरक्षितता रेटिंगसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागाला नव्या उंचीवर नेले आहे. ही कार सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये अग्रणी ठरली आहे, तसेच अधिकाधिक ग्राहकांना एसयूव्ही मालकीहक्काचा अनुभव देत आहे आणि भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राला नवीन आकार देत आहे. २०२४ मध्ये पंचने भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनत इतिहास रचला, ज्यामधून शहरातील रस्त्यांपासून ग्रामीण भागांपर्यंत, पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांपासून तरूण व्यावसायिक व कुटुंबांपर्यंत या कारची वैश्विक अपील दिसून येते. या कारने पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रथम निवड म्हणून स्वत:चे स्थान स्थापित केले आहे. ही कार ग्राहकांना आत्मविश्वासपूर्ण, वैशिष्ट्य-संपन्न एसयूव्ही अनुभव देते.
अद्वितीय लीडर
· आयसीई व ईव्ही व्हेरिएण्ट्समध्ये ५-स्टार सुरक्षितता रेटिंग (अनुक्रमे ग्लोबल एनसीएपी व भारत एनसीएपी).
· पेट्रोल, सीएनजी आणि ईव्ही पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध.
· टाटा मोटर्सच्या एकूण पॅसेंजर वेईकल विक्रीमध्ये ३६ टक्क्यांचे योगदान.
· सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागामध्ये ३८ टक्के मार्केट शेअर (आर्थिक वर्ष २५).
· वार्षिक १५ टक्के प्रबळ वाढीची नोंद.
· २० हून अधिक प्रतिष्ठित ऑटोमोटिव्ह पुरस्कारांसह सन्मान करण्यात आला आहे.
इंडिया की एसयूव्ही' मोहिमेसह साजरीकरण:
या असाधारण प्रवासाला साजरे करण्यासाठी टाटा मोटर्सने देशभरात नवीन मोहिम ‘इंडिया की एसयूव्ही' सुरू केली आहे. ही मोहिम लाखो भारतीयांना प्रशंसित करते, ज्यांनी टाटा पंचला त्यांच्या जीवनाचा भाग बनवले आहे आणि सक्षमीकरण, शोध व दैनंदिन साहसाच्या गाथा दाखवल्या आहेत. यामधून निदर्शनास येते की, टाटा पंच कारपेक्षा अधिक विकसित झाली आहे. ही कार आधुनिक भारतासाठी महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वासाची प्रतीक बनली आहे. सुरक्षिततेबाबत काळजी करणारे कुटुंबं असो किंवा शहरामध्ये साहसी ड्राइव्हचा आनंद घेणारे असो, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील उत्साहित तरूण असो किंवा नवीन साहसी ड्राइव्हचा आनंद घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेले पहिल्यांदा कार खरेदी करणारे ग्राहक असो पंच प्रांतांमध्ये आणि पिढ्यांमध्ये संलग्न झाली आहे. रस्त्यावर ६ लाखांहून अधिक टाटा पंच धावण्यासह ही मोहिम या टप्प्यासोबत वैविध्यपूर्ण प्रवासाला देखील प्रशंसित करते, ज्यामध्ये उद्देश, अभिमान व संभाव्यता सामावलेली आहे. ‘इंडिया की एसयूव्ही' मोहिम देशाच्या उत्साहाला मानवंदना आहे, जी साहसीपणे व एकत्रित पुढे जात आहे.
