राडो साजरी करत आहे कालातीत भेटवस्तू देण्याची कला
मुंबई, २५ ऑगस्ट २०२५: या सणासुदीच्या मोसमात स्वित्झर्लंडमधील मटिरियल इनोव्हेशन आणि कालातीत सुसंस्कृततेचे अग्रणी राडो यांनी ‘द टाइम इज नाऊ’ (आता वेळ आली आहे) या आपल्या नवीन अभियानाच्या माध्यमातून अस्तित्व, भावना आणि शाश्वत डिझाईन यांचा एक दैदीप्यमान सोहळा आरंभला आहे. हे अभियान आपल्याला स्मरण देते की, आपली कृतज्ञता, कौतुक आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीचा सगळ्यात अनुरूप समय हाच आहे.
राडोचे ब्रॅंड अम्बॅसडर आणि जगप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आकर्षक अभियानात वर्तमान क्षणाच्या मौन ओजस्वितेचा सन्मान केला आहे- ही संधी आहे जरा विश्रांती घेण्याची, विचार करण्याची आणि हेतुपूर्वक काहीतरी देण्याची! आजच्या वेगवान जगात, राडो घड्याळे एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट सादर करतात: चिरस्थायित्व. केवळ परिधान करण्यात नाही, तर स्मरण करण्यात देखील.
राडोचा टाइमपीस हा केवळ एक उपहार नाही. त्यातून एक वारसा घडवला जात आहे, जो एका खास हाय-टेक सिरॅमिकमध्ये आणि नेहमी काळाच्या पुढे असलेल्या डिझाईनच्या परंपरेतून घडवला जातो. या घड्याळांनी लक्झरीची नवी व्याख्या दिली आहे: सौम्य, अर्थपूर्ण आणि शाश्वत.
स्पोर्टी तरीही सुसंस्कृत, बोल्ड तरीही सहज – राडो कॅप्टन कुक हाय-टेक सिरॅमिक क्रोनोग्राफ म्हणजे दि्वत्वाचे विधान आहे. हृतिक रोशन ते सहजतेने परिधान करतो आणि नेमकी कामगिरी आणि अत्याधुनिक रचना यांचे फ्यूजन दर्शविणारे उदाहरण सादर करतो. यात मॅट ब्लॅक ४३ मिमी मोनोब्लॉक हाय-टेक सिरॅमिक केसच्या जोडीला पॉलिश केलेल्या रोझ-गोल्ड रंगाची छटा आहे, ज्यातून एक ठळक भेद उठून येतो जो समकालीन आहे, तसाच शाश्वत देखील आहे. हे वजनात अत्यंत हलके आणि आश्चर्यकारकरित्या ओरखड्यांचा प्रतिरोध करणारे घडयाळ एका मॅट आणि पॉलिश केलेल्या काळ्या रंगाच्या हाय-टेक सिरॅमिक ब्रेसलेटवर प्रस्तुत करण्यात आले आहे. सहज फिटिंगसाठी आणि सुरक्षेसाठी त्याला टायटेनियम 3-फोल्ड फाशाची सोय आहे, जे ते घड्याळ परिधान करणाऱ्याला अद्भुत कम्फर्ट देते. ऑटोमॅटिक कॅलिबर R801 द्वारा संचालित आणि अधिक अचूकतेसाठी पाच स्थितींमध्ये रेग्युलेट करण्यात येणारे हे नेमकी कालगणना करणारे घड्याळ तंतोतंत अचूकतेसाठी बनवण्यात आले आहे. कोणताही खडकाळ भूभाग असो किंवा एखाद्या सुनियोजित रजनीसाठी निवडलेली शांत शालीन जागा असो, हे घड्याळ अचूक काम करते.
हृतिक म्हणतो, “कॅप्टन कुक हे फक्त एक घड्याळ नाही; तो एक सोबती आहे. मजबूत, अष्टपैलू आणि नेहमी स्थिरचित्त राहणारा!”
डौल आणि लालित्याच्या भोक्त्यांसाठी बनवलेले राडो सेंट्रिक्स डायमंड्स म्हणजे चमक आणि अभिजाततेचा एक काव्यात्मक अभ्यास आहे. बेझलभोवती 60 पूर्ण कट केलेल्या टॉप वेसल्टन हिऱ्यांनी सजवलेला आणि चमकदार ब्राऊन मदर-ऑफ-पर्ल डायलमध्ये आणखी ११ हिरे असलेला हा टाइमपीस प्रत्येक दृष्टिक्षेपात मनाला आल्हाद देतो. पॉलिश केलेल्या रोझ-गोल्ड पीव्हीडी-कोटेड स्टेनलेस स्टील आणि हाय-टेक सिरॅमिक साखळ्यांनी बनवलेले सेंट्रिक्स डायमंड्स टिकाऊ आहे, तितकेच अलौकिकही आहे. त्यात कॅलिबर आर७६३ ऑटोमॅटिक मूव्हमेंट असून अचूकतेसाठी अॅंटी-मॅग्नेटिक निव्हाक्रोन™ हेअरस्प्रिंग आहे. ही अचूकता पिढ्यान पिढ्या टिकणारी आहे.
कतरिना म्हणते, “सेंट्रिक्स डायमंड्स फक्त सुंदर नाही – त्यामध्ये एक मौन ताकद आहे. ते सुसंस्कृत आणि सुंदर आहे. हे घड्याळ म्हणजे एक आलीशान कारागिरी आहे.”
राडोचे सीईओ अॅड्रीयन बॉसहार्ड म्हणतात, “राडो मध्ये आम्ही असे टाइमपीस बनवतो जे तुमच्या कहाणीचा अविभाज्य भाग बनतात. हे अभियान म्हणजे एक आमंत्रण आहे- जीवनातील महत्त्वाचे क्षण त्या क्षणांइतक्याच शाश्वत टाइमपीस सह साजरे करण्याचे!”
