Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झेलिओ ई मोबिलिटीने नेक्स्ट-जेन ग्रेसी ३ प्रकारांमध्ये लाँच केली

 झेलिओ ई मोबिलिटीने नेक्स्ट-जेन ग्रेसी ३ प्रकारांमध्ये लाँच केली


मुंबई, ११ सप्टेंबर २०२५: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक असलेल्या, झेलिओ ई मोबिलिटीने, त्यांची बहुचर्चित कमी-वेगाची इलेक्ट्रिक स्कूटर, ग्रेसीची बाह्य रुपात बदल करून आवृत्ती लाँच केली आहे. आजच्या गतिमान शहरी प्रवाशांसाठी डिझाइन आणि अपग्रेड करण्यात आलेली ग्रेसी ही, सुधारित कामगिरी, श्रेष्ठ प्रकारचा आरामदायीपणा आणि विद्यार्थी, व्यावसायिक आणि तात्पुरत्या कामगारांसाठी तयार केलेल्या दैनंदिन वैशिष्ट्यांचा एक संच सादर करते. या ताज्या वैशिष्ट्यांमुळे, झेलिओ हे, अद्ययावत, टिकाऊ आणि सहज असे गतिशीलता उपाय प्रदान करण्याची आपली वचनबद्धता दृढ करतात.


ही नवीन बाह्यरुपात बदल केलेली ग्रेसी, प्रवासाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी बॅटरीच्या तीन वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केली जात आहे. यात लिथियम-आयन बॅटरी प्रकारामध्ये ६०व्ही/३०एएच; किंमत ६६,०००/- रुपये एक्स-शोरूम; रेंज: ९०~१०० किमी, जेल बॅटरी प्रकारात ६०व्ही/३२एएच; किंमत ५४,०००/- रुपये एक्स-शोरूम; रेंज: ८०~९० किमी आणि ७२व्ही/४२एएच; किंमत ५८,५००/- रुपये एक्स-शोरूम; रेंज: १३०~१४० किमी या ३ प्रकारांत उपलब्ध असेल.




किफायतशीर आणि भरवशाच्या शहरी राइडसाठी बनवलेली, नवीन ग्रेसी, २५ किमी/ताशी कमाल वेग आणि प्रति चार्ज १४० किमी पर्यंतची कमाल राइडिंग रेंज देते. तिच्या मूळ भागात, एक शक्तिशाली ६०/७२व्ही बीएलडीसी मोटर आहे, जी पूर्ण चार्ज झाल्यावर फक्त १.५ युनिट वीजेचा वापर करते. भारतातील शहरी रस्त्यांसाठी तयार करण्यात आलेली ही स्कूटर, १८० मिमीच्या वाढीव ग्राउंड क्लिअरन्ससह, ८५ किग्रॅच्या एकूण वजनासह आणि १५० किग्रॅच्या पेलोड क्षमतेसह उपलब्ध आहे. ही स्कूटर चार्ज करणे सोयीस्कर आहे आणि बॅटरीच्या प्रकारानुसार चार्जिंग बदलते, लिथियम-आयन प्रकारांना चार्ज होण्यासाठी ०४ तास, तर जेल बॅटरी मॉडेल्सना चार्ज होण्यासाठी ०८ तास लागतात.


झेलिओ ई मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. कुणाल आर्य म्हणाले, “बाह्यरुपात बदल केलेल्या ग्रेसीमुळे, आम्ही भारतीय प्रवाशांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन, कार्यक्षमता आणि नावीन्यपूर्णता यांना एकत्र आणत आहोत. आमचे ध्येय हे, नेहमीच इलेक्ट्रिक मोबिलिटीला केवळ आकांक्षापूर्ण बनवणे नसून, व्यावहारिक आणि सहज बनवणे देखील आहे. ही ग्रेसी, सुधारित रेंज, सुधारित ग्राउंड क्लिअरन्स आणि रायडर-फ्रेंडली वैशिष्ट्यांसह, या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे, ज्यामुळे ती, दैनंदिन प्रवासासाठी एक भरवशाची जोडीदार सिद्ध झाली आहे.”


रक्षिततेच्या आणि राईडच्या गुणवत्तेसाठी, ग्रेसीमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर ड्रम ब्रेक आहे, त्यांच्या दोन्ही टोकांना ९०-९०/१२ टायर आहेत आणि त्यांना हायड्रॉलिक शॉक अ‍ॅब्सॉर्बरचा आधार आहे. ही वैशिष्ट्ये, विविध शहरी भूप्रदेशांमध्ये स्थिरता, सुरक्षितता आणि आरामदायीपणा या बाबींची खात्री करतात. तिच्या व्यावहारिकतेत भर घालत असताना, या स्कूटरमध्ये डिजिटल मीटर, एलईडी हेडलॅम्प, कीलेस ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि पॅसेंजर फूटरेस्ट या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. रंगांच्या पाच आकर्षक संयोजनांमध्ये — पांढरा, काळा, पांढरा-काळा, पिवळा-निळा आणि काळा-लाल — उपलब्ध असलेली ग्रेसी, झेलिओच्या आधुनिक डिझाइन तत्वज्ञानाला प्रतिबिंबित करते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.