Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री ऑफरची घोषणा

 टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री ऑफरची घोषणा


~ जीएसटी सवलतीसह जवळपास १ लाख रूपयांचे फायदे ~


मुंबई, ११ सप्टेंबर २०२५: सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने ग्राहकासांठी दुप्‍पट फायद्याची घोषणा केली. कार व एसयूव्‍हींवर नुकतेच जाहीर करण्‍यात आलेल्‍या जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे दिल्‍यानंतर टीकेएम प्रश्चिम प्रांतामधील ग्राहकांसाठी विशेष मोहिम 'बाय नाऊ अँड पे इन २०२६'सह नवरात्रीच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत आहे. जीएसटी दर कपात आणि टोयोटाची फेस्टिव्‍ह ऑफर असे दुहेरी फायदे या काळाला ग्राहकांना त्‍यांची आवडती टोयोटा वेईकल खरेदी करण्‍यासाठी परिपूर्ण करतात, जसे अर्बन क्रूझर हायरायडर, टोयोटा ग्‍लान्झा किंवा टोयोटा टायसर.





जीएसटी दर कपात २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होणार असताना 'बाय नाऊ अँड पे इन २०२६' ऑफर ३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत वैध आहे, जी फक्‍त पश्चिम भारतातील (महाराष्‍ट्र, गुजरात, मध्‍यप्रदेश व गोवा) अधिकृत टोयोटा डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

ऑफरची वैशिष्‍ट्ये व फायद्यांमध्ये ३-महिने ईएमआय हॉलिडे, ५ कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सर्विस सेशन्‍स, ५-वर्ष एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी, कॉर्पोरेट अँड एक्‍स्‍चेंज बोनस आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे आदींचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.