Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डला मिळाले नवे अपग्रेड

 स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डला मिळाले नवे अपग्रेड

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२५: भारतातील अग्रगण्य ऑन-डिमांड कन्क्विनियन्स प्लॅटफॉर्म स्विगीने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारीत स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी नवीन प्रवास लाभ जाहीर केला आहे. यात ग्राहकांना पेटीएम ट्रॅव्हलवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास व बस बुकिंगवर तत्काळ ६% सूट मिळणार आहे. हे कार्डधारकांना आधीपासून मिळणाऱ्या अनेक फायद्यांमध्ये भर घालते, ज्यात स्विगी प्लॅटफॉर्मवरील आणि त्याबाहेरील खर्चांवर आकर्षक कॅशबॅकचा समावेश आहे.




सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने, दिवाळीच्या कौटुंबिक भेटी असोत किंवा देशांतर्गत वा आंतरराष्ट्रीय सहली असोत, प्रवास योजना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रत्येक प्रवासावर होणारी त्वरित बचत आणखी महत्त्वाची ठरते. या नव्या फायद्यामुळे, स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड रोजच्या खरेदी आणि ऑनलाइन शॉपिंगपलीकडे जाऊन प्रवास योजनेतही बचत उपलब्ध करून देतो. हा लाभ विशेषतः पेटीएम ट्रॅव्हलवर उपलब्ध असून फ्लाइट्स आणि इंटरसिटी बस प्रवासासाठी लागू होतो.


स्विगी लिमिटेडचे व्हाइस प्रेसिडेंट - ग्रोथ, अनुराग पंगनामामुला म्हणाले, “शहरी भारतीय प्रवासावर अधिक खर्च करत आहेत, जो सर्वात जलद वाढणाऱ्या जीवनशैली श्रेणींपैकी एक आहे. आमच्या स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डला रोजच्या खर्चांवरील रिवॉर्ड्ससाठी चांगली पसंती मिळाली आहे, आणि हे फायदे प्रवासापर्यंत वाढवल्याने ते आणखी लाभदायक ठरत आहेत. सुट्टीच्या हंगामासाठी अगदी योग्य वेळी ही ऑफर सर्व विद्यमान आणि नवीन कार्डधारकांसाठी उपलब्ध आहे.”


पेटीएम ट्रॅव्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जालन म्हणाले, “ही भागीदारी पेटीएमचा सुलभ ट्रॅव्हल बुकिंग अनुभव स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या फायद्यांशी एकत्र आणते. आमचे उद्दिष्ट प्रत्येक प्रवासात ग्राहकांना त्वरित बचत आणि सोय उपलब्ध करून देणे आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.