राणी मुखर्जी पोलिस दलाच्या पाठीशी उभ्या; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमार यांच्यासह व्यासपीठावर येऊन सायबर गुन्ह्यांविरोधात जागरूकता निर्माण केली!
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य पोलिस मुख्यालयात आयोजित सायबर अवेअरनेस मंथ २०२५ च्या उद्घाटन समारंभात उपस्थित होत्या. भारतातील एकमेव हिट महिला-प्रधान फ्रँचायझी चित्रपट मर्दानी मध्ये धाडसी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी राणी, नेहमीच भारतीय पोलीस दलाची आणि समाजाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या योगदानाची समर्थक राहिली आहे.
या कार्यक्रमाला राणी मुखर्जींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) रश्मी शुक्ला, तसेच गृह विभागाचे अपर मुख्य सचिव (ACS) इक्बाल सिंग चहल (IPS) आदी मान्यवर उपस्थित होते.
राणी मुखर्जी यांनी महिलांवर आणि मुलांवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्याविषयी जागरूकता वाढवली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलचे कौतुक केले — हे ते अनोळखी नायक आहेत जे रात्रंदिवस एक सुरक्षित डिजिटल जग निर्माण करण्यासाठी काम करत असतात.
कार्यक्रमात बोलताना राणी मुखर्जी म्हणाली “सायबर अवेअरनेस मंथच्या उद्घाटनाचा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे, माझ्या चित्रपटांमधून मला अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि दुर्बलांचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया साकारण्याचे भाग्य लाभले आहे. खरं तर, आज मी थेट मर्दानी 3 च्या शूटिंगवरून येथे आले आहे, त्यामुळे हा क्षण अतिशय विलक्षण वाटतो. महाराष्ट्र पोलिसांनी घेतलेली ही पुढाकार प्रशंसनीय आहे.”
त्या पुढे म्हणाल्या“आज सायबर गुन्हे — विशेषत: महिलांवर आणि मुलांवर होणारे — शांतपणे आपल्या घराघरात शिरत आहेत. एक स्त्री आणि आई म्हणून मला ठाऊक आहे की जागरूकता किती महत्त्वाची आहे. जेव्हा कुटुंबांना कसे सुरक्षित राहायचे आणि मदत कुठे मिळेल हे माहित असते, तेव्हाच खरी सुरक्षा सुरू होते. या महत्त्वाच्या मोहिमेला प्राधान्य दिल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री, माननीय ACS साहेब आणि आदरणीय DGP मॅडम यांचे आभार मानते.”
सरकारने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन नंबरांवर भर देताना राणी म्हणाली “डायल 1930 आणि डायल 1945 या हेल्पलाइन सर्व नागरिकांसाठी वरदान आहेत. एक कलाकार म्हणून मी पडद्यावर कथा जिवंत करते, पण एक स्त्री, एक आई आणि एक नागरिक म्हणून मला वाटते की हे आपले सामूहिक कर्तव्य आहे की कोणतेही मूल शांतपणे रडू नये, कोणतीही स्त्री असुरक्षित वाटू नये आणि कोणतेही कुटुंब सायबर गुन्ह्यामुळे आपली शांतता गमावू नये.”
आपल्या भाषणाचा समारोप करताना त्या म्हणाल्या:“चला आज आपण सगळे मिळून सतर्क राहण्याचा, आवाज उठवण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जगासाठी एकत्र उभे राहण्याचा संकल्प करूया.”
राणी मुखर्जी यांचा पुढील चित्रपट मर्दानी 3 २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे आणि दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले आहे.