द बॉडी शॉपचा इंडी वाइल्डसोबत सहयोग
~ वेडिंग प्रीमियम गिफ्टिंगवर लक्ष केंद्रित केले ~
मुंबई, २४ डिसेंबर २०२५: ब्रँड इंडी वाइल्डसोबत सहयोगाची घोषणा केली. हा उद्योगामधील ब्युटी श्रेणीअंतर्गत अद्वितीय सहयोग आहे, जेथे सर्वोत्तम वेडिंग प्रीमियम गिफ्टिंगवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
प्रामाणिकपणा व शाश्वतता या समान मूल्यांशी संलग्न या सहयोगामध्ये द बॉडी शॉपचा नैतिक सौंदर्याचा वारसा आणि इंडी वाइल्डच्या आधुनिक भारतीय प्रथांचे सुरेख संयोजन आहे, ज्यामधून सौंदर्य व साजरीकरणाप्रती उत्साहवर्धक दृष्टिकोन दिसून येतो. एकत्रित, त्यांनी विचारपूर्वक चार गिफ्ट बॉक्सेस डिझाइन केले आहेत, जे अर्थपूर्ण सेल्फ-केअर आणि उत्सावर्धक गिफ्टिंगची खात्री देतात. प्रत्येक बॉक्समध्ये द बॉडी शॉपच्या खास उत्पादनांसोबत इंडी वाइल्डची सर्वात लोकप्रिय उत्पादने आहेत, ज्यामध्ये वधू, पाहुणे व सेल्फ-केअरसाठी खास तयार करण्यात आलेले ब्युटी किट्स आहेत, ज्यामधून सेलिब्रेशनला अनुकूल उत्साह मिळतो. तसेच हे बॉक्सेस वधू, वधूच्या मैत्रिणी आणि आकर्षक गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या प्रियजनांसाठी परिपूर्ण आहेत.
आपल्या देशामध्ये विवाह सोहळ्यादरम्यान सर्व एकत्र येतात, पारंपारिक पेहराव करतात, प्रत्येक पैलूमध्ये सौंदर्याला आणि उत्तम गिफ्ट देण्याला प्राधान्य देतात. हा सहयोग विचारशील, उत्साहवर्धक प्रथांसह त्या भावनेला सन्मानित करतो, जेथे या प्रथांमधून भारतीय परंपरेचा उत्साही अनुभव मिळतो.
क्वेस्ट रिटेल आणि हाऊस ऑफ ब्युटीचे ग्रुप सीईओ राहुल शंकर म्हणाले, “द बॉडी शॉपचा इंडी वाइल्डसोबत सहयोग धोरणात्मक टप्पा आहे, ज्यासह आम्ही प्रीमियम वेडिंग गिफ्टिंग क्षेत्रात प्रवेश करत आहोत. इंडी वाइल्ड ब्रँड तरूणांच्या गरजांची पूर्तता करतो आणि हा सहयोग दोन्ही ब्रँड्सना एकत्रितपणे समन्वय राखण्यास मदत करेल. आम्ही दोन विशिष्ट वारसांना एकत्र आणत आहोत, तसेच आमची एथिकल, कम्युनिटी फेअर ट्रेड कटिबद्धता व इंडी वाइल्डच्या आधुनिक आयुर्वेदशास्त्राला एकत्र आणत अद्वितीय गिफ्टिंग अनुभव सादर करत आहोत. हे बॉक्सेस उत्पादनापेक्षा अधिक असून अर्थपूर्ण, प्रीमियम केअर पॅकेजेस् आहेत, जे भारतातील आधुनिक ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करतात, ज्यामुळे ते अधिक उत्साहात व आकर्षक दिसत विवाह सोहळ्याचा आनंद घेऊ शकतात.''
इंडी वाइल्डच्या संस्थापिका दीपा बुलर-खोसला म्हणाल्या, “भारतातील विवाह सोहळ्यांमध्ये अद्वितीय प्रथा व परंपरा दिसून येते आणि आजची पिढी ही प्रथा जपत अर्थपूर्ण साजरीकरणाला महत्त्व देत आहे. सेलिब्रेशन्स अधिक वैयक्तिक, अधिक उद्देशपूर्ण होत आहेत, तसेच गिफ्टिंगमधून होत असलेले परिवर्तन दिसून येते. इंडी वाइल्डमध्ये आम्ही हे परिवर्तन दिसून येणारे सौंदर्य निर्माण करत आहोत, व्यक्तींना सेल्फ-केअरसह आकर्षक दिसण्यास मदत करत आहोत, ज्यामुळे ते प्रत्येक क्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतात. द बॉडी शॉप सारख्या जागतिक प्रतिष्ठित ब्रँडसोबत सहयोग आम्हाला उत्साहात या उत्क्रांतीला साजरे करण्याची संधी देतो, ज्यामधून अभिमानाने भारतीय व आधुनिक असल्याचा अनुभव मिळतो.''
१,४९५ रूपयांपासून किंमत असलेले हे सर्वोत्तम गिफ्ट बॉक्सेस सर्व द बॉडी शॉप स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन चॅनेल्सवर उपलब्ध असतील. या सहयोगामधून दोन्ही ब्रँण्ड्स जागतिक व स्थानिक, नैतिक व आधुनिक असे सर्वोत्तम पैलू दिसून येतात, जे आजच्या पिढीसाठी वेडिंग गिफ्टिंगला नव्या उंचीवर घेऊन जाता.


