Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा INSCR 2025 राष्ट्रीय पुरस्कार सुरिनम प्रशासनाच्या वतीने राष्ट्रपती संतोखी यांच्या हस्ते राजदूत सुभाष गुप्ता यांच्याकडे सुपूर्द

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा INSCR 2025 राष्ट्रीय पुरस्कार सुरिनम प्रशासनाच्या वतीने राष्ट्रपती  संतोखी यांच्या हस्ते राजदूत  सुभाष गुप्ता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला


आमदार सुरेश धस यांनी नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलिस फाऊंडेशन व सुरिनम प्रशासनाचे अभिनंदन केले.



​महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कर्तव्यपूर्ण कार्यासाठी विशेषत: संपूर्ण राज्यात सर्वप्रथम बीड जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त सहयोगातून बेटी बचाओ बेटी पढाओ या अभिनव प्रचार प्रसार कार्याकरिता प्रोत्साहन देवून प्रेरित करत कार्य करण्यास परावृत्त केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरिनम येथे राष्ट्रपती श्री. चंद्रिका प्रसाद संतोखी यांच्या हस्ते विशेष गौरव सन्मान INSCR 2025 प्रदान करण्यात आला आहे.


​नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलिस फाऊंडेशन च्या वतीने संपूर्ण राज्यात सर्वप्रथम पोलिस दलाच्या संयुक्त सहयोगातून भारत सरकारचे महत्वपूर्ण अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ च्या प्रचार व प्रसारासाठी श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सहयोग प्रेरणेतून लाडली बेटीयाँ या हिंदी चॅरिटी चित्रपटाची निर्मिती करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन इरॉस इंटरनॅशनल मिडीया लि. व नेदरलँड येथील आर.एफ.आय. स्टुडिओ व नेपाळ फिल्म असोसिएशन सोबत उत्तराखंड सरकार च्या संयुक्त सहयोगातून लाडली बेटीयाँ ची निर्मिती करण्यात आली असून ऑगस्ट 2025 मध्ये या चित्रपटाचे सर्व स्तरावरुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करुन महाराष्ट्र पोलिस कल्याण निधीस आर्थिक सहाय्य उभा करण्याच्या महत्वपूर्ण उद्देशाने मुंबई येथील सामाजिक युवा कार्यकर्ते श्री. राकेश शंकरराव गायकवाड यांनी संपूर्ण प्रदर्शन व चित्रपटाचे अधिकार घेवून आपला सहयोग नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन ला दिला आहे, त्या बद्दल नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलिस फाऊंडेशन च्या वतीने श्री. राकेश शंकरराव गायकवाड यांचे शतश: आभार व्यक्त करण्यात आलेले आहे.



​राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहयोगामुळेच बीड जिल्हा पोलिसांच्या द्वारेच सामाजिक जनजागरणाकरिता कार्य करण्यासाठी पोलिसांच्या द्वारे अभिनव उपक्रमा बद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरुन सुरिनम प्रशासनाच्या संयुक्त सहयोगातून राष्ट्रपती श्री. चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी विशेष गौरव सन्मान ISNCR 2025 पारामारिबो येथे श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चात सुरिनम येथील भारताचे राजदूत श्री. सुभाष गुप्ता व नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन यांच्याकडे सुपूर्द करुन महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांना ई-मेल द्वारे विनंती पत्र पाठवून मा. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या द्वारे पुरस्कार प्रदान करण्याकरिता कळविण्यात आलेले आहे.


​लवकरच आमदार श्री. सुरेश धस व नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन च्या सर्व मान्यवर सदस्यांसोबत श्री. राकेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्या संबंधी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवकिरण संस्था (फिल्म्स्) पोलिस फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.